Skip to main content

क्रीडा

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - फायनल - भारत विरुद्ध वेस्ट इंडीज

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/02/2017 05:16 या दिवशी प्रकाशित केले.
२५ जून १९८३ लॉर्ड्स, लंडन लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानातच पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणे तिसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना फायनलमध्ये येऊन धडकलेल्या भारतीय संघाचा सामना होता तो क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीजशी. पहिल्या दोन वर्ल्डकपप्रमाणेच तिसरा वर्ल्डकप जिंकून हॅटट्रीक करण्याचा लॉईडचा निर्धार होता. त्यातच भारत फायनलला आल्यावर तर फायनलची मॅच ही केवळ एक औपचारिकता आहे आणि वेस्ट इंडीजने वर्ल्डकप जिंकल्यातच जमा आहे असं जवळपास प्रत्येकाचं मत होतं! अर्थात वेस्ट इंडीजचा संघही तसाच होता.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 06/02/2017 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - सेमीफायनल - भारत विरुद्ध इंग्लंड २२ जून १९८३ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपची पहिली सेमीफायनल होती. बॉब विलीसचा इंग्लिश संघ ग्रूपमधल्या सहा पैकी पाच मॅचेस जिंकून सेमी फायनलमध्ये धडकला होता. उरलेली एकमेव मॅचही न्यूझीलंडने शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकली होती. इंग्लिश खेळाडूंचं सारं लक्षं केंद्रीत झालं होतं ते फायनलकडे!

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - भारत विरुद्ध झिंबाब्वे

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/02/2017 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
१८ जून १९८३ नेव्हील ग्राऊंड, टनब्रिज वेल्स केंट काऊंटीतल्या टनब्रिज वेल्सच्या ग्राऊंडवर भारत आणि झिंबाब्वे यांच्यातली दुसर्‍या राऊंडची मॅच रंगणार होती. ग्रूपमधल्या पहिल्या राऊंडच्या मॅचेसमध्ये डंकन फ्लेचरच्या अननुभवी झिंबाब्वेने किम ह्यूजच्या ऑस्ट्रेलियाला चकवलं होतं! कपिल देवच्या भारतीय संघाने तर पहिल्याच मॅचमध्ये वेस्ट इंडीजला पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला होता! १९७५ पासून वर्ल्डकपमधली एकही मॅच न गमावणार्‍या वेस्ट इंडीजचा हा पहिलाच पराभव होता! पहिल्या राऊंडमध्ये भारताने झिंबाब्वेचा आरामात पराभव केला असला तरी ऑस्ट्रेलियाने भारताला धूळ चारली होती.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९८३ - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 04/02/2017 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
१९८३ चा वर्ल्डकप हा पूर्वीच्या दोन्ही वर्ल्डकपच्या तुलनेत अनेक दृष्टींनी वैविध्यपूर्ण होता. १९७९ च्या वर्ल्डकपप्रमाणेच ८ टीम्सना दोन ग्रूपमध्ये विभागण्यात आलं होतं, परंतु यावेळी प्रत्येक टीमच्या ग्रूपमधल्या दुसर्‍या टीमशी २ मॅचेस होत्या. इंग्लंडच्या लहरी हवामानाचा फटका बसल्यामुळे एखाद्या टीमला वर्ल्डकपमधून गाशा गुंडाळण्याची वेळ येऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली होती. वाईड्स आणि बंपर्सच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्याच्या अंपायर्सना सूचना देण्यात आल्या होत्याच, परंतु या वर्ल्डकपमधली सर्वात नाविन्यपूर्ण बाब म्हणजे या वर्ल्डकपपासून ३० यार्डचं सर्कल अस्तित्वात आलं.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 03/02/2017 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
२३ जून १९७९ लॉर्डस्, लंडन ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानातच १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपप्रमाणे दुसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. पहिल्या वर्ल्डकपच्या विजेत्या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीयन संघ दुसर्‍या वर्ल्डकपच्याही फायनलमध्ये येऊन धडकला होता. लॉईडच्या संघात स्वतः लॉईड, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्डस्, अल्विन कालिचरण असे बॅट्समन होते.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - सेमीफायनल - इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 02/02/2017 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
२० जून १९७९ ओल्ड ट्रॅफर्ड, मँचेस्टर लँकेशायरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानात वर्ल्डकपचे यजमान इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली सेमी फायनल रंगणार होती. मार्क बर्जेसचा न्यूझीलंड संघ कोणाचीही अपेक्षा नसताना सेमी फायनलला पोहोचला होता. बर्जेसच्या संघात स्वतः बर्जेस, जॉन राईट, ब्रूस एडगर, जेफ हॉवर्थ आणि अनुभवी ग्लेन टर्नर असे बॅट्समन होतेच, शिवाय जेरेमी कोनीसारखा हरहुन्नरी ऑलराऊंडरही होता. बॉलिंगची मदार मुख्यतः रिचर्ड हॅडलीवर होती. त्याच्या जोडीला गॅरी ट्रप, ब्रायन मॅकेंझी आणि लान्स केर्न्स असे बॉलर्स होते.

मी आज केलेला व्यायाम - फेब्रुवारी २०१७ - सायकलिंग / रनिंग चॅलेंज

लेखक मोदक यांनी बुधवार, 01/02/2017 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार मंडळी. "मी आज केलेला व्यायाम" या धाग्यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे आणि अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला आहे. व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन. आपण सर्वांनी केलेला व्यायाम पुढीलप्रमाणे - नोव्हेंबर २०१६ - सायकलिंग - ८,०१० किमी आणि रनिंग / वॉकिंग - २४८ किमी. डिसेंबर २०१६ - सायकलिंग - ९,६१३ किमी आणि रनिंग / वॉकिंग - ५४७ किमी.