काल टीव्ही वर सर्फिंग करतांना एक सुरेख चित्रपट बघायला मिळाला. मूळ बंगाली भाषेतला सिनेमा हिंदीत डब केलेला. राहुल बोस, रितुपर्णा घोष, आणि रिमा सेन. “अनुरानन” हे नाव त्या सिनेमाचं. मला ते नाव खूपच आवडलं. सुरवातीला अर्थ माहित नव्हता. पण सिनेमातच राहुल बोस त्याचा अर्थ सांगतो. बंगालीत तो इतकं छान उच्चारतो…ऑनुरॉनॉन. ”अनुरानन” म्हणजे एकमेकांच्या सुरात सूर मिसळणे. ”अनुरानन” ह्या शब्दातच इतकी गोड लय आहे ना….!! अर्थ कळल्यावर तर हा शब्द आणखीनच आवडला.
एकमेकांच्या सुरात सूर मिसळायचा…ही कल्पनाच किती छान आहे !! हे असं सूर मिसळणं कितीजणांना शक्य होतं ? प्रत्येक नात्याचाच एक सूर असतो.