Skip to main content

क्रीडा

एक स्वप्न पूर्ण झाले!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 30/11/2016 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
जगज्जेता मॅग्नुस कार्लसन आणि आव्हानवीर सेर्गे कार्याकिन यांच्यातला जागतिक बुद्धीबळ विजेतेपद सामना नोवेंबर ११ ते ३० दरम्यान न्यू यॉर्क इथे होईल अशी घोषणा फिडेने एप्रिल २०१६ मध्ये केली आणि सामना बॉस्टनपासून तीन तासांच्या अंतरावर होतोय आणि तो प्रत्यक्ष बघायला जाता येणे शक्य आहे या विचाराने माझ्या आनंदाला पारावार उरला नाही! विशी यावेळच्या सामन्यात असता तर 'आनंद' द्विगुणित झाला असता हे खरेच परंतु हेही नसे थोडके!

फिटनेस अ‍ॅप आणि गॅजेट्स

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 11/11/2016 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. व्यायामाच्या धाग्यावर उदंड प्रतिसाद झाल्याने "फिटनेस अ‍ॅप आणि गॅजेट्स" च्या वापराबद्दल नवीन धागा काढत आहे. गोड मानून घ्या. ;) (एस रावांनाही बरेचदा लिहितो लिहितो म्हणून सांगितले होते.) सर्वप्रथम, आपण आपल्या आनंदासाठी व्यायाम / सायकलिंग करतो मग त्याचे असे रेकॉर्ड ठेवणे किंवा ट्रॅक ठेवणे अनेक जणांना पटत नाही. मात्र महिन्याच्या शेवटी किंवा एखाद्या मोठ्या राईड नंतर "आपले आत्तापर्यंत इतके इतके किमी झाले..!!" ही भावना जबरदस्त असते.

मी आज केलेला व्यायाम...!!

लेखक मोदक यांनी बुधवार, 02/11/2016 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
. नमस्कार, गेली दोन वर्षे मी जमेल तसे सायकलवर भटकत आहे आणि शक्य त्या राईडचे लेख लिहीत आहे. यादरम्यान एक गोष्ट लक्षात आली, मिपावरील लेख वाचून किंवा आपल्या मित्रांच्या संगतीने अनेक लोकांना सायकल चालवावीशी वाटली आणि बहुदा अशा एखाद्या ट्रिगर मुळे अनेक लोक उत्साहाने आणि नियमीतपणे सायकल चालवत आहेत.

खेल कबड्डी

लेखक रुस्तुम यांनी मंगळवार, 25/10/2016 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच भारतात झालेल्या आणि भारताने विजेतेपद राखलेल्या कब्बडी विश्वचषकानिमित्त मनात आलेले विचार खरडतोय. मिपा वर हा माझा लेखाचा पहिलाच पर्यटन.चू.भू. द्यावी घ्यावी :) "जिता दिल इंडिया का , अब जीत गये दुनिया, प्रेम के साथ देखो, जिती है इंडिया , जिती है इंडिया, जिती है इंडिया!!" टीम इंडियाचा कबड्डी संघ विश्वचषक उंचावत असताना ह्या जिंगलचे पार्श्वसंगीत वाजत होते.त्या आधी अंतिम सामना जिंकल्यावर हिंदी समालोचक अपना खेल, अपना देश, अपना कप असे काहीसे उत्साहात ओरडत होता. मनात विचार आले की किती खऱ्या आहेत ह्या गोष्टी ..

रिओ ऑलिम्पिक २०१६

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 04/08/2016 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
रिओ ऑलिम्पिक २०१६ गेल्या वेळी लंडन ऑलिम्पिकच्या वेळेस २०१२ ला इंग्लंडमधेच वास्तव्य असल्याने ऑलिम्पिकमधील पाचसहा इव्हेंट्स आणि सामने प्रत्यक्ष जाऊन पहाता आले. आयुष्यात कधीतरी ऑलिम्पिक सामने पाहू ही इच्छा याचि देही पूर्ण झाली. यंदा ब्राझीलमध्ये प्रथमच रिओला ऑलिम्पिक होत आहे. ब्रिक्स देश म्हणून ब्राझील महत्व टिकवून आहेच, पण या स्पर्धेच्या निमित्ताने शानदार आयोजन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले महत्व ठळक करण्याचा ते प्रयत्न करतील. भारत अद्याप दोन दशके तरी या आयोजनास मुकेल असे वाटते.

कुठे नेऊन ठेवला खो-खो

लेखक पी महेश००७ यांनी रविवार, 24/07/2016 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता प्रो-कबड्डीचा चौथा सिझन आला... भारतीय खेळांमध्ये कबड्डीला प्रचंड चाहता वर्ग लाभला. तसा तो आधीही होताच, त्यात आता आणखी भर पडली आहे (क्रिकेटच्या मुस्काटात मारावी इतकी ही लोकप्रियता बरं). अर्थात, भारतीय खेळ आहेच मुळी गर्दी खेचणारे! कबड्डीपाठोपाठ माझ्या आवडीचा खेळ म्हणजे खो-खो. काय अप्रतिम कौशल्य या खेळाचं! कधी काळी पुणे, मुंबईकरांची दादागिरी होती या खेळात. आता या दिग्गजांना धक्का देत सांगलीने वर्चस्व राखले आहे. खो-खो अस्सल भारतीय खेळ असला तरी या खेळाच्या भाषेत क्रिकेटचा पगडा स्पष्टपणे जाणवतो. आक्रमण असेल तर फिल्डिंग आणि संरक्षण असेल तर बॅटिंग.