एन्टरप्रेन्युअर
लेखनविषय:
- Read more about एन्टरप्रेन्युअर
- 16 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता.
पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.
जुनी वास्तु... भाग १
असा प्रकार की जेव्हा असते तेव्हा किम्मत नसते, आता खुप आठवण येते... पण टिकवुन ठेवल्ये... आहे मनात अजुन! आज तुम्हाला पण घेऊन जातो... भावे यांचे आक्षी गावातील एक कौलारु ८०-८५वर्ष जूने घर, पुरुषोत्तम जनार्दन भावे नावाची पाटी... मोरपीशी रंगाचा दुहेरी दरवाजा... त्या दरवाजाच्या उजव्या डाव्या बाजूला शंकरपाळी लाकडी फळ्या...