स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

ऐसे कौन से तीर मार लिये यार तूने ?

लेखनविषय:
लेखनप्रकार
कुवत - मिडिओक्रिसिटी आपली कुवत मध्यम आहे ; हे पचवणं थोडं अवघडच आहे; विशेषतः प्रामाणिक असाल तर. कुवत मध्यम असणं म्हणजे काय -- आपण बुद्धीनं फार काही माठ नसलो तरी फार थोरही नाही, अगदिच सर्वसाधारण आहोत; प्रयत्न केल्यावरही एका मर्यादेपलिकडे काही आपली उडी पोचत नाही. फार काही तार्किकक्षमता आपल्या विकसित नाहित; कुठलंही विशेष कौशल्य नाही; कारकुनी कामं करतो झालं. कलाक्षेत्रातल्या जाणीवा विकसित झाल्या नाहित; उपजत नव्हत्याच. काहींच्या मुद्दाम नंतर प्रयत्न पूर्वक विकसित होतात; आपल्या त्याही नाहित.

आमचं एकत्र मालवणी भोजन.

लेखनविषय:
लेखनप्रकार
“मालवणी जेवणाच्या पदार्थांची चव पुस्तकात वाचून केलेल्या जेवणात सापडायची नाही.ती हळदणकरांच्या चोखंदळ हातामधून तयार झालेल्या जेवणातूनच खरी कळायची.” बाबल्या हळदणकराच्या खानावळीत मी पूर्वी अनेक वेळा जेवलो आहे.हळदणकर दांपत्यांची मुलं मोठी झाल्यावर आणि कामा-धंद्याला लागल्यावर मुलांनीच त्यांची खानावळ बंद केली होती. ” आयुष्यभर आमच्यासाठी खस्ता खाल्लात.आता थकावट येण्याच्या वयात आरामात रहा” असं आम्ही आमच्या आईबाबांना विनंती करून सांगीतलं आणि त्यांनी ते मानलं.” गुरूनाथ-हळदणकरांचा मोठा मुलगा-मला सांगत होता. “तुमच्या खानावळीत मी अनेकदां जेवलो आहे.जेवणाची चव अजून माझ्या जीभेवर आहे.” मी गुरूनाथल म्हणालो. “तु

साहित्यिक कसले हे !

साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखनविषय:
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

देहभार

लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व प्रथम, मी वजनावरचे कुठलेही लेख अजून तरी वाचलेले नाहीत, तस्मात हा लेख कोणत्याही लेखाला प्रत्युत्तर नाही. दुसरी गोष्ट, माझा शरीरशास्त्राचा आभ्यास नाही. ‘मी शरीर नसून मला शरीराची जाणीव आहे’ या स्वानुभवातून आणि रोजच्या जगण्यातून केलेलं हे लेखन आहे. माझ्या मते, वजन घटवण्याचे इतर उपाय कष्टदायक वाटले तरी काहीशा निश्चयानं ते पार पाडता येतील. या लेखातले अनुभव वरकरणी सोपे वाटले तरी जीवनाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन बदलला तर त्यांची प्रचिती निश्चित येईल. ______________________________ पहिली गोष्ट, आपण शरीर नाही; आपल्याला शरीराची जाणीव आहे. तस्मात, वजन शरीराला आहे, आपल्याला नाही.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

लेखनविषय:
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

ऋतू प्रेमाचा 1

लेखनविषय:
लेखनप्रकार
ऋतूमागुनी ऋतू येतो; ऋतूमागुनी ऋतू जातो. ठराविक कावाधीनंतर ऋतुकाळ हा बदलत आसतोच; पण आपल्या जीवनात आसाही एक ऋतू आहे ; जो कधीही बदलत नाही, तो कधीही संपत नाही. तो ऋतू म्हणजेच प्रेमाचा ऋतू .'सौ साल पहले मुझे तुमसे प्यार था ,आज भी हे और कल भी रहेगा, असे जे म्हटले आहे ; ते चुकीचे नाही. या सृष्टीच्या उत्पतीपासून प्रेम आहेच आहे , असे म्हणन्यापेक्षा या प्रेमभावनेतूनच सृष्टीची उत्पती झाली आहे , असे म्हणणे योग्य होईल . मानवाला जगण्यासाठी जितकी हवेची गरज आहे; तितकीच गरज त्याला प्रेमाचीही आहे. मानवी मनाची सर्वात मोठी तहान जर कोणती असेल तर ती म्हणजे केवळ प्रेम.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

लेखनविषय:
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,
Subscribe to राहणी