Skip to main content

क्रीडा

सचिननामा-३: पुन्हा फॉर्मात

लेखक फारएन्ड यांनी शनिवार, 31/12/2016 07:40 या दिवशी प्रकाशित केले.

६. जुलै १९९९ ते मार्च २०००

सचिनचा दुसर्‍यांदा कप्तानपदाचा काळ. १९९९च्या वर्ल्ड कपच्या शेवटी अझरचे कप्तानपद पुन्हा जाणार हे दिसू लागले होते. सचिन कप्तान नको असे अनेकांना वाटत होते. पण दुसरा कोणीही तयार दिसत नव्हता. त्यात अझर संघातूनही बाहेर जाईल अशीच चिन्हे होती. शेवटी नाइलाजाने परत दीड वर्षांनंतर सचिनकडे ती जबाबदारी दिली गेली असावी. आणि पुन्हा फॅन्स या दृष्टीने एक बोअर कालावधी सुरू झाला.

सचिननामा-२: शिखराकडे

लेखक फारएन्ड यांनी शुक्रवार, 30/12/2016 07:59 या दिवशी प्रकाशित केले.

२. नोव्हे. १९८९ ते १९९३ ची सुरूवात
नोव्हेंबर १९८९ मधल्या पाक विरूद्धच्या सामन्यापासून ते १९९३ च्या इंग्लंडविरूद्धच्या भारतातील सिरीज चा हा काळ. सचिन बद्दल आधी ऐकलेले व हाईप झालेली त्याची इमेज ही प्रत्यक्षात तितकीच, किंबहुना जास्तच भारी आहे असे सर्वांच्या लक्षात आले.

सचिननामा - १: ओळख

लेखक फारएन्ड यांनी शुक्रवार, 30/12/2016 06:06 या दिवशी प्रकाशित केले.

सचिन तेंडुलकर च्या कारकीर्दीतील विविध फेजेस बद्दल अनेकदा सोशल नेटवर्क्स वर चर्चा होत असे, अजूनही होते. सुमारे २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधे त्याचा खेळ, त्याच्या भोवतालची टीम, प्रतिस्पर्धी कसे बदलत गेले, त्याचे यश-अपयश, खेळाबद्दलचा अॅप्रोच याबद्दल सलग माहिती एकत्र करावी असे अनेक दिवसांपासून वाटत होते. हाच प्रयत्न येथे करत आहे.

आठवणी दाटतात: किस्से क्रिकेटचे

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 23/12/2016 19:13 या दिवशी प्रकाशित केले.

हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आणि कच्छच्या रणापासून ते अरुणाचलच्या जंगलापर्यंत पसरलेल्या भारतासारख्या विशाल देशाला एकत्रं आणणार्‍या ज्या काही मोजक्या गोष्टी आहेत त्या म्हणजे भारतीय सैन्य, राजकारण आणि क्रिकेट! भारतीय सैन्य हा उभ्या देशाच्या अत्यंत आदराचा तर राजकारण हा सामान्यतः तिरस्काराचा विषय.परंतु दहा वर्षांच्या पोरापासून ते जराजर्जर म्हातार्‍यांपर्यंत सर्वांच्या जिव्हाळ्याचा आणि चवीने चघळण्याचा विषय म्हणजे क्रिकेट! भारताचा राष्ट्रीय खेळ भले हॉकी असला आणि ऑलिंपिकमध्ये भारताने त्यात सुवर्णपदकं पटकावलेली असली, लिएंडर पेस - महेश भूपती यांनी ग्रँडस्लॅम जिंकले असले आणि अभिनव बिंद्रा, राजवर्धन…

मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६

लेखक मोदक यांनी बुधवार, 30/11/2016 22:58 या दिवशी प्रकाशित केले.

.

नमस्कार मंडळी.

मी आज केलेला व्यायाम या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेकांनी यातून प्रेरणा घेऊन व्यायाम सुरू केला.
व्यायाम सुरू केलेल्या आणि व्यायामात सातत्य ठेवलेल्या सर्वांचे अभिनंदन.

नोव्हेंबर महिन्यात मिपाकरांनी केलेला एकूण व्यायाम पुढीलप्रमाणे

एक स्वप्न पूर्ण झाले!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/11/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.

जगज्जेता मॅग्नुस कार्लसन आणि आव्हानवीर सेर्गे कार्याकिन यांच्यातला जागतिक बुद्धीबळ विजेतेपद सामना नोवेंबर ११ ते ३० दरम्यान न्यू यॉर्क इथे होईल अशी घोषणा फिडेने एप्रिल २०१६ मध्ये केली आणि सामना बॉस्टनपासून तीन तासांच्या अंतरावर होतोय आणि तो प्रत्यक्ष बघायला जाता येणे शक्य आहे या विचाराने माझ्या आनंदाला पारावार उरला नाही! विशी यावेळच्या सामन्यात असता तर 'आनंद' द्विगुणित झाला असता हे खरेच परंतु हेही नसे थोडके!

फिटनेस अ‍ॅप आणि गॅजेट्स

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 11/11/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी.

व्यायामाच्या धाग्यावर उदंड प्रतिसाद झाल्याने "फिटनेस अ‍ॅप आणि गॅजेट्स" च्या वापराबद्दल नवीन धागा काढत आहे. गोड मानून घ्या. ;) (एस रावांनाही बरेचदा लिहितो लिहितो म्हणून सांगितले होते.)

सर्वप्रथम, आपण आपल्या आनंदासाठी व्यायाम / सायकलिंग करतो मग त्याचे असे रेकॉर्ड ठेवणे किंवा ट्रॅक ठेवणे अनेक जणांना पटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या मोठ्या राईड नंतर "आपले आत्तापर्यंत इतके इतके किमी झाले..!!" ही भावना जबरदस्त असते. अवर्णनीय..!!

अ‍ॅपसाठी आवश्यक गोष्टी -

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.

.

नमस्कार,

गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत. मला व्यनीमधून अनेकांनी सायकलबाबत प्रश्न विचारले आणि तेथेही पुढील प्रगती कळवत आहेत.

खेल कबड्डी

लेखक रुस्तुम यांनी मंगळवार, 25/10/2016 22:40 या दिवशी प्रकाशित केले.

नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :)

"जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया,
प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!"

रिओ पॅरालिम्पिकमधे भारताला ४ पदकं......अभिनंदन

लेखक _मनश्री_ यांनी शनिवार, 10/09/2016 22:08 या दिवशी प्रकाशित केले.

रिओ पॅरालिम्पिक मधे उंच उडीमध्ये १.८९ मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकणाऱ्या मरियप्पन थांगावेलू आणि याच प्रकारात 1.86 मीटर उडी मारून ब्राँझ पदक मिळवणारा वरुण भाटी या दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन ......

रिओ पॅरालिंपिकमध्ये या दोघांनी भारताचे पदकांचे खाते उघडले आहे

1