मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नाट्य

प्रेमाची गोष्ट

हेरंब ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कांही वर्षांपूर्वी "प्रेमाची गोष्ट" हे नाटक आलं होतं. लागू आणि निळु फुले ही नांवे पहाताच आम्ही ग्रुपने ते बघायला गेलो. पण नाटक फार वरच्या पातळीवरचे असल्यामुळे आमच्या डोक्यावरुन गेले .दोन दिवस अस्वस्थपणाने काढले मग ठरवलं, जसं दिसलं तसं लिहून काढायचं, कोणी जाणकार सांगेल समजावून! पण कसलं काय हो, अजून कोणी भेटलं नाही. तर वाचाच त्याबद्दल...... प्रेमाची गोष्ट म्हणजे कॉय ? के.बी. साठे, बी.सी. साठे आणि तात्या पाटील हे तिघे कॉलेजातले जिवलग मित्र. नाटकांत अभिप्रेत असलेल्या काळात, कोणालाच आपल्या जातीची लाज वाटत नसावी, किंवा ते तिघे खिलाडु वृत्तीचे असावेत.

इप्रसारण.कॉम येथे कादंबरी वाचन- प्राजक्ता पटवर्धन

सुवर्णमयी ·
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती http://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल. (तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले मेहता प्रकाशन, पुणे ) त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्‍या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.

काही वादविवाद...("का रे भुललासि " या आमच्याच आगामी दीर्घांकातील एक भाग)

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
[ एका कोलेज च्या एका मोठ्या क्रीडांगणाचा एक कोपरा.त्या ground चं कुंपण, भिंत, गेट आणि त्यामागचा रस्ता...प्रेक्षकांसमोर एक दोन बेंच आणि त्यासमोरून गेलेला जोगिंग ट्रॆक...ground ला चालत चक्कर मारणार्या स्त्रिया, मध्यमवयीन माणसे आणि काही खेळाडू अधून मधून दिसावेत...groundवर क्रिकेट सामना चालू आहे.पडदा उघडतो तेव्हा मनीष आणि माधवी स्टेजवर दिसतात....] >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>माधवी - मनीष्चे लग्न ठरले आहे, आणि मनीषने अधिक चांगल्या पगाराची नोकरी धरली पाहिजे असा सतत आ

शुभेच्छा...!

प्राजु ·
मिसळपाव वर प्रेम करणार्‍या सगळ्या सभासदांना आणि वाचकांना व्हॅलेंटाईन्स डे च्या हार्दिक शुभेच्छा...! प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमामध्ये चिंब नहावे जीवन हेच प्रेम असावे प्रेमासाठीच जगत रहावे... - प्राजु

सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग......आमच्या नाटकातला एक संवाद

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्जनशीलता, लायकी आणि मार्केटिंग...... आम्ही कॊलेजला एका वसतिग्रुहात शिकलो तेव्हा आमचा एक कविमनाचा मित्र होता... लायक माणसांना कौतुक लाभायच्या ऐवजी नेहमीच कोणा भलत्यालाच (त्याच्या अंगभूत गुणांच्याऐवजी काही इतर कारणांमुळे..उदा. सत्ता , पैसा, उच्च वर्तुळात संपर्क इ.) कौतुक लाभते असे जेव्हा दिसत असे, त्यावेळी आमच्या या मित्रास भयंकर वैफ़ल्य येत असे...हे वैफ़ल्य कधी वाजवी आणि कधी अत्यंत अयोग्य असे, पण त्याच्याशी फ़ार वेळ वाद घालणे शक्य होत नसे.... " श्रीमंत माणसे लायकी नसताना पैशांच्या जोरावर काहीही मिळवू शकतात" असे तो म्हणे, आणि चिडचिड करे....

ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
राम राम मंडळी, येत्या रविवारी, म्हणजे ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी ठाणे येथे 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...' हा कार्यक्रम ठाण्यातील कलारसिक मंडळ या संस्थेने आयोजित केला आहे. पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा शिष्य अनंत जोशी (उच्चारी अन्ता जोशी! ;) हा आमचा दोस्त. आमचा अन्ता हा हिंदुस्थानी ख्याल गायनाला संवादिनीची उत्तमपैकी साथसंगत करणारा तरूण पिढीतील एक उमदा कलाकार. 'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद..' या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही अन्ताची आहे. ऑर्गन या वाद्यावर आमचेही अत्यंत प्रेम!

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.