एकशे वीस माईल्स, म्हणजे १२० इन टू १.६, माईल्स आणि कि.मी.च गणित मांडायची सवय जाण्याचं तसं काही कारण नाही. परत किलोमीटरमध्ये लांबच्या गोष्टी आणीच लांब वाटतात.
असो, नासा, केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा - अंतर जवळपास दोनशे किलोमीटर.
अरे वोह एडविन ऑल्ड्रिन आ रहे हैं, बुक साईनिंग हैं। आओगे क्या आप ?
सुबह साडे नौ से साडे दस तक टाईम लिखा हैं ।
अगदी परवाच प्रशांतने विचारलं होतं, आणि हो, नक्की म्हणून, लगेच प्लॅनही झाला होता.
सुबह जल्दी निकलते हैं, सेपरेट कार्स. सिधे वही मिलेंगे ।
डन !
मी गाडी बाहेर काढली तेव्हा सकाळचे साडेसात वाजून गेले होते. गुगल मॅप्स पोहोचायची वेळ ९.२५ दाखवत होता.