मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

क्रीडा

मै तो चला

नितीनचंद्र ·
जसा चंद्र कविच्या मनाला मोहवतो आणि अनेक काव्य निर्माण होतात किंवा अनेक व्यक्ती, घटना आणि घ्येयासक्ती अनेक कथा किंवा कादबंर्यांच्या लेखनाच्या प्रेरणास्थानी असतात. मला कधी रस्ता या विषयावर लिहाव लागेल अस वाटल नव्हत. रस्ते माणसे किंवा वाहने यांच्या वहातुक सोयीसाठी असतात इतकच मनावर बिंबल होत. एखादा रस्ता नविन झाला म्हणजे आजुबाजुच्या जागेचे भाव वाढतात. नविन दुकाने. व्यावसायीक संस्था त्या रस्त्यावर आपले स्थान पक्के करतात हे ही माहित होत. नविन रस्त्यामुळे अर्थकारणांना चालना मिळते हे ही माहित होत. जुनाच रस्ता मात्र अर्थकारणांना चालना देतो हे मात्र पिंपरी- चिंचवड मधले रस्ते पाहिले की समजत.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

जंटलमन्स गेम - ७ - The Barnacle & The Tortoise

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९५३ चा जून महिना.... लिंडसे हॅसेटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्वतः हॅसेट, आर्थर मॉरीस, नील हार्वे, कॉलिन मॅक्डोनाल्ड, ग्रॅहॅम होल असे बॅट्समन होते! डॉन टॅलनसारखा गाजलेला विकेटकीपर होता. रॉन आर्चर, डग रिंग, रिची बेनॉ, अ‍ॅलन डेव्हीडसन यांच्यासारखे ऑलराऊंडर्स संघात होते! त्याखेरीज फास्ट आणि स्पिन बॉलिंग सारख्याच परिणामकारकपणे टाकू शकणारा बिल जॉन्स्टनसारखा हरहुन्नरी बॉलरही होता!

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

मार्गी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

मार्गी ·
लेखनप्रकार
सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

जंटलमन्स गेम - ६ - वर्ल्ड सिरीज

स्पार्टाकस ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
१९७५ चा फेव्रुवारी महिना.... माईक डेनेसच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघा अ‍ॅशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियात आला होता. पाचपैकी चार टेस्ट्स जिंकून ऑस्ट्रेलियाने सिरीज जिंकली होतीच पण त्याहीपेक्षा त्यांनी इंग्लंडचे अक्षरश: हाल केले होते! याला कारणीभूत होते ते स्ट्रेस फॅक्चरमधून सावरुन पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात परतलेला डेनिस लिली आणि पायाचं हाड मोडलेल्या अवस्थेत टेस्ट पदार्पण केल्यामुळे पार निष्प्रभ ठरलेला परंतु आता पूर्ण सावरलेला जेफ्री रॉबर्ट थॉमसन! लिली आणि थॉमसन यांना तोंड देताना इंग्लिश बॅट्समनची जी काही द्यनिय अवस्था झाली होती त्याला तोड नव्हती!

साकल्यसूक्त

मितान ·
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी हंबरून गायी सार्‍या उधळीत दिशा गिरिकुहरी निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी अस्तांकित चकवे गहिरे लपवून वनातिल राई अन राख होऊनी शून्य रंध्रात निनादत राही !!!