हबीब तन्वीर
ख्यातनाम हिंदी नाटककार , दिग्दर्शक , आणि अभिनेते हबीब तन्वीर यांचे सोमवारी भोपाळ येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते.
"आग्रा बझार", "चरणदास चोर" इत्यादि प्रसिद्ध हिंदी नाटके त्यांनी लिहिली आणि केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मार्क्सिस्ट विचारांनी प्रभावित असलेल्या पीढीचे ते महत्त्वाचे साक्षीदार असे म्हणता येईल. त्यांनी "नाटक" हाच एक ध्यास घेतल्यासारखे संपूर्ण आयुष्य काढले.
त्याना अनेक पुरस्कार मिळाले.
- १९६९ सालचा "संगीत नाटक अकादेमी पुरस्कार"
- १९८३ साली पद्मश्री
- २००२ साली पद्मभूषण
याशिवाय अन्य अनेक विदेशी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता.
मिसळपाव