धाक... दहशत
दहिहंडी, गणपती दिवस जवळ येउ लागतात. कुणा महापुरुषाची जयंती आलेली असते.
उरुस , जुलूसही मागे नसतातच.
त्याच्या काळजात धस्स होतं. तो थबकतो. बिचकतो. नजर चोरुन खालमानाने अंग चोरुन चालू लागतो.
माणूस हा सामाजिक प्राणी आहे. उत्सवप्रिय जंतू आहे. हे त्याच्या मनी बिंबवलं जाणार असतं.
डोक्यात शिरवलं जाणार असतं कानांचे पडदे फाडून. छाती हादरवणार्या डीजेच्या दणदणाटात ;
आणि भल्या मोठ्या हेडलाइट्सच्या प्रकाशात
तो घरी येतो. दारं खिडक्या गच्च बंद करतो. जमल्यास कानात कापसाचे बोळे. लाइट बंद करतो.
बिचकलेला सामाजिक प्राणी मग खोल घट्ट कुट्ट अंधारात एकटाच दबून झोपू पाहतो. जीव मुठित धरुन.
मिसळपाव
जागतिकीकरणाच्या रेटयामुळे या देशातही अनेक बदल घडले, रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. उत्तम शिक्षण मिळू लागले. तंत्रज्ञानाच्या अनेक वाटा खुल्या झाल्या.
वरील चित्रः फोंतेनब्लो प्रासाद आणि संग्रहलय.
संग्रहालये बघण्याची माझी आवड फार जुनी. म्हणजे अगदी वयाच्या पाचव्या -सहाव्या वर्षी सालारजंग म्युझियम बघितले, त्याची मनावर अमिट छाप पडली.
पुढे शाळकरी वयात इंदुरातल्या म्युझियममध्ये जवळ जवळ रोजच जाऊ लागलो. (