मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·

चित्रगुप्त 22/12/2024 - 05:35
येत्या फेब्रुवारी ११-२० मी पुण्यात मुक्कामास असेन, त्या दरम्यान कट्टा करुया का ? (फक्त १६ तारीख सोडून. त्या दिवशी एका लग्नात उपस्थिती लावयची आहे)

In reply to by चित्रगुप्त

सध्या आमचे भ्रमण फक्त ६ फूट बाय ३ फूट इतपतच मर्यादित असल्याने, माझ्या घरीच कट्टा करू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

काळजी घ्या मुवि. हाडाचे दुखणे म्हणजे वेळखाऊ दुखणे असते. काहीही झाले तरी मुळातले दुखणे आणि मग फिजिओथेरपी वगैरे प्रकार मिळून अडीच-तीन महिने जातातच. मी पण तो अनुभव घेतला आहे. पण त्या काळात मिपावर पूर्णवेळ पडीक राहून वेळेचा सदुपयोग केला होता :)

Bhakti 22/12/2024 - 21:15
पुणे बुक फेस्टिवल २०२४ अ आ १४ डिसेंबरपासून सुरू झालेल्या पुणे बुक फेस्टिवलचा आज २२ डिसेंबर शेवटचा दिवस होता.कामाचं आठवडा नियोजन पूर्ण फुल्ल असल्याने आजचाच दिवस या फेस्टिव्हलमध्ये येण्यासाठी मिळाला.खरोखर पुस्तक प्रेमींसाठी ही एक अनोखी पंढरी फर्ग्युसन महाविद्यालयात अवतरली होती.जवळपास २५० पेक्षा अधिक प्रकाशकांचे बुक स्टॉल येथे उपलब्ध होते.फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश करताच पुस्तक वाचण्यात मग्न अनेक भव्य प्रतिकृती ठराविक अंतरावर होत्या.पुस्तकांच्या आकाराच्या प्रतिकृतींची सजावट मार्गावर होती.अंम्पी थिअटरात अनेक कार्यक्रमांचीही रेलचेल होती.पुढे सर्वप्रथम भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पुस्तकरूपी "संविधान प्रतिकृती ९.९४ मीटर जिचा गिनीज बुक मध्ये समावेश करण्यात आला आहे, ती पाहिली.मग त्या भव्य प्रांगणात आलो जिथे फेस्टिव्हल भरले होते.इथे पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांचे आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते. आत गेल्यावर अनेक प्रसिद्ध प्रकाशनाची पुस्तके पाहून खूप आनंद झाला.इतकी पुस्तक पाहून कोणती घेऊ कोणती नको असं झालं. पहिल्याच पुस्तकाच्या स्टॉलवर पुस्तक पाहत चाळत होते.दुसऱ्या ठिकाणी हेच ,वेळेचे बंधन नसल्याने माझा नवरा आणि मुलगी मला टाटा करून पुढे निघून गेले.अनेक पुस्तकं जी नगरात पाहायलाही मिळत नाही ती जवळपास सर्वच पाहिली.इंग्रजी पुस्तकेही बरीच होती,तिथे गर्दीही भरपूर होती.मी प्रामुख्याने गीतारहस्य(लोकमान्य टिळक) पुस्त,पैशाचे मानसशास्त्र(मराठी , इंग्रजी दोन्ही भाषेत घेतले),हस्ताचा पाऊस(माडगूळकर),ज्ञानदेवा तिथे समाधी(राहूल देशपांडे), संस्कृती (इरावती कर्वे) , बिझिनेस महाराजा इत्यादी पुस्तके घेतली.थोड्या वेळाने लेकीची परत भेट झाली .तीला देखील पुस्तकांची गोडी निर्माण व्हावी म्हणून मुद्दामाहून आणले होते.ते सफलही झाले कारण घरी असलेली अनेक पुस्तके तिने ओळखून "आई हे आपल्या घरी हे पुस्तक आहे" असं सांगितलं :).रा.चि.ढेरे, कुरुंदकर ,इरावती कर्वे अशा अनेक आवडत्या लेखकांची सर्व अज्ञात पुस्तकेही पाहायला मिळाली.इथे सातवाहन गाथा सप्तशती पाहायला मिळाले.पण आता खुप उशीर झाला होता १२-४ असा वेळ इथे होते.एक तरी लेखक भेटतील अशी आशा होती पण ते घडलं नाही. फर्ग्युसन महाविद्यालय पाहत फिरत बाहेर आले.बाप लेकीने आधीच पोटोबा फुल्ल केला होता.जवळच वैशाली,वाडेश्वर आहे हे माहिती होतं.पण खूप दमलो होतो समोर ' रौनक' पावभाजी होती तिथेच गेलो.मस्त झाडांच्या सावलीत टेबल होते.पुण्यातलं पहिले १९६७ साली पावभाजीचे हे रेस्तराँ आहे असं तिथे लिहिले होते.पुण्याची पावभाजी तिखट नसणार म्हणून त्यांना तिखट द्या असं मुद्दामहूनच सांगितले.खुपच सुंदर सजवलेली (प्रेझेंटेशन)पावभाजी आणि बरोबर तिखट लसूण आलं सरबरीत चटणी,तिखटातला चिरलेला कांदा बरोबर आला.इतकी छान सर्व्हिस पाहून छान वाटलं.पुण्यात गोष्टींची 'गुणवत्ता' हाच महत्त्वाचा निकष परत दिसला.एफसी रोडवर जरा फेर फाटका मारून परत घरी निघालो. ई उ क च थ

In reply to by Bhakti

रामचंद्र 23/12/2024 - 22:05
वाचन ही शांत वातावरणात चालणारी प्रक्रिया आहे याचे थोडेसुद्धा भान आयोजकांना नसावे याचे वाईट वाटले. संध्याकाळच्या वेळेस तिथं जावं तर तिथंच चाललेल्या संगीताच्या कार्यक्रमामुळं कानठळ्या बसत होत्या. अर्थात एकंदरीतच आयोजनाच्या बाबतीत उत्सवी वातावरणात वाचनसंस्कृतीचे भान ठेवून शांत वातावरण, डोळ्याला त्रासदायक होणारा प्रखर प्रकाश टाळणे अशा गोष्टींची अपेक्षा करणं जरा जास्तच होतं याची पुरेशी जाणीव झाली आहे. बाकी हिंदी पुस्तकांच्या तसेच मराठवाड्यातल्या, तितकेसे प्रसिद्ध नसलेल्या स्टॉलवरही वेगळी, वाचनीय पुस्तकं पहायला मिळाली याचा आनंद आहे.

In reply to by Bhakti

Bhakti 21/03/2025 - 22:45
वाचाल तर आनंदी होणार अ सकाळ पुस्तक महोत्सव २०२५, अहिल्यानगर. पुणे बुक फेस्टिवलच्या धर्तीवर अगदी भव्य नाही पण बरेचसे मोठे , चांगली पुस्तके असणारे पुस्तक महोत्सव नगरमध्ये २१-२४ मार्च दरम्यान भरले आहे.पुढचे काही दिवस व्यस्त असल्यामुळे आजच फेरफटका मारला. नेहमीप्रमाणे पुस्तकाच्या दुकानात,प्रदर्शनात मला वेळेचे भान उरत नाही.तेव्हा तू एकटीच जा असं घरून सांगण्यात आले,फक्त मोबाईलची बॅटरी संपायच्या आधी घरी ये असंही सुनावण्यात आले. लोकप्रिय साहित्यिकांची पुस्तके ऑनलाईन सहज मिळतातं पण अशा प्रदर्शनात नवे पुस्तक समजतात.पुस्तकांना हातात घेऊन,पाने चाळत, अनुक्रमणिका पाहत ते पुस्तक घेणं निराळं सुखच असते. कादंबरी मी वाचनालयातून मिळालेल्या पुस्तकांतून वाचते. तेव्हा संस्कृती, अध्यात्मिक, वैज्ञानिक, समाजजीवन, निसर्ग,इतिहास,भटकंती विषयांची पुस्तके घेण्याकडे कल असतो. तरीही आनंद नाडकर्णी, ग्रेस, अच्युत गोडबोले,जयवंत दळवी,नरहर कुरुंदकर,नरेंद्र दाभोळकर यांची काही पुस्तके हेरुन ठेवली आहेत,लवकरच घेईन. मी घेतलेली अनवट पुस्तके- १.येई परतुनी ज्ञानेश्वरा' आज मला नवीन लेखक समजले डॉ.रा.श्री.मोरवंचीकर डॉ. रा. श्री. मोरवंचीकर आजही ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात अखंड नंदादीपासम तेवत आहेत. त्यांनी 'येई परतुनी ज्ञानेश्वरा' हा मराठी लोकमानसाच्या जिव्हाळ्याचा ग्रंथ अध्यायनिहाय अनेक अंगांनी उलगडला आहे. त्यातील सचित्र ओव्यांचे मार्मिकपणे केलेले निरूपण पाहून त्यांच्या ज्ञानेश्वरांप्रती असलेल्या उत्कट प्रेमाचा अनुभव दिसतो. २.निसर्गायण दुसरे नव्याने समजलेले लेखक निसर्ग आणि विकास अभ्यासक दिलीप कुलकर्णी . पर्यावरणाची समस्या ही अशा प्रकारे बाह्य निसर्गातील असली, तरी तिचं मूळ आहे आपल्या मनोवृत्तीत -आपल्या विचारांत. आपली भोगवादी वृत्ती, हाव, आक्रमकता ही या समस्येला कारणीभूत आहे आणि केवळ ही एकच नव्हे, तर शस्त्रस्पर्धा, दुर्बलांवरचे अत्याचार, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, मानसिक तणाव, स्वैराचार अशा अनेक समस्या त्याच मनोवृत्तीमुळे आपल्यासमोर उभ्या ठाकल्या आहेत.आधुनिक पाश्चात्त्य विज्ञान आणि प्राचीन पौर्वात्य तत्त्वज्ञान यांच्या आधारे या बदलाची दिशा शोधणारं हे पुस्तक. ३. थर्ड ॲंगल हे छोटेखानी पुस्तक हटके विषयावर म्हणजे ' थिअरॉटिकल मित्राने प्रॅक्टिकल क्लबमध्ये केलेली भाषणे एक वैचारिक अनोखा अनुभव आहे. मनाची नित्य नाव पुस्तकाच्या पानांनी वल्हवली जातात मग आयुष्याचा भवसिंधु सहज तरुन जातो ज्ञान सागराची ओढ अजुनच सहज पूर्ण होते... -भक्ती

कंजूस 23/12/2024 - 06:56
अरे वा! पुस्तक प्रदर्शन गाजलं. आता दरवर्षी होईल. तुमच्या मुलीसाठी पर्वणीच. ( आउटलेट छायाचित्रं काढण्यासाठी होते.= कटाउटस) फार पूर्वी मुंबईत (आझाद मैदान) आणि दिल्लीत ( प्रगती मैदान) येथे मोठे पुस्तक प्रदर्शन आलटून पालटून एक वर्षाआड होत असे. नंतर मुंबईतील बंदच झाले. मग छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवून लागला सुंदराबाई हॉलमध्ये. पण मराठी पुस्तके नसत ( ती साहित्य संमेलनांत अधिक). अक्षर वाङमय यांनी काही वर्षे प्रदर्शने भरवली. माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात. स्थानिक नगरवाचनालयात काही वाचायला मिळतात. पण मोठी बाडं कधीच येत नाहीत. स्थानिक प्रकाशकांनी एक होऊन एक कायमची तारीख किंवा आठवडा प्रदर्शन भरवण्यासाठी निश्चित केला तर वाचकांच्या कायम लक्षात राहील. उदाहरणार्थ डिसेंबरचा दुसरा आठवडा.

In reply to by कंजूस

Bhakti 23/12/2024 - 08:15
सॉरी,माझी भयानक डिक्शनरी ;) =)(कटआऊट)
माझ्या दृष्टीने पुस्तकं चाळायला मिळणे महत्त्वाचे कारण विकत घेत नाही. विकत आणून नंतर करायचे काय हा प्रश्न असतो. तरी भाषा शिकण्यासाठीची पुस्तके घेतो ती संग्रही आणि संदर्भासाठी कायम लागतात.
खरं आहे,अशा मोठ्या प्रदर्शनात खुप पुस्तकं पाहायला ,चाळायला मिळतात हे महत्त्वाचे.माझा पुस्तक घेण्यासाठी हव्यास होता त्यामुळे बजेट संपल्यावर पुस्तक फक्त पाहण्याचं ऑड वाटू लागले.पुढच्यावेळी जरा याबाबत सतर्क राहीन ;) होय लेकीसाठी हळूहळू एम एच १२ केंद्रबिंदू (पर्वणी) तयार करणार आहे!

In reply to by Bhakti

हे पुस्तकं खरेदी करण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. आणि डोंबिवली हे केंद्रस्थानी असल्याने, डोंबिवली येथे उत्तम पुस्तके मिळतात.

In reply to by मुक्त विहारि

बुकगंगा,अक्षरधारा,ॲमेझोन सारख्या संस्थळावर पुस्तके स्वस्त आणी घरपोच येतात. मागील वर्षापेक्षा या वर्षी अधिक चांगले प्रदर्शन होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

अरेरे. उशीर झाला. पहिला प्याला बर्‍याच वर्षांपूर्वी पिऊन झाला आहे :(

In reply to by श्रीरंग_जोशी

होळी, वजा तीस तापमान. शेवटचा प्याला मार्च १९९९,प्रसंग मारूती आठशे पहिली चार चाकी घेतली. व्यसनाधीन झालो का ?नाही, प्रत्येकाच्या इच्छाशक्ती वर आवलंबून. दारू पिली पाहीजे असे काही नाही. पण अती परिचयात अवाज्ञा तद्वत दारूला डोक्यावर चढवून नये. अर्थात माझे मत.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 23/12/2024 - 12:21
बरोबर. रोज थोडी थोडी घरीच घ्यावी म्हणजे त्यातली गंमत सामान्य होते. आणि कधी प्रसंगाप्रमाणे जे पितात भरपूर तसं होत नाही. कितीही कोणतेही दारूचे ब्रांड आले तरी बेसिकली अल्कोहोल अमुक टक्के यापलिकडे काही नाही. तांदुळाचेही तसेच आहे पंधरा रुपये ते सातशे पन्नास रुपये किलोचा असो त्यांचे पोषणमूल्य समानच असते. सगळे पॉलिश केलेलेच असतात. हातसडीचे कुठे मिळतात?

In reply to by कंजूस

ये इंतजार गलत है के शाम हो जाये जो हो सके तो अभी दौर-ए-जाम हो जाये मुझ जैसे रिंद को भी तूने हश्र मे या रब बुला लीया है तो, कुछ इंतजाम हो जाये हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो पियो लेकिन रखो हिसाब, के थोड़ी-थोड़ी पिया करो

In reply to by कर्नलतपस्वी

कौन कहता, अंगुर की बेटी गलत है अंगुरके दामाद को बस इसकी लत है इसके साथ कुछ गम गलत करता है तो बेरहम जमाने क्या जाता है,अगर... वो उसके साथ कुछ पल बिताता है

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 23/12/2024 - 12:23
सर्व विषे कमी प्रमाणात औषधेच असतात. अगदी तंबाखू, चहा, अफू,अर्सेनिक सुद्धा.

कंजूस 23/12/2024 - 12:39
आशिष बुक स्टॉल छत्रपती टर्मिनस जवळचा खाजगी बुक स्टॉल आशिष दरवर्षी प्रदर्शन भरवू लागला सुंदराबाई हॉलमध्ये. यांच्या पुस्तक प्रदर्शनात भेटी दिल्यावर एक लक्षात आलं की यामध्ये पुस्तके कोण घेतो. इंटिरिअर डेकोरेशनचा व्यवसाय करणारे मुंबईत बरेच आहेत. ते इकडे फिरतात. भरपूर रंगीत चित्र असलेली जाडजूड पुस्तके तिथे निम्म्या किंमतीत असतात. ती त्यांना हवी असतात नवनवीन फर्निचरच्या डिझाइनसाठी. शिवाय गार्डनिंग लेआउटचीही असतात. आर्किटेक्ट नाही पुस्तके लागतात. मोठ्या बास्केट घेऊन फिरतात आणि भराभर पुस्तके उचलतात. तरुण मुलं मुली इंग्रजी कादंबऱ्या विकत घेतात. काही महिला कुकींगची पुस्तके बघतात. आपण जी मराठी साहित्यातील कवितासंग्रह, कादंबऱ्या विकत घेतो त्याचा आनंद आठ दिवसांत संपतो. इतिहास,भाषा यांचे अभ्यासक पुस्तके घेतात ती त्यांच्या कामाची असतात. पण मग असा विचार येईल की वाचकांनी पुस्तके विकत घ्यावीत का? वाचनालयांनी घ्यावीत. म्हणजे महिन्याच्या फीमध्ये साहित्य वाचता येईल.

In reply to by कंजूस

विना अनुदानित, वाचनालये आता ओस पडत चालली आहेत. डोंबिवली येथे एक फ्रेंड्स लायब्ररी सोडली तर बरीचशी वाचनालये बंद पडली आहेत. मानपाडा रोड वरील ३ वाचनालये, डोंबिवली पश्चिम येथील एक वाचनालय, midc मधील एक वाचनालय, ही काही ठळक उदाहरणे. रामनगर मधील एक वाचनालय आणि P ,& T मधील एक वाचनालय, फ्रेंड्स लायब्ररीच्या सहयोगाने चालतात. त्यापेक्षा पण भयावह स्थिती, अभ्यासक्रमा व्यतिरिक्त , पुस्तक विक्रेत्यांची आहे.... कालाय तस्मै नमः....

कंजूस 27/12/2024 - 06:03
गोवा पर्यटन/ कोकण/समुद्री पर्यटन गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. तिसऱ्या भागात हिवाळी सहल, दक्षिण गोवा :भाग 3 : बटरफ्लाय बीच आणि लोलये-पैंगिण चे वेताळ गोवा आणि कोकण यांच्या पर्यटनाची तुलना फायदे तोटे यांची प्रतिसादांतून चर्चा फारच वाढली. ती इकडे करता येईल. धाग्यातली चर्चा इथे कॉपी पेस्ट करताही येईल पण तो त्या प्रतिसादकर्त्या लेखकांचा अधिकार आहे. मीही पूर्वी गोव्यावर एक धागा काढला होता ते आठवले. माझा समुद्र पर्यटन, खाणे पिणे वगैरेंचा आनंद फारच संकुचित आहे. तरी एकदा गोवा काय आहे म्हणून पाहण्यासाठी गेलो होतो. परतताना कुडाळहून( कोकण) आलो. एसटीचाच प्रवास त्यामुळे जमेल तेवढे पाहिले. गोव्याच्या पर्यटनाबद्दल ऐकले वाचलेले भारतातले आणि परदेशी पर्यटक इथे येतात. आनंद घेतात आणि पुन्हापुन्हा येतात. गर्दी वाढली की ट्रेनची तिकिटे मिळत नाहीत. विमान आणि हॉटेल्सचे भाडी दर वाढतात. परवडण्याच्या पलिकडे जातात. तरीही पसंती असते. कोकण ( महाराष्ट्रातला) याबद्दल श्री.ना. पेंडसे किंवा जयवंत दळवी किंवा इतर लेखकांच्या कथा कादंबऱ्यांतून मराठी वाचकांना माहीत झालेला असतो. तो खरंच कसा आहे हे पहाण्यासाठी ठाणे,रायगड, सिंधुदुर्ग जिल्हेसोडून उर्वरित महाराष्ट्रातील दूरच्या ठिकाणांहून पर्यटक येतात. त्यात किहीम, अलिबाग, श्रीवर्धन,हर्णे मुरुड, रत्नागिरी परिसर, देवगड, मालवण, देवबाग ही ठिकाणे येतात. कोकण आणि गोव्याप्रमाणेच कर्नाटकातील २६० किमी किनारपट्टीवरही कारवार,गोकर्ण, मुर्डेश्वर, उडुपी, मंगळुरू ही ठिकाणं आहेत. तीही पाहिली. हॉटेल्स(राहाणे आणि खाणे शाकाहारी तसेच मासाहारी), बसप्रवास यादृष्टीने फारच चांगल्या सोयी आहेत. शिवाय किनारपट्टीसोडून वरती घाट चढून गेल्यावरही अनेक सुंदर ठिकाणी जाता येतं. मार्चपर्यंत वाहणारे धबधबे आहेत. इथल्या लोकांना पर्यटक येण्याची सवय आहे. त्यांचा त्रास वाटत नाही . तुसडेपणा नाही. मला कर्नाटक पर्यटन फार आवडले आणि पुन्हा जावेसे वाटते. किनारे स्वच्छ चांगले आहेतच शिवाय नद्याही बारमाही पाणी वाहणाऱ्या आणि अतिशय स्वच्छ पाण्याच्या आहेत. नदीकिनारी जी धार्मिक स्थळे आहेत ती निसर्गसौंदर्याने अधिकच चांगली वाटतात. सह्याद्रीचा सुंदर निसर्ग पाहावा तर इथेच. उडुपी आणि मंगळुरू येथे समुद्र पर्यटन आणि मत्स्याहारही खूप प्रचलित आहे.

In reply to by कंजूस

गवि 27/12/2024 - 08:33
https://www.youtube.com/embed/Jhsq0fdiEq0 गोवा पर्यटन मंत्री यांची मुलाखत. ही सोशल मीडियावर सर्वत्र सुरू झालेली चर्चा हा चुकीच्या (चायनीज) आकडेवारीवर आधारित एक प्रोपागांडा आहे असे त्यांचे म्हणणे त्यांनी इथे मांडले आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 27/12/2024 - 12:16
गोरगावलेकर यांनी केलेल्या गोवा पर्यटनाचे धागे येत आहेत. त्यांचे अनुभव लिहित आहेत. धाग्याच्या पहिल्या भागात आम्ही मडगाव स्टेशन ते कोलवा बीच पर्यंत प्रवास केला होता . स्टेशनच्या बाहेरच प्रीपेड टॅक्सी मिळाली . टॅक्सिवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही . दुसऱ्या भागात कोलवा ते पाळोळे पर्यंत प्रवास केला . पर्यटन स्थळे बघत जात आम्ही जवळपास पूर्ण दिवस घेतला व त्यात पाच - पंचवीस किमी अंतर जास्त झाले त्याचे वाढीव पैसेही दिले . किती खर्च येतो हे कळावे इतकाच लिहिण्यामागचा उद्देश . आज कुठल्या शहरात स्विफ्ट डिझायरचे संपूर्ण दिवसासाठी ३ १ ० ० /- रुपये भाडे असेल ? ड्रायव्हरचा पगार , गाडीची देखभाल दुरुस्ती, इंधन खर्च जाऊन मालकाच्या हातात कितीसे पैसे जातील ? कोला बीचला जातांना अगदी ओबड धोबड रस्त्यावरून गाडी गेली . स्वत : ची गाडी नेतांनाही विचार करावा लागेल असा रस्ता . कुठलीही कुरकुर न करता शक्य होतील ती ठिकाणे दाखवली . येथेही गाडीवाल्यांचा कथित मुजोरपणा दिसला नाही .

In reply to by गोरगावलेकर

गवि 27/12/2024 - 13:15
मुजोर म्हणजे बोलण्यात अशा अर्थाने नसावं. पण अतिरिक्त मनाला येईल तितके पैसे मागणे हे अनेकदा घडते. पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली. एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००. तुलनेसाठी असे पाहा की मुंबईहून गोव्याचे विमान तिकीट देखील कधी कधी याहून कमी असते. वार्का ते काबो द राम किल्ला आणि परत इतक्या अंतराचे हॉटेलशी संलग्न टॅक्सीवाल्यांनी सुमारे आठ वर्षांपूर्वी तीन हजार घेतले आणि वरून टिप मागितली. वाटेत कुठे थांबायला देखील तयार नव्हता. नव्वद टक्के वेळा मुंबईपासून स्वत:ची कारच घेऊन जाणे किंवा एअरपोर्टवर उतरताच पूर्ण मुक्कामाइतकी सेल्फ ड्राईव्ह कार घेणे हे दोन उपाय करून ही समस्या आता सोडवली आहे. बाय द वे, गोव्यातील स्थानिक लोक कोंकणी भाषेच्या सवयीनुसार एकेरीत अरेतुरे करत बोलतात आणि त्या स्टाईल मुळे काही वेळा बाहेरील लोकांना ते अशिष्ट उद्धट उगीचच वाटू शकतात.

In reply to by गवि

कंजूस 27/12/2024 - 14:58
सहमत. खाजगी वाहनाशिवाय तसेच भाड्याच्या वाहनाशिवाय जमेल तेवढे फिरणे आणि आनंद मानणे हेच आमचे ध्येय असते. त्यामुळे काही त्रास /संताप होत नाही. शेअरिंग साठी कुणाला तयार करणेही नाही. म्हणजे अगदीच घरी कॉटवर पाय हलवत गप्पा मारण्यापेक्षा चार ठिकाणं पाहाणे बरे या रुळावर आमची गाडी सुसाट धावते. शिवाय खरेदी करायची नाही हे ठरवूनच टाकले आहे. आमचा गाईड लोनली प्लानेट पुस्तक " India travel survival kit " - Tony Wheeler and others.

In reply to by गवि

टर्मीनेटर 29/12/2024 - 13:08
"पूर्ण दिवसाचे ३१०० इतकेच घेतले असतील तर तुम्हाला नशिबाने चांगले डील आणि व्यक्ती लाभली."
काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असला पाहिजे अंऽऽऽ..." कोचरेकर मास्तर : "पाहिलंत? पाहिलंत... माणुसकी नाही.. नाही म्हणतात ना?... ही घ्या माणुसकी! प्रवासात काय अनुभव येतील सांगता येत नाही. वास्तविक असल्या ह्या लोकांचे जाहीर सत्कारच करायला पाहिजेत. त्याचे नाव, नंबर वगैरे आपण टिपून घ्यायला पाहिजे होता नाही का..."
"एरवी कोपऱ्यावर सोडून यायचे सहाशे (हे उदाहरण मे २०२४ मधलं, ऑफ सिझन काळ. अंतर दोन ते तीन किमी. पार्किंग नसल्याने टॅक्सी मागवावी लागली होती.). नुसती चौकशी केली होती तेव्हा, दाभोळी एअरपोर्ट ते अगोंद वन वे नुसते ड्रॉप करण्याचे ऑफ सिझन २००० आणि सिझन मध्ये ३५०० ते ४०००."
सोकाजीनाना त्रिलोकेकर : "ए नाडकर्णी, बघ... बघ! बघ लेका तुझा कोकणातला व्हिक्टोरिया (टॅक्सी) वाला... " काशिनाथ नाडकर्णी : "तो कोकणांतला असणंच शक्य नांयऽऽऽ... अहो तो कोकणात व्हिक्टोरिया (टॅक्सी) चालवायला शिकणार कुठून मला सांगा बघू आंऽऽऽ... कायत्तरी काय? आमच्या कोकणातले म्हणजे सगळे बैल..." 😀 भ्रमण मंडळ - बटाट्याची चाळ गोव्याला असंख्य वेळा जाउनही तिथल्या सार्वजनीक वाहतुक व्यवस्थेचा आणि टॅक्सीवाल्यांचा मला फारसा अनुभव नाही. ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात दोना पावला येथील मुक्काम असलेल्या 'इंटरनॅशनल सेंटर गोवा (ICG)' येथुन त्यांच्याचतर्फे संध्याकाळी तिथुन सुमारे सात किमी अंतरावर असलेल्या कॅसिनो पर्यंत जाउन मध्यरात्री तिथुन परतण्यासाठी घेतलेल्या टॅक्सी सेवेसाठी त्या टॅक्सीवाल्याने (आधीच बोलणी केल्याप्रमाणे) संध्याकाळी जाताना ड्रॉप साठी ३०० रुपये आणि मध्यरात्री तिथुन निघताना फोन करुन बोलवल्यावर पिक-अपसाठीचे ५०० रुपये असे जाउन-येउन एकुण ८०० रुपये घेतले होते. मध्य्ररात्री १:३० च्या नंतर फोन करुनही तो सांगीतल्याप्रमाणे परत न्यायला आला होता हे विषेश! असो, मिपाकरांना त्याठिकाणी आलेले टॅक्सीवाल्यांचे वेगवेगळे, बरे-वाईट अनुभव वाचुन माहितीत भर पडत आहे 👍

In reply to by गोरगावलेकर

विमानतळावरून आपल्या हॉटेलवर किंवा आपल्या हॉटेलवरून विमानतळावर जायचे असेल तर टॅक्सीवाल्यांचे अवाच्या सवा दर आहेत याचा मला तरी अनुभव आला नव्हता. आम्ही गोवा विमानतळापासून सगळ्यात लांब राहिलो होतो अगोंद आणि पाटणेला. दोन्ही ठिकाणी जायला विमानतळाहून १८०० रूपयात प्रीपेड टॅक्सी मिळाली होती. अर्थात ही अनुक्रमे २०१७ आणि २०१८ ची गोष्ट. सध्याचे दर किती हे माहित नाही. मात्र दोन्ही ठिकाणे दाबोळी विमानतळाहून साधारण ६०-६५ किलोमीटर अंतरावर आहेत. अंतर ध्यानात घेता तो दर अवाजवी जास्त आहे असे वाटले नव्हते. विमानतळावर समजा प्रीपेड टॅक्सी असते आणि त्यांना ठरवून दिलेले दर आहेत तितकेच घ्यावे लागतात. पण परतीच्या प्रवासात हॉटेलवरून विमानतळावर जातानाही टॅक्सीवाल्याने तेवढेच पैसे घेतले होते. अगोंदहून परत येताना आमचे विमान रात्रीचे होते त्यामुळे दाबोळी विमानतळावर रात्री साडेनऊच्या सुमारास पोचलो होतो. त्या वेळेस विमानतळावरून भाडी मिळत असतील की नाही शंकाच आहे कारण त्यावेळेनंतर फार विमाने येत नाहीत. तरीही त्याने जास्त पैसे घेतले नव्हते. टॅक्सीवाले अवाच्या सवा दर लावतात ते हॉटेलबाहेर साईटसिईंगला जाणार्‍यांकडून. वारकामध्ये आम्ही उतरलो होतो वारकाला आमच्या हॉटेलच्या बाहेर पर्यटकांसाठी म्हणून एक टॅक्सी स्टॅन्ड होता. तिथून मडगाव फार तर १०-१२ किलोमीटरवर होते. काजू आणि बेबिंका अशा गोष्टी घ्यायला मडगावला जायचे होते तेव्हा हॉटेलबाहेरील टॅक्सीवाल्यांनी जाऊन येऊन २७०० रूपये सांगितले होते. आणि ही गोष्ट २०१२ ची होती म्हणजे आणखी जुनी. ही अक्षरशः लूट होती. मला वाटते तिथे जास्त गोरे पर्यटक येतात आणि परदेशी पर्यटकांना अवाच्या सवा दर लाऊन लुटणे हा प्रकार नाही म्हटले तरी सगळीकडे होतोच. जर ते गोरे पर्यटक असे वाढीव दर द्यायला तयार होत असतील तर टॅक्सीवाल्यांना बहुदा आम्हा भारतीय पर्यटकांची गरज नसावी. त्यामुळे यायचे असेल तर या दरात या नाहीतर येऊ नका असा त्यांचा दृष्टीकोन होता.

गेल्या काही महिन्यांपासून माझी पत्नी सौरभ बोथरा यांच्या ऑनलाइन योगासन वर्गांना उपस्थिती लावत आहे. मी देखील महिन्याभरापासून सुरुवात केली आहे. शीर्षकात जरी केवळ योग असले तरी, योगासनांखेरीज, इतर कार्डिओ व श्वसनाचे व्यायाम, प्राणायम व थोडेफार ध्यान यांचाही या वर्गांत अंतर्भाव असतो. रोज युट्युब लाइव्ह द्वारे भाप्रवे नुसार सकाळ व संध्याकाळी हे वर्ग चालतात. सूचना सहजपणे समजतील अशा असतात व स्क्रीनवर पाहून आपण ते व्यायामप्रकार करू शकतो. ६ जानेवारीपासून तीन आठवडे या वर्गांचा नि:शुल्क लाभ घेता येईल - त्यासाठीचा दुवा. या वर्गांना काही दिवस उपस्थिती लावल्यावर, असे वर्ग आपल्याला काही वर्षे अगोदर का नाही मिळाले अशी भावना आमच्यासह बहुतेकांच्या मनात निर्माण झाली आहे / होत असते.

In reply to by श्रीरंग_जोशी

कंजूस 29/12/2024 - 04:00
ती साईट पाहिली. नोंदणी केली नाही. उपक्रम आणि ओनलाइन आहे हे बरे. काही शाळांत योगासने शिकवतात बहुतेक. आमच्या शाळेत शिकवली होती. पाचवी पासूनच . लहानपणी केली नाही तरी चालतात. कारण तेव्हा वाढते तरुण वय असते. पण नंतर कधी करायची झाल्यास छोट्या पुस्तिका विकत मिळतात त्या पाहिल्या की काही सोपी रोज करण्याची आसने दहा बारा आहेत ती करता येतात. चीनमध्ये तिथल्या बागांत ( parks) ६०+, ८५+ वयोगटातील नागरिकांसाठी काही त्यांच्या पद्धतींचे व्यायाम प्रकार करणारे करवून घेणारे गट असतात. त्यांचे काही विडिओ मी मागे पाहिले होते ( dwtv channel documentaries बहुतेक.) त्यांचे व्यायाम प्रकारही खूप चांगले वाटले. विशेषतः शरीराची रोजची हालचाल करण्यासाठीचे ते सराव आहेत. वरील दोन वयोगटांच्या वयाप्रमाणे हालचालींचा वेग वेगळा दिसला. इकडच्या काही बाबा लोकांचे योग प्रकार मला काही आवडले नाहीत. अतिरंजीत वाटले. ....... वजन कमी करणे/ हालचालींसाठी सराव/ रोग नियंत्रण/ मानसिक समाधान शांती यांपैकी एक किंवा सर्व असा काही झोल योगासनांमध्ये घालण्याचा खटाटोप दिसतो हे माझे मत.

Bhakti 29/12/2024 - 14:44
हरारीची मुलाखत रणवीरने घेतली.हरारी माझा आवडता विचारवंत आहे.तो भारतात नेक्सास' पुस्तक प्रकाशित करण्यासाठी आला होता.तेव्हा अनेकांना त्याच्याबरोबर मुलाखती घेतल्या. १. https://youtu.be/eNVtYPgJ6b0?si=3VfqDjCcx6_lYjk2 २. https://youtu.be/6x4UgHI7qbk?si=_Iz_eP9HF7SYH-ZM दुसरी मुलाखत अजून ऐकायची आहे. पहिली मुलाखत रणवीरने घेतली आहे.AI हा हरारीचा १० वर्षांपूर्वी पासूनचा विषय आहे.जो AI वर वरचढ होईल तोच पुढच्या काळात जगावर राज्य करणारे.इथे रशिया,ट्रम्प यांचा वर्चस्ववादी भूमिकेचा त्याने चांगला समाचार घेतला आहे.अमेरिकासारख्या बलाढ्य देशाने,लीडरने जगाच्या शांततेचा विचार आधी केला पाहिजे तरच माणूसकी टिकेल असं त्यांचं म्हणणं आहे.रणवीरचा शो म्हटला की तो स्पिरिच्युलिटीवर समोरच्याला बोलायला लावणारच हे ठरलेलं आहे 😀 त्यात हरारी विपश्यनेचा साधक आहे. पण हरारी म्हणतो कोणीही कोणाला दोन ,तीन तास ध्यानाला बसा हे म्हणणं सोपं आहे.पण पंधरा मिनिटे तरी केवळ स्वतःच्या आता बाहेर जाण्याऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा.इतर कोणताच विचार डोक्यात आणायचा नाही,हे सांगितले तर कोणालाच हे फारसं जमणार नाही.यासाठी खुप तयारीच हवी.मेडिटेशन कसं करायचं, कोणतं करायचं हे ज्याचं त्यालाच ठरवू द्या.उगाच मेंढ्याचा कळप करण्यात अर्थ नाही. युद्ध करावं की नाही याबाबत त्याचं मत मला गोलगोल वाटलं,आधी तो म्हणाला मिलिटरी वर ५०% हून अधिक खर्च चिंताजनक आहे नंतर म्हणाला इस्राएल आणि भारताने ज्या चुका रोमन व मुस्लिम+ब्रिटिश आक्रमणाच्या काळात सैन्य ताकद वाढवण्यावर भर देतात केली ती त्यांना आता करणे अजिबात परवडणारं नाही👏

In reply to by Bhakti

कंजूस 29/12/2024 - 15:53
मराठी किंवा कुणीही. आंतरराष्ट्रीय मते राजकीय/ सामाजिक / धार्मिक ही नेहमी ती व्यक्ती कोणत्या डोक्यातली आहे त्याप्रमाणे एकांगीच असतात. विरुद्ध गटाचा साधा उल्लेखही नसतो. तर काहींची प्रसिद्ध केलेली व्यक्तव्ये त्यांच्या देशाच्या राजकीय दडपणाखालीही असतात.

कंजूस 31/12/2024 - 20:43
पहिला काचेचा पूल काल कन्याकुमारी, तमिळनाडू इथे असलेल्या विवेकानंद स्मारक आणि तिरुवल्लूवर पुतळा या दोन ठिकाणांमध्ये काचेचा पूल उभारला त्याचे उद्घाटन झाले. hindustan times बातमी

कंजूस 03/01/2025 - 11:27
खरडफळ्यावर विषय निघाला म्हणून......... गुजरातचे सुंदर समुद्र किनारे आणि पर्यटन. फार प्रचलित नाही तरीही थोडक्यात... गुजरातध्ये {सूरतजवळच्या} हजिरा येथे आणि जामनगर येथे दोन मोठे रासायनिक प्रकल्प ( भारतीय कंपन्या, रिलायन्स) अगोदरच आहेत. सूरतजवळच्या दहेज बंदरातून - घोघा पलिकडे जाऊन भावनगरला काही जण जातात. धार्मिक पर्यटन. दीवचा किनारा पर्यटनासाठी आहे. तिथून वेरावळ - सोमनाथ आहे. पण धार्मिक महत्त्व आणि मासेमारी. दमणचा किनारा काळा आहे. मासेमारी बोटींच्या डिझेलमुळे. जवळचा परिसर दारूबार आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटसाठी पूर्वी प्रसिद्ध होता. आता त्याचे महत्त्व उरले नाही. तरीही दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते. द्वारका पोरबंदर समुद्र -धार्मिक पर्यटन अंकलेश्वर/अंकलेसर भरूच हे नर्मदा पर्यटनामुळे चर्चेत असते. गुजरात - महाराष्ट्र सीमेजवळचे डहाणू आणि बोर्डी येथे हॉटेल्स खूप आहेत. डहाणू-जव्हार- त्र्यंबकेश्वर -नाशिक - सापूतारा असाही सहल प्लान होऊ शकतो. गुजरात समुद्र किनारे थंडीतच ठीक. गरमा फार असतो. काही ठिकाणी रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. मुंबई पुणे पर्यटकांसाठी कोकण, गोवा, कर्नाटक समुद्रच बरा.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 14:19
दमण- वापी- दादरा नगरहवेली- खानवेल ( गार्डन्स) अशी सहल होऊ शकते.
दमण किनारे घाणेरडे. केमिकल आणि वास. अस्वच्छ. हल्ली काही भाग बांधून चौपाटी केली आहे असे ऐकले पण एकूण समुद्र घाण. खूप इंडस्ट्रीज. सिल्वासा कंटाळवाणे. सर्वसाधारण लहान शहर. उन्हाळ्यात तर अगदी नदी देखील कोरडी. तिथली वाटेतली लायन सफारी केविलवाणी. सापुतारा वगैरे हिल स्टेशन हा अधिक चांगला ऑप्शन आहे त्यापेक्षा.

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 15:50
आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते. किंबहुना काळ्या समुद्रावर फिरायला देखील मजाच येते. :))

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:00
तुमच्या इतका जोरकस, प्रगाढ, वादळी, पावसाळी, ओलाकंच, इंटेंस अनुभव नसला तरी प्रवासाचा अंमळ थोडासा अनुभव आहे इतकंच..

In reply to by प्रचेतस

गवि 03/01/2025 - 16:09
सळसळत्या वाऱ्याने एखादा प्राजक्त थरथरावा आणि खालून जाणाऱ्या आपल्या तापल्या अंगावर गार दवबिंदूंचा पडलेला पाऊस हृदयाचे मधलेच चार ठोके चोरून जावा तशी अवस्था झालेली दिसते त्या आठवणींनी.

In reply to by गवि

प्रचेतस 03/01/2025 - 17:24
हो ना. अगदीच मोरपिशी अवस्था. बाकी तुमचे अनुभवही ह्याबाबतीत दांडगेच असणार म्हणा हे तुमच्या तरल शब्दांनी सहजच स्पष्ट होते.

In reply to by गवि

टर्मीनेटर 03/01/2025 - 16:55
वरच्या वाक्यात
"आधी मद्य पिऊन मग कोणत्याही मार्केटमध्ये फिरायला मजाच येते."
असे 'कोणत्याही मार्केटमध्ये' हे दोन शब्द ठळक करायचे राहुन गेले काय 😀 नीळा, हिरवा, पिवळा, तांबडाच काय पण 'मृत' समुद्रही जर कौतुकास पात्र ठरत असतील तर बिचाऱ्या 'काळ्या' समुद्राने असे काय कोणाचे घोडे मारले आहे? ('काळ्याशार' गोष्टीही आकर्षक असु शकतात 😉) तेव्हा घ्यावी की त्याच्यावरही फिरायची मजा 😂 बाकी 'काळ्या' वरुन सहज सुचलं म्हणून... काला रे सइयां काला रे तन काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन् काला रे मन काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने तोल तोल तोल छत आँगन चार दिवारी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी सइयां करते जी कोल् बाज़ारी सइयां करते जी कोल् बाज़ारी काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काली मिटटी कुत्ता काला काला बिलकुल सुर्मे वाला काला कौवा हौवा काला काला बादल गिरने वाला काला मोती गिरने वाला काला झंडा डण्डा कला काला बटवा पैसा काला काली आँखों जैसा काला काली अग्नि काली गर्मी सूरज काला काला बीघा और गज काला काली हाथी हाथी काला काला बैरी कोल् कोल् कोल् छीने तोल तोल तोल बैरी कोल् कोल् छीने होल से टोल रंग पानी और पिचकारी सइयां करते जी पिया करते जी सइयां करते पिया करते जी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी काला रे सइयां काला रे तन काला रे मन्न काला रे काली जबान की काली गारी काले दिन की काली शामें सइयां करते जी कोल् बाज़ारी. स्नेहा खानवलकर ह्या गुणी संगीत दिग्दर्शिकेने संगीतबद्ध केलेल्या 'गँग्स ऑफ वासेपूर २' मधल्या काला रे ह्या गाण्यात गीतकार वरुण ग्रोवर ह्यांनी इतक्या काळ्या गोष्टींचा उल्लेख केलाय, पण बिचारा 'काळा समुद्र' मात्र त्यात घ्यायचा राहून गेला बघा... 😎

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 14:46
खरंतर गुजरातला समुद्र पर्यटनाला जाऊच नये. औद्योगिकरणावर गुजरातने खूप भर दिला. नवसारीपासून पुढे वरती. मुंबई बाजारपेठ जवळ पडते. सापुतारा जरी महाराष्ट्रातील पर्यटकांना आवडत असले ( नाशिक जवळ) तरी गुजरातींना आवडत नाही. त्यांचे आवडते माथेरान महाबळेश्वर पाचगणी. मुंबई पुण्याला जवळची ठिकाणं पाहून झाल्यावर जरा बदल म्हणून दुसरीकडे काही आहे का याची चाचपणी करतात. पालघरच्य पश्चिमेला दहा किमीवर केळवे माहिम किनारा आहे. पालघर -मनोर - विक्रमगड- जव्हार- त्र्यंबकेश्वर - नाशिक या वाटेवर हल्ली 'गोवर्धन इको विलेज' मिनी वृंदावन ( इस्कॉनवाल्यांचं) हल्ली लोकप्रिय होत आहे. या मार्गावर बरीच रिसॉर्ट झाली आहेत. जव्हार मोखाडा भागातील वारली चित्रकला कमी होत आहे किंवा बाजारू होत आहे असं ऐकून आहे. सहलीच्या आराखड्यात/ मार्गावर चार पाच ठिकाणे असणे फायद्याचं ठरतं . एखादं नाही आवडलं कुणाला तर दुसरं सहल यशस्वी करतं.

In reply to by कंजूस

गवि 03/01/2025 - 15:54
केळवे किनारा तर लोकांनी घाणीने कचऱ्याने भरून टाकलेला दिसला. अगदी गेल्या वर्षात काही बदल झाला असेल तर माहीत नाही. लोक तिथे पिकनिक सारखा कार्यक्रम करून, बसून खाऊन प्लास्टिक प्लेट्स, खरकटे, उर्वरित अन्न असे सर्व जागीच टाकून उठत होते. किनाऱ्यावर हागणदारी होती. पार्किंग शुल्क किंवा तत्सम शुल्क वगैरे वसुली अवश्य होत होती पण स्वच्छतेच्या दृष्टीने काही दिसले नाही. पेड टॉयलेट होते. तेही अस्वच्छ. आपले सामान्य नागरिक देखील एकूण स्वच्छतेचा सेन्स कमी असलेले आहेत असेच वाटते सगळीकडे.

In reply to by गवि

कंजूस 03/01/2025 - 16:24
हं. नवीन अपडेट्स लक्षात ठेवायला हवेत. बाकी प्रचेतसकुमार चांगल्या जागा शोधतात. पण काहीच उघड करतात. BNHS वालेही चांगल्या जागा सांगत सुटत नाहीत. फेसबुकाच्या भिंती भरल्या की लोंढे तिकडेच जातात. राजमाची, कास पठार, सांधण, हरिहर.

टर्मीनेटर 03/01/2025 - 17:47
आपल्या सर्वांच्या माहितीतले मिपाकर लेखक 'कुमार१' हे काही कामानिमित्त मुंबईला येणार आहेत. त्या निमित्ताने सोमवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ नंतर भायखळा येथे एक मिपा कट्टा करण्याचे ठरत आहे. सोमवारचा, म्हणजे कामकाजाचा दिवस असल्याने फार लांबुन कोणी येऊ शकणार नाहीत ह्याची कल्पना असल्यामुळे 'कट्ट्यासाठी' वेगळा धागा वगैरे काढलेला नाही, परंतु भायखळा परिसरात किंवा मुंबई उपनगरांत रहाणारे कोणी मिपाकर येऊ शकत असतील तर त्यांचे सहर्ष स्वागत आहे. (केवळ एकमेकांची सदिच्छा भेट आणि गप्पा-टप्पांचा कार्यक्रम एवढाच ह्या कट्ट्याचा मुळ उद्देश आहे 😀)

In reply to by टर्मीनेटर

कंजूस 03/01/2025 - 18:16
मुंबईत मिपाकर मोजून तीन चारच असतील. आणि त्यातून राणीबाग फुले प्रदर्शनाचे निमित्त साधले तर उत्तम.

In reply to by कंजूस

विजुभाऊ 05/01/2025 - 15:09
मुंबईत ( ठाणे डोंबिवली धरुन) किमान तीस एक मिपाकर सहज असतील. रामदास , शँपेन , क्लिंटन, प्रभू मास्तर , साक्षी , ज्योति अळवणी , मदनबाण असे बरेच आहेत.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 04/01/2025 - 11:34
कुमार १ आता मिपावर का लिहित नाही.त्यांना नक्की सांगा की तुमचे अभ्यासपूर्ण लेख मिपावर देत जा.

In reply to by टर्मीनेटर

Nitin Palkar 06/01/2025 - 08:18
या कट्ट्याला येतो असे कुमार१ यांना बोललो होतो. अचानक महत्वाचे काम निघाल्यामुळे येऊ शकत नाही. लवकरच पुन्हा असा योग येवो.

Bhakti 04/01/2025 - 11:43
आणि आजोबा परत जिवंत झाले! ;) लाखातून एखादा व्यक्ती इतका नशीबवान असू शकतो.हार्ट ॲटॅकमुळे मृत घोषित केलेल्या आजोबांचे शव रूग्णवाहिकेतून घरी नेताना रस्त्यावरील खड्ड्यांच्या धक्क्यामुळे आजोबांचे ह्रदय पुन्हा चालू झाले असावे.कारण नातवाला नंतर त्यांच्या हाताच्या बोटांची हालचाल दिसली.मग पुढील उपचाराला परत दुसऱ्या दवाखान्यात नेले.तर आजोबांच्या ह्रदयाचे ठोके दिसले. देव तारी त्याला कोण मारी... https://youtu.be/Y5Ap-dknaww?si=Ezn1IIWLjspCJ5Sl

In reply to by Bhakti

चौथा कोनाडा 05/01/2025 - 20:10
या घटनेची नोंद घेत महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याने सदर खड्ड्याचे मोजमाप करून तशाच प्रकारचे खड्डे विविध रस्त्यांवर पाडण्याचे नियोजन केलेले आहे. या खड्डा इफेक्टमुळे सीपीआर ची प्रोसिजर कालबाह्य होऊ शकते असे माझी आरोग्य सचिव माननीय डॉक्टर चंगावडकर श्रीपाद यांनी प्रतिपादित केले ! या नियोजित खड्ड्यांच्या कंत्राटांवरून आत्ताच वाद सुरू झालाय ! राजकीय नेते श्री अमुक प्रमुख यांनी या कंत्राटात बावीस कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. आणि या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे केली.

कंजूस 05/01/2025 - 10:24
माथेरानमध्ये पर्यटक घोड्यावर बसून जात आहेत, काही जण मिनी ट्रेन पाहात आहेत, माकडे पर्यटकांच्या खाऊच्या पिशव्या हिसकावून घेत आहेत अशा माहितीवर Chatgpt ने काढलेलं चित्र.image थोड्या चुका आहेत, अर्धवट कापली गेली आहेत दृष्य. तरी ठीकच.

कंजूस 24/02/2025 - 00:28
उन्हाळी भटकंती. काल एक भटकंती केली. खंडाळा घाटासाठी रेल्वे जिथून पळसधरी स्टेशनानंतर वर चढते त्या पहिल्या डोंगरात आहे सोनगिरी. ( मुंबईतील तरुण नवख्या ट्रेकरांचा पावसाळ्यातला आवडता ट्रेक. आणखी एक सोंडाई डोंगर माथेरानच्या चौक पाॅइंटच्या खाली आहे.) उन्हाळा सुरू झाला आहे, रान वाळले आहे तरी दुपारी बारा ते पाच तळापासून माथ्यापर्यंत (५०० मिटर्स) अतोनात डास होते. शांतपणे बसून डबासुद्धा खाता आला नाही. या उलट मागचाच डोंगर राजमाचीचा. तिथे कधीच कुठेही डास नसतात. हे असं का?

कंजूस 12/03/2025 - 10:38
वेरूळ दहाव्या लेण्यात किरणोत्सव..... लोकसत्ता बातमी. https://youtu.be/2xX1I0EUcNk?si=Q7AHHpInuRYAN6Zc असा दिसत असला तरी त्यासाठी लेण्या तशा बांधलेल्या नसाव्यात. वेरूळ लेण्या बहुशा पश्चिमाभिमुख आहेत त्यामुळे दुपारी वर्षातून दोनवेळा किरण आतापर्यंत येत असणारच. आपली देवळं मुद्दामहून पूर्वाभिमुख बांधतात. काही पश्चिम दिशेला तोंड करून. तसं लेण्यांचं नाही. बौद्ध भिक्कुंना पावसाळ्यात विश्रांतीसाठी विहार आणि लेणी आणि चैत्य बांधण्यात ( खोदण्यात) आले होते. मूळ उद्देश हा होता.

कंजूस 12/03/2025 - 10:56
विमान परत फिरवणे.... मागच्या आठवड्यात एक शिकागो ते दिल्ली विमान टॉयलेट्स तुंबल्याने परत शिकागोला नेले. https://youtu.be/ZQemz_Enpxc?si=w1SuHw86alXZ6IiW उड्डाणाचे फक्त चार तास उरले होते. मग वाटेत कुठे emergency landing या कामासाठी मिळत नसावेत का? किंवा ते देश अशि सर्विस देत नसतील?

कंजूस 19/03/2025 - 18:32
माथेरान कालपासून बंद. टॅक्सी, इ रिक्षा आणि घोडे वाले संपावर. कारण काय तर म्हणे पर्यटकांची फसवणूक करणारे विडिओ यूट्यूबवर आले. खरं कारण ... खाजगी वाहनाने येणारे पर्यटक वाढले आणि ते दस्तुरी नाक्यावरून शटल टॉय ट्रेन किंवा इ रिक्षांनी माथेरानच्या बाजार पर्यंत जातात. ते आठवड्यात कोणत्याही दिवशी येऊन जातात. हमाल, हॉटेल्स आणि घोडेवाल्यांचा धंधा जोरात चालतो. इ रिक्षा दहा आहेत. फक्त सुट्ट्या लागल्यावर येणारे पर्यटकच टॅक्सी घेतात. एकूण काय तर २७० टॅक्सी वाल्यांना धंधा मिळत नाही पण पर्यटक खूप येतात. नेरळ ते दस्तुरी नाका जाणारी एसटी मिनीबस ( पंचवीस रुपयांत) हीसुद्धा पोटदुखी आहे. फसवणूक टॅक्सीवालेच करतात. खाजगी कार्यालयांना " आमच्या टॅक्सी नेच जा असा हेका धरतात किंवा पाचशे रुपये द्या असा दम भरतात. काही शहाणे टॅक्सी वाल्यांनी मात्र पन्नास रु सीटने धंधा सुरू ठेवला आहे. ( अधिकृत भाडे शंभर रु प्रती प्रवासी असे चारांचे चारशे रुपये घेतात. किंवा पूर्ण टॅक्सी खिडकीवर जाऊन बुक केल्यास ३६० रुपये लागतात. आता प्रश्न असा आहे की टॅक्सीवाले आठवड्याच्या इतर दिवशी ओला/ उबेर/ वगैरेंनी संबंध का ठेवत नाहीत. कारण या साईट्स " मारुती इको" वाहन नको सांगतात. सर्व माथेरान टॅक्स्या याच प्रकारच्या आहेत.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 20/03/2025 - 20:29
खासगी करण : वरच्या पातळीवर अदानी- अंबानी खालच्या पातळी छोटेआका, बडेआका अणि अन असे कार्यकर्ते म्हणवणारे खंडणीकार्यकर्ते

वामन देशमुख 21/03/2025 - 13:10
माझा कालचा WhatsApp Status SohalLalTeaTime #LifeIsFunWithFriends&SohanlalTea ☕
एका जिवलगाचा प्रतिसाद -
चहा आणी आणी ते सुद्धा संध्याकाळी 7 नंतर! उन लागलं की काय वामन तुला ? काळजी घे बाबा.
माझे उत्तर - हमारे तेलंगाणा के लोओंका मालूम नै तुमारकू? सुब्बे उट्टे जब से रात को सोने तलक कब्बी बी चायाँ पीने कू रेडीच रैतें। कल क्या वा मालूम? हमारे संजय बावा होर उनके इनो आये थे हमारे इधर म्हाराष्ट्रा सें । फिर Abits कु जाने के प्लानाँ बनायें। तो मैं बोलूं, चलो बावा, कैसे बी उदर जारैं । तो व्हांपे सोहनलाल की चाय भोत सईं रैती, दूर दूर से लोआं आते पीनेकू। पीते, तुम्म? तो उनो बोले, तुम इत्ता बोलरे तो कैकु नै पीते वामन राव? फिर हम, हमारे इनो, बावा, बावा के इनो ऐसे चार जणां गए चायाँ पीनेकू। अब तुमारकू तो मालूमिच हैं, वो चायाँ वायाँ पीने के शौकां तो अपुन नै पालते। फिर वो तीन जणां चायाँ पिए। भोत अच्चे है चायाँ बोले। बोलके मई स्टेटसां लगायूँ।

वामन देशमुख 30/04/2025 - 10:55
अक्षय्य तृतीयेनिमित्त घराजवळच्या श्री वेंकटेश्वर स्वामी (बालाजी) मंदिरात सपत्नीक गेलो होतो. घरी आंब्याची पाने-झेंडूची फुले यांची तोरणे, देवांना ताजे हार,फुले, यथासांग पूजा, विशेष नैवेद्य हे झाले. गोडधोड जेवण आहे. श्री कृपेने प्रसन्न वाटते आहे. गोविंदा गोविंदा गोऽविंदा!

In reply to by कंजूस

वामन देशमुख 30/04/2025 - 15:56
मेहकरचा बालाजी?
मी हैदराबादला राहतो. घराजवळच्या (आम्ही लोकांनी बांधलेल्या) देवळात गेलो होतो.‌ यापूर्वी मेहकरच्या बालाजी मंदिरात गेलेलो आहे.‌ तेथील बालाजीची मूर्ती खूप उंच आहे. बहुधा भारतभरातील सर्वात उंच मूर्ती असावी.

वामन देशमुख 09/05/2025 - 13:44
श्रीगुरुजी हा आइडी बॅन केल्याबद्दल मी तीव्र निषेध व्यक्त करतो. ज्या मोजक्या मिपाखरांमुळे मिसळपाववर वाचक येतात त्यांच्यापैकी एक हे श्रीगुरुजी होते.‌ हे लिहिण्याचा अधिकार मला आहे व हे लिहिल्यामुळे माझाच आइडी बॅन होणार नाही ही अपेक्षा. जय हिंद. --- हे मी खरडफळ्यावरही लिहिलं होतं; कायमची नोंद राहावी म्हणून इथे पुन्हा लिहीत आहे.

In reply to by वामन देशमुख

मारवा 09/05/2025 - 13:54
श्रीगुरुजी हे अनेकवेळा अभ्यासपूर्ण संदर्भासहित मांडणीणकरात होते हे खरे आहे. काहीवेळा मतभेद असले तरी जेबकी स्वाभाविक आहे तरी त्यांची एकूण मांडणी व चर्चेला योगदान चांगलेच होते यात शंका नाही अनेकदा माहीत नसलेले संदर्भ त्यांच्यामुळे माहिती होत होते. मात्र वामनराव त्यांची भाषेची मर्यादा भंगलेली होती असेही दिसून येते. त्यासाठी त्यांना समज देऊन संधी द्यायला हवी होती असेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील संधिं द्यायाला हवी होती. असे उत्साहाने हिरीरीने चर्चा करणारे गेले तर त्याचे मला तरी नक्कीच वाईट वाटतें

सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

सांगलीचे कर्णमधूर लेझीम

स्वधर्म ·

चौथा कोनाडा 30/09/2024 - 21:05
व्वा ... मस्त माहिती ! दोन्ही व्हिडो भारी आहे... महालेझिमचा तर लै अप्रतिम आवडला ! टाळ मृदंग दिंडी क्लासिकच ! खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव ! असं वाटत, सांगलीलाच रहायला जावं ... तिथल्याच जवळच्या तांदुळवाडी गावात ४ दिवस रहायला होतो... दोन चार वेळा सांगली पार केली पण शहर दर्शन योग नाही आले. असो. मी त्या लेखात म्हटलं होतं त्या नुसार : ढोल बडवण्यावर बंदी घालून त्या जागी लेझीमला प्रमोट करायला हवे. त्यासाठी शासनाने "लाडका लेझीमनर्तक" अशी योजना सुरु करून अनुदान द्यायला हवं ! धन्यवाद स्वधर्म ..छान व्हिडो पाहण्याची संधी दिलीत !

In reply to by चौथा कोनाडा

अथांग आकाश 01/10/2024 - 11:11
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर लेझीम संगीत, त्यातलं शारिर लालत्य...वेगवेग्ळे डाव !
+१ दोन्ही व्हिडिओ आवडले!

Bhakti 01/10/2024 - 10:34
अगदी बरोबर! लेझीम हे वाद्य अधिक प्रमोट केले पाहिजे. ही रील पहा,किती प्रचंड एनर्जी आहे.सांगलीचा विसावा ग्रुप वा चौक आहे. https://www.facebook.com/share/r/pSdFzsJD9vn1Hka9/?mibextid=oFDknk अजून सकारात्मक गोष्टी समजू द्या सांगलीच्या :)

भीमराव 01/10/2024 - 12:49
गावोगावी परंपरा वेगवेगळ्या. जशी सोलापूराची लेझीम मंडळे, टिपरी नाच, सातारचे ढोलाचे खेळ, झांजापथक, उत्तर महाराष्ट्राचे झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, आदिवासी बांधवांचा तारपा नाच, कोकण चा शक्ती तुरा असे कितीतरी कलाप्रकार आज सुद्धा महाराष्ट्रात आहेत.

In reply to by भीमराव

चौथा कोनाडा 01/10/2024 - 20:41
लेझीम मंडळे, टिपरी नाच, ढोलाचे खेळ, झांजापथक, झींगी पावरी, तीन पावली नाच, संबळ नाच, तारपा नाच, शक्ती तुरा
एवढे दमदार प्रकार असून देखील ढोलचा धडकी भरवणारा कर्णकटू आवाज हेच आपल्या नशिबी आलेलं आहे. आधीच माणूस विशेषतः शहरी माणूस वाहनांचे, कारखान्यांचे, बांधकामाचे इत्यादि आवाजांनी बेजार झालाय अन त्यात असलं फुटकं नशीब ! कमीत कमी शहराच्या ३०-३५ किमि वर्तुळात ढोल बडवण्याला बंदी करावी !

छान. माहितीपूर्ण आणि वेगळा विषय. सध्या सांगली-सोलापूरच्या लेझीम, विशेष संगीत आणि त्यांच्या स्टेप्सच्या रील्स सध्या फेसबूक्सवर धुम दिसते. आपल्या काळातल्या शाळेतल्या लेझीम जाऊन आता जरा दांडियातल्या गरबा सारख्या स्टेप्स या लेझीमला दिसू लागल्या आहेत, म्हणजे मला तसं वाटतं. पण भारीय. सगळं. -दिलीप बिरुटे

सिरुसेरि 04/11/2024 - 18:35
छान माहिती . या लेखामुळे सांगली गाव भागातील रणझुंजार , विजयंता , स्वरुप टॉकिज जवळील बालाजी मिल्स , शिलंगण चौक इत्यादी प्रसिद्ध गणेश मंडळे व त्यांचे भव्य देखावे आठवले .

लेखनप्रकार
आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे. बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय.

भयंकर प्रामाणिकपणे काम करणारा कलासाधक: संकर्षण कर्‍हाडे

मार्गी ·

शाम भागवत 01/12/2024 - 16:34
मस्तच लिहिलंय. ओशो ध्यानवरून इथं आलोय. सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी त्यांची एक कविता त्यांच्याच तोंडून युट्युबवर काही दिवसांपूर्वी ऐकल्याचं आठवतंय. त्यातून कटू सत्य सांगत असूनही ते विखारी नव्हतं तर विचार करायला लावणारं आहे असं वाटून गेलं. 🙏

लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ ‘व्हायफळ' गप्पा पॉडकास्टवर उलगडत जाणारा संकर्षणचा प्रवास ✪ ओळखीच्या चेहर्‍याच्या मागे असलेल्या दिलदार माणसाचा परिचय ✪ परभणी, अंबेजोगाई, औरंगाबादच्या आठवणी व लहानपणीच्या खोड्या ✪ प्रशांत दामले, श्रेयस तळपदे व सिनियर्सकडून त्याचं शिकणं आपण शिकावं असं! ✪ “स्टेजवरचा माज खाली दाखवलास तर तो स्टेजवर उतरवला जाईल!” ✪ “तुला मनलं होतं‌ ना तुला बक्षीस द्यायचं हाय, रताळ्या!” ✪ “Soak the pressure and be there!” ✪ पुस्तकं‌ व माणसं वाचणारा अवलिया संकर्षण कर्‍हाडे! बस नाम ही काफी है! घराघरात पोहचलेला चेहरा! कलाकार, नाटककार, अभिनेता, सूत्र संचालक, लेखक आणि कवी!

|| उत्कीर्ण विनायक ||

चौथा कोनाडा ·

चित्रगुप्त 13/09/2024 - 02:27
@ चौथा कोनाडा: लेख अतिशय आवडला. खूप रंजक आणि माहितीपूर्ण आहे. तुमच्याबरोबर श्री. प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्या घरी जाऊन त्यांच्या उत्कीर्ण कलाकृती बघायला मिळाल्या होत्या. आता त्यांचे दर्जेदार प्रदर्शन होत आहे, ही खूपच आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही दोघेही खूपच हरहुन्नरी, मनमिळाऊ, कलाप्रेमी आणि सततोद्योगी आहात, याची प्रचिती तुमच्या भेटीतून आलेली होती. अनेक शुभेच्छा.

In reply to by चित्रगुप्त

चौथा कोनाडा 15/09/2024 - 11:41
मनःपुर्वक धन्यवाद, चित्रगुप्त. हो, तो दिवस आनंदाचा होता.. खुप छान योग आले. त्याच्या सहवासात बरयाच कलाकारांच्या भेटीचे योग आले.. पाहूया पुन्हा योग कसे येतात ते !

सौंदाळा 13/09/2024 - 15:18
मस्तच, उत्कीर्ण शब्द पहिल्यांदाच ऐकला आणि आवडला. तुमच्या चिंचवड कट्ट्याच्या धाग्यात पण प्रफुल्ल भिष्णूरकर यांच्याबद्दल तुम्ही थोडक्यात लिहिले होते. आता मात्र त्यांची विस्तारपूर्वक ओळख, त्यांच्या कलाकृतींची माहिती आणि त्यांना मिळालेले मान्यवरांचे आशिर्वाद, कौतुक बघून खूपच छान वाटले. प्रफुल्ल भिष्णूरकर यांचे प्रदर्शानासाठी अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौथा कोनाडा 15/09/2024 - 11:45
हो, उत्कीर्ण शब्द भारी आहे ... मी ही "उत्कीर्ण" च्या प्रेमात पडलोय ! तुमचे अभिनंदन प्रफुल्ल भिष्णूरकर ला कळवतो ! मनःपुर्वक धन्यवाद, सौंदाळा.

राघव 13/09/2024 - 15:25
लेख खूप आवडला. चांगली माहिती. मागे एका कट्ट्याची माहिती तुम्ही दिलेली.. त्यात सुद्धा यांचा उल्लेख होता. प्रदर्शन बघण्याचा निश्चित प्रयत्न राहिल. शुभेच्छा!

In reply to by कर्नलतपस्वी

चौथा कोनाडा 18/09/2024 - 21:57
नो प्रॉब्लेम कर्नल साहेब ! एवढं टायपो तर चालतंच की ! (या पेक्षा भयानक आणि अति-अशुद्ध मराठी वाचायला मिळतं आजकाल ! आणि माफी बिफी मागायची तर पद्धतच नसते ! आपण (म्हणजे तुम्ही सुद्धा) पडलो अचूक शुद्ध मराठी लिहिण्याच्या बाण्याचे .. आपल्यासाठी तर फार निराशाजनक परिस्थिती आहे)

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा 19/09/2024 - 20:24
वाह ! मोठ्या कलाकाराची ओळक आवडली. चित्रं तर सुप्पर डुप्पर.
तुमचं कौतुक पोहोचवत आहे. मनःपुर्वक धन्यवाद, प्रा.डॉ. साहेब !

श्वेता२४ 18/09/2024 - 16:19
माझ्यासाठी चित्रकला हा अतिशय वेगळा असा विषय आहे. यातले फारसे काही कळत नसले तरी समजून घ्यायला आवडते. कुठेही चित्र प्रदर्शन असले तरीही आवर्जून जाते व समजून घेण्याचा प्रयत्न करते. लेख अतिशय आवडला. बरीच वेगळी माहिती समजली.

"काय नाव आहे म्हणे?" मी उत्सुकतेने विचारल. तो : उत्कीर्ण ! "काय? उत्कीर्ण? हे असलं कसलं म्हणे नाव? उत्तीर्ण वै ऐकलंय.. पण हे उत्कीर्ण वेगळंच काही तरी दिसतंय!" तो : "अरे, उत्कीर्ण म्हणजे खोदून किंवा कोरून तयार केलली कलाकृती" कोरलेलं .. अर्थात उत्कीर्ण Praf001a अच्छा असं आहे तर! माझ्या वाचण्या ऐकण्यात हा शब्द आला नव्हता.

परभणीतील भरतनाट्यम अरंगेत्रम- नृत्य योग सोहळा!

मार्गी ·

Bhakti 29/07/2024 - 12:02
लेकी मुळे मीपण भरतनाट्यम जवळून समजून घेतेय,तिच्यामुळे ही कला, त्यांचे मला सुंदर रसग्रहण करायला मिळत आहे.

Bhakti 29/07/2024 - 12:02
लेकी मुळे मीपण भरतनाट्यम जवळून समजून घेतेय,तिच्यामुळे ही कला, त्यांचे मला सुंदर रसग्रहण करायला मिळत आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार
✪ अरंगेत्रम- शिष्याची परीक्षा व जगामध्ये प्रवेश करण्यापूर्वीचा 'अंतिम पग' ✪ अनुभवावेत असे शब्दम्, वर्णम्, किर्तनम्, तिल्लाना आणि मंगळम् ✪ सुंदर ते ध्यान आणि ओंकार स्वरूपा! ✪ वर्षानुवर्षाच्या मेहनतीचं- दृढसंकल्पाचं प्रेरणादायी उदाहरण ✪ परभणीच्या वैष्णवीची मोठी स्वप्ने आणि झेप ✪ कडक गुरू- वरी घालतो धपाटा आत आधाराचा हात ✪ नृत्य आणि संगीत- विचार थांबवणारा अनुभव ✪ स्नेहीजन व गुरूजनांचा मेळा When a disciple is ready, Guru appears. When the disciple is really ready, the Guru disappears! नुकतीच गुरूपूर्णिमा होऊन गेली आहे.

'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

चित्रगुप्त ·

भागो 17/06/2024 - 23:46
बघितली. आता मला सांगा, सर, कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:44
कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे? -- हा प्रश्न कला-निर्मितीशी संबंधित असेल तर केलेली साधना कधीच वाया जात नाही. नवनवीन साधने आत्मसात करत नवनवीन प्रयोग करत रहाण्यातून सृजनशीलतेचे क्षितिज आणखी विस्तीर्ण होत असते. -- मात्र हा प्रश्न कलेतून पैसा मिळवण्यासंबंधित असेल, तर अमूक एका पद्धतीने काम करणारे कलावंत ती पद्धत कालबाह्य झाल्यावर अडचणीत येऊ शकतात. मला स्वतःला आता कलेतून पैसा मिळवायचा नसल्याने माझ्यासाठी नवीन असलेल्या गोष्टी शिकणे खूप आनंददायक आहे. उदाहरणार्थ एकीकडे कृत्रीम बुद्धिमत्तेने निर्माण होणारी कला, तर दर दुसरीकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या युरोपियन चित्रकारांची पद्धत, या दोन्ही नवीन गोष्टी मी शिकतो आहे. गंमत म्हणजे या दोन्हीचे एकत्रिकरण करणेही शक्य, आणि खूप उपयोगीपण आहे.

कंजूस 18/06/2024 - 05:47
जमलं आहे. प्राथमिक प्रयोग एवढं देऊ शकतात आता तर आणखी पाच वर्षांत काय होईल.

पिक्चर मेकर,स्टोरी बोर्ड, स्टोरी बोर्ड प्लस, माया.... ते आज या टप्प्यावर पोहोचायला कित्येक दशके लागली. तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे. तरी सुद्धा सध्यातरी पारंपरिक चित्रकलेला पर्याय नाही. भाषे बरोबर कल्पनेचा विलास मात्र दिवसेंदिवस वाढत आहे. बघुया काय पुढे होते ते. दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेले छायाचित्रण आज कुठल्याकुठे पोहचले आहे याची कल्पना रामोजी चित्र सृष्टी बघितल्यावर स्पष्ट कल्पना आली व मानवाच्या सृजन आणी इच्छाशक्तीचे कौतुक वाटले. चित्रगुप्त यांच्यापासून पेर्णा घेवून मी सुद्धा चित्रकर बनण्याचा प्रयत्न करत आहे. आता १९६० सालच्या कन्यादान चित्रपटातील पी सावळाराम यांनी लिहीलेले गीत बदलायची वेळ आलेली दिसतेय. मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो भेट पहिली अपुली घडता निळी मोहीनी नयनी हसता उडे पापणी किंचित ढळता गोड कपोली रंग उषेचे भरतो ममस्पर्शाने तुझी मुग्धता होत बोलकी तुला न कळता माझ्याविण ही तुझी चारुता मावळतीचे सूर्यफूल ते करतो तुझ्या परी तव प्रीतीसरिता संगम देखून मागे फिरता हसरी संध्या रजनी होता नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो

In reply to by कर्नलतपस्वी

चित्रगुप्त 23/06/2024 - 23:38
तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.
तुम्ही वर म्हटले तसे घडून आता खूप वर्षे झाली. तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा उगम आणि वाटचाल यातून झाली, त्यालाही आता अनेक दशके उलटलीत. -- आता पुन्हा चक्र उलटे फिरून, आणि काही लोकांकडे अमाप पैसा आल्यापासून पुन्हा प्रासादतुल्य इमारती, हंड्या-झुंबरे, जुनी चित्रे-पुतळे, जुन्या शैलीच्या, उत्तम पॉलिश केलेल्या उंची लाकडाच्या फर्निचरने सजवलेले दिवाणखाने वगैरेची फॅशन येत आहे. इंदुरातील माझ्या परिचयातील दोन (सख्खे भाऊ असलेल्या) चित्रकारांना फ्रेंच प्रासादाबरहुकूम छतावर आणि भिंतींवर भव्य चित्रे, कुटुंबातील व्यक्तींची जुन्या पद्धतीची व्यक्तिचित्रे वगैरे रंगवण्याचे मोठे काम मिळालेले आहे. मी आणि माझ्या मुलाने जुन्या बाजारातून एक ८०-९० वर्षे जुना, मोहोगनी लाकडाचा तुटका सोफा आणून त्याला स्वतः दुरुस्त करून, पूर्वीची कापूस भरलेली गादी काढून टाकून हुबेहुब तशी दिसणारी फोमची गादी घरी बनवून त्यावर जुन्या डिझाईनचे कापड आणून व्यवस्थित बसवले आहे. हे सगळे करायला एक आठवडा लागला. आता लंबक पुन्हा उलट्या दिशेने जाऊ लागला आहे. माझ्यासारख्या 'जुने ते सोने' वाटणार्‍यांसाठी ही समाधानाची बाब आहे.

भागो 18/06/2024 - 09:45
चित्र क्र ६ मला "भरत" च्या चित्राची आठवण आली. ह्या वर्षीच्या मिपाच्या दिवाळी अंकातली चित्रे ही पण अशीच काढली असणार. 3d render, cinematicचा अर्थ फोड करून सांगणार का?

In reply to by भागो

चित्रगुप्त 18/06/2024 - 17:14
यांचे नेमके अर्थ मलाही ठाउक नव्हते. चित्र बनवताना खाली विविध पर्याय असतात, त्यापैकी वेगवेगळे निवडले तर वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सध्या मी निशुल्क वापरत असल्याने रोजच्या वापरावर मर्यादा आहे, त्यामुळे भरपूर प्रयोग करून बघता येत नाहीयेत. मी अंदाजाने हे दोन पर्याय निवडले होते. बरे झाले तुम्ही अर्थ विचारलात, त्यामुळे मी गुगलून बघितले, ते असे: --- A 3D render is a computer-generated image (CGI) created from a 3D model using specialized software. The process of creating a 3D render is called 3D rendering, and it's the final step in the 3D visualization process. 3D rendering can be used to create photorealistic or artistic images of a variety of scenes and locations, including interiors and exteriors, landscapes, and structures. --- Cinematic AI images are images created using artificial intelligence (AI) to mimic the style of cinematic photography. Cinematic photography is a style that aims to create images with depth and emotion that resemble movie stills.

In reply to by चित्रगुप्त

भागो 18/06/2024 - 17:25
मी जेव्हा 3d शिकत होतो( Blender) ती इमेज आपल्याला तिन्ही अक्सिस मधून फिरवता येते. मला वाटले तस काही आहे कि काय. असेलही. नसेल तर पुढे मागे येईलही. इन जनरल मला राजा रविवर्माची स्टाईल वाटली.

सुरिया 18/06/2024 - 18:26
कितीही एआय आलं. रंगानं हात बरबाटवायचा थांबला, स्काय इज द लिमिट सोडा, ब्रेन इज द लिमिट कमी पडायलं तरी बुढऊ पेंटरबाबू आपला थांबलेला काळ अन फ्यांटस्या सोडायला तयार नाहीत असं दिसतंय. त्याच त्याच बाया अन तीच ब्यागरांडं तर आधी प्यारीसातल्या पेंटिंगात आणि गेलाबाजार चांदोबात बघितल्याच आहेत की. . आर्टिस्ट आहात, अनुभवी आहात अन एआय हाताशी हाय तर बनवा की एखादी कालातीत काहीतरी. उगी तेच तेच काय. एआय प्लस चित्रगुप्त हे कॉबोच कसे हिट्ट वाजले पाहिजे, बाकी स्क्रीप्टा बडवुन छान छान म्हणायला आम्ही हावोतच की.

In reply to by सुरिया

चित्रगुप्त 18/06/2024 - 20:01
@ सुरिया: धन्यवाद. 'बुढऊ पेंटरबाबू' आवडले. आत्ता आठ दहा दिवसांपूर्वी हे माध्यम हाती लागून सुरुवात झाली आहे. अनेक प्रयोग करायचे आहेत. बघूया पुढे काय काय होते. अर्थातच मूळचे तैलरंगात चित्रे रंगवणे थांबवायचे नाहीच. सत्तरीत आल्यावर बालपणीचा 'गुजरा हुवा जमाना' हवाहवासा, पुन्हा जगावासा वाटू लागतो. 'आता नही दुबारा' हे बुद्धीला कळत असले तरी काळाचे चक्र उलटे फिरून आता कालबाह्य/दुर्लभ झालेल्या गोष्टींमधे पुन्हा रमावेसे वाटू लागते, हे नैसर्गिकच असते, आणि ते त्या अवस्थेला पोचल्यावरच कळते. काही अद्वितीय, हटके, (मुद्दाम ओढून ताणून -) 'कालातीत' वगैरे करून दाखवायची, आपण ग्रेट वगैरे आहोत असे सिद्ध करण्याची खाज आणि मानसिक गरज/रुग्णता माझ्यात तरी अजिबात नाही. ज्यांना असेल त्यांनी तसे अवश्य करावे. -- बाकी नवनवीन क्षितिजांचा शोध घेत रहावा हे जरी खरे असले, तरी त्यात स्वतःची म्हणून असलेली आवड ही रहाणारच. त्यात गैर काही नाही. ज्यांना त्यात रस वाटेल त्यांनी बघावे, नसेल त्यांनी सोडून द्यावे. हा.का.ना.का.

चौकस२१२ 18/06/2024 - 19:00
सुरवातीला रोचक वाटले पण तोच तोच पण साहजिक लगेच जाणवतो त्यामुळे काही गोष्टीत वापरता येईल पण पुढे काय? आणि सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:50
मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ
-- खरे आहे. परंतु रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध घेता येत असल्याने त्यांचा उपयोग करून घेत आपली कला परिपूर्ण करायला मदत मिळू शकते, माझा सध्या तोच प्रयत्न आहे.
सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ
सप्तसूर, सव्वीस वा अठ्ठेचाळीस मूळाक्षरे वगैरे सगळेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेनुसार निर्मितीत फरक पडत जातो तसे यातही होईल.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 24/06/2024 - 14:49
नक्कीच प्रयोग करीत राहा ...पण एक चित्रांचा ग्राहक/ आवड असणारा ( मग ते स्थापत्य असो किंवा जाहिरात क्षेत्र असो ) म्हणून आलेली पहिली प्रतिक्रिया होती

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:34
या सगळ्या प्रकारात प्रॉम्ट कसे लिहावे? याची माहिती मिळाली. व्यक्तीला सजवायला, जितके जास्त वर्णन लिहून ठेवले पाहिजे. बाकीचे तपशील साजेसे दिले की चित्र बनते हे समजले. मला यात विचारणा करावीशी वाटते की हे लेखी प्रॉम्ट लिहून देता देता आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का? कोणी असे प्रयोग केले असतील तर ते बघायला आवडेल.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:40
आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?
यासाठी बहुत काळापासून फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखीही असतीलच.

In reply to by शशिकांत ओक

चित्रगुप्त 18/06/2024 - 21:57
प्रॉम्ट कसे लिहावे हाच यात कळीचा मुद्दा आहे. नेमके कोणते शब्द/वाक्य कोणत्या क्रमाने लिहायचे, कोणत्या तांत्रिक बाबी सांगायच्या वगैरेवर मार्गदर्शक लेख, व्हिडियो वगैरे आहेत, ते हळूहळू बघणार आहे. तुम्ही जर काही वाचले-बघितले तर ते इथे अवश्य लिहा. तुमच्या शिवकालीन युद्धतंत्र वगैरेवरील लेखनासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

चौथा कोनाडा 19/06/2024 - 17:22
जबरदस्त चित्रं आहेत ! चिगु साहेबांच्या प्रयोगशीलतेला परिस सापडला आहे.. य लेखाच्या निमित्ताने प्रॉम्प्ट कसे लिहितात, त्यांचा क्रम, योग्य शब्द जुळवणी याची चुणु़क मिळाली ! ही नविन इंटरेस्टींग लेखमाला वाचानिय अ‍ॅज वेल बघणीय होणार यात शंका नाही ! आगे बढो चित्रगुप्त साहेब !

वकील साहेब 24/06/2024 - 12:01
आपण अपलोड केलेल्या एखाद्या फोटो वर आपल्या आदेशानुसार संस्कार करून नवीन इमेज ideogram बनवून देते का ? असेल तर ते कसे साध्य करावे ?

In reply to by चित्रगुप्त

गवि 24/06/2024 - 18:08
आधीच्या फोटोवर, विशेषतः व्यक्तीच्या फोटोवर बेमालूम संस्करण करून नवीन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणे यात बरेच कायदेशीर आणि नैतिक इश्युज आहेत. कोणतीही मुख्य प्रवाहातील लेजिट कंपनी असे फीचर (उपलब्ध असले तरी) वापरायला देणार नाहीत. इतक्यात तरी. पण या तंत्रात प्रवीण असलेले लोक स्वतः खटपट करून तसे बनवत असतातच. यात मुख्य समस्या डीप फेक टाईप व्हिडिओजची आहे. कोणाचे नग्न, बदनामीकारक चित्र किंवा त्याहून वाईट म्हणजे कोण्या समाजाच्या भावना दुखावणारे शब्द तोंडात घालून व्हिडिओ बेमालूम बनवले तर सध्या तरी बरेच मोठे नुकसान होऊ शकते. लोकांना अशा फेक गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल.

वकील साहेब 01/07/2024 - 03:37
Whatsapp अपडेट केलं तर whatsapp च नवीन फिचर असलेली जांभळी रिंग तुमच्या whatsapp च्या होम स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Meta AI नावाची नवीन चॅट बॉक्स ओपन होईल. इथे तुम्ही chat got ला विचारतात तसे अनेक प्रश्न विचारू शकतात. त्याची तात्काळ उत्तरे मिळतात. आणि त्याहून गंमत म्हणजे ideogram सारख्या प्रतिमाही बनवून मिळतात. त्याही अगदी त्वरित. त्यासाठी फक्त एक करायचं promt लिहितांना सुरवातीला फक्त imagine एवढा शब्द लिहायचा बस. Ideogram जसे 4 Result देते तसे meta ai फक्त एकच result देते. पण तोही छान असतो. मी गम्मत म्हणून चित्रगुप्त यांच्या promt कॉपी करून तिथे टाकून पहिल्या. हाती आलेल्या प्रतिमा खूपच छान होत्या. इथे डकवता येत नाहीये. पण तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता.

चित्रगुप्त 01/07/2024 - 07:44
Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे असे दिसले. उदाहरणार्थ मानवाकृती ideogram पेक्षा जास्त चांगल्या येतात. दर दिवशी अमूक इतकी चित्रे असे काही बंधनही नाही, one more version असे लिहीले की पुन्हा आणखी एक नवीन चित्र मिळते. त्यात सुधारणांसाठी पण लिहून पाठवू शकतो, पण नेमक्या त्याच सुधारणा होतीलच असे नाही. काही वेडेवाकडे, चुकीचे पण होते. आधी /image असे लिहून मग इंग्रजीत prompt लिहायचा आणि मेसेज पाठवायचा.मिनीटभारात एक चित्र येते. मात्र ते चौरसाकारच असते. लांबट उभे वा आडवे मिळत नाही.

In reply to by चित्रगुप्त

चौकस२१२ 01/07/2024 - 09:14
दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे ? ( जरी भाऊ असले तरी ) तुम्ही इनपुट काय दिले होते ? एकाला ३ रा हात? आणि काही - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? -बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?

In reply to by चौकस२१२

चित्रगुप्त 01/07/2024 - 16:21
तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत. १. चेहरे कसे येतील यावर आपले काहीही कंट्रोल नाही (मलातरी जमलेले नाही) हे जे गदायुद्धाचे चित्र इथे दिले, त्यासाठी अनेकदा प्रॉम्प्ट बदलून जी चित्रे येत गेली, त्या सर्वात काही ना काहीतरी चुका होत्याच, शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले. कशात दोघांना चारचार हात, चार गदा, कशात गदांना दोन्हीकडे गोलाकार डोकी (किंवा जे काही म्हणतात ते) गदा वाट्टेल तश्या धरलेल्या, शेवटी वैताग आला. बरेचदा पात्रांचे चेहरे चिनी-जपानी प्रकारचे, माना वाट्टेलतश्या वळलेल्या, हातांचे बोटे कमिजास्त किंवा चुकीची, असा सगळा घोळ असतो. मी फुकटवाले कॄबु वापरतो त्यामुळे असे होते का ते ठाऊक नाही. कदाचित टर्मिनेटर याविषयी सांगू शकतील.तीन हात वाले फक्त हेच होते, बाकीच्यात किमान चार-चार तरी होते. यातला मागच्या बाजूचा एक हात मी फोटोशॉपमधे मिटवला, पण ते चित्र इथे चढवता आले नाही. २. - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो? उत्तरः ती माझी वैयक्तिक आवड आहे. मुळात मला संध्याकाळची वेळ, संध्याकाळची चित्रे लहानपणापासून आवडतात. आकाशातले रंग, ढग, मावळता सूर्य, हळू हळू गडद होणारा आसमंत, लांब सावल्या, इमारतींवर, झाडा-खडकांवर रेंगाळणारे सूर्याचे शेवटले सोनेरी किरण वगैरे अजूनही फार रम्य वाटतात. काहीतरी सरत आलेले, संपत आलेले असल्याची भावना हुरहुर निर्माण करते, ती आवडते. ३. बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? -- मुख्यतः वैय्यक्तिक आवडीमुळेच. ग्रीक-रोमन पुराणकथांवरील महान युरोपियन चित्रकारांची चित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पॅरीस, रोम, फ्लॉरेन्स वगरेच्या संग्रहालयांमधे खजिनेच आहेत त्या चित्रांचे. कितीदाही बघितले तरी दर वेळी त्यात नवीन काहीतरी दिसते. भारतीय पुराणावरील कांगडा, गुलेर, बसौली, बूंदी, किशनगड वगैरे शैलीची चित्रेही अद्भुत वाटतात. लहानपणी बघितलेली 'चांदोबा' तील चित्रे तर फार सुंदर असायची. (त्यामानाने रविवर्मा सामान्य वाटतो) 'भीम-दुर्योधन गदायुद्ध' असा विषय घेऊनच रमलचित्र बनवायचे (१९६० च्या सुमाराचे चांदोबाच्या मलपृष्ठावरील ते चित्र अजून लक्षात आहे), असे ठरवून प्रयत्न केला, ते बरेच कठीण असल्याचे दिसून आले. मुळात 'गदा' ला इंग्रजीत काय म्हणतात तेच ठाऊक नव्हते, Mace हा शब्द सापडला. तो वापरला तर मोठ्ठा घण्/हतोडा येऊ लागला. मग त्यात 'mace with big spherical head' असे केल्यावर नुस्ता साधा दांडा आणि त्यावर गोल फुटबॉलएवढा गोळा. असे करता करता वैताग आला. त्या मानाने 'हेलन ऑफ ट्रॉय' वगैरे युरोपियन विषय घेतले तर फार सुंदर चित्रे बनतात असा अनुभव आला. - मुळात कृत्रीम बुद्धिमता अल्पावधीत ही चित्रे कशी बनवते, हे कुणी जाणकारांनी व्यवस्थित समजावून सांगितले तर कदाचित अशा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश पडेल, आणि मार्ग सापडेल. तोपर्यंत जमेल तशी खटपट करायची. त्याचाही हळू हळू कंटाळा येईल बहुतेक. ४. समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर? -- करून बघा. माझ्यात तेवढा उत्साह उरलेला नाही आता.

In reply to by चित्रगुप्त

गवि 01/07/2024 - 09:47
जेव्हा एखादे शहर कायमचे समुद्रात बुडते तेव्हा एखाद्या तुफानात प्रचंड मोठ्या लाटांनी बुडत नसून अनेक वर्षे हळुहळू पाण्याची पातळी वाढत वाढत ते कणाकणाने पाण्याच्या पातळीच्या खाली जात असावे. तुफानी लाटांनी पाणी शहरात भरले तरी ते ओसरून जाईल.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 02/07/2024 - 06:25
द्वारका समुद्रात बुडाली ह्याचे वर्णन केवळ दोन तीनच श्लोकांत महाभारतकारांनी केले आहे. तत्सागरसमप्रख्यं वृष्णिचक्रं महर्द्धिमत् | उवाह रथिनां श्रेष्ठः पार्थः परपुरञ्जयः || निर्याते तु जने तस्मिन्सागरो मकरालयः | द्वारकां रत्नसम्पूर्णां जलेनाप्लावयत्तदा || तदद्भुतमभिप्रेक्ष्य द्वारकावासिनो जनाः | तूर्णात्तूर्णतरं जग्मुरहो दैवमिति ब्रुवन् || , याप्रमाणें अर्जुनामागून द्वारकेंतील सर्व माणसें बाहेर पडून वाट चालू लागलीं असतां मागें समुद्रानें आपल्या पाण्यांत रत्नसंपन्न अशी सर्व द्वारका नगरी बुडवून टाकिली. अर्जुन जसा जसा त्या नगरीपासून पुढें पुढें जाई, तसा तसा तो तो नगरीचा भाग समुद्र बुडवून टाकी ! तो अद्भुत प्रकार पाहून द्वारकावासी मंडळी 'काय हो हैं दैव!' असें म्हणत अधिकाधिक वेगानें पुढें जाऊं लागली.

यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे: चित्र १. . चित्र २. . A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style.

याझिदींसाठी प्रार्थना करा कि स्वप्नात त्यांना बायबलमधील देव भेटो!

माहितगार ·

बाबुराव 13/06/2024 - 13:12
रामकृष्ण परमहंस मुत्युशय्येवर असतांना त्यांची पत्नी शारदा रडू लागली. तेव्हा डोळे उघडून रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' उगी राहा गं, रडतेस का ? मी कुठे जाणारही नाही आणि कुठून आलोही नाही. मी जिथे आहे तिथे राहणार आहे. '' शारदा म्हणाली, तुमचा देह गेल्यावर माझ्या बांगड्यांचे काय ?'' रामकृष्ण परमहंस म्हणाले, '' मी मरणारच नाही, तर तू बांगड्या फोडण्याचा प्रश्न येतोच कुठे ? तू सधवा आहेत आणि सधवाच राहशील” त्या जमान्यात बंगालमधे नव-याच्या मृत्युनंतर बांगड्या न फोडणारी अशी एकमेव स्री म्हण शारदा माता. तिच्या दृष्टीने ते अमरच होते. महमद पैंगबर म्हणतो, ''मरण्यापूर्वी एकदा मरा''. जर्मन तत्त्वज्ञ आंजेलिस सिलोसिअस म्हणतो, मृत्यूपूर्वी तुम्ही मरणाचा अनुभव घेतला नाही तर नष्ट होऊन जाल. बुनात त्सेनसी हा जर्मन तत्त्वज्ञ म्हणतो, ''While living, be a dead one'' एकून मिशनरीच्या आत्म्याच्या गोष्टी सोडा. सर्वच धर्मात जगाला शहाणे करण्याच्या गोष्टी आहेत. * उत्तरदायित्वास नकार लागू. * अटी लागू.

In reply to by बाबुराव

चित्रगुप्त 10/04/2025 - 06:05
While living, be a dead one चा अनुभव हल्ली मला रोजच येतो - किंबहुना मुद्दाम घ्यावा लागतो. -- उदाहरणार्थ, पहाटे फिरायला निघावे तर लोकांनी हौसेने लावलेल्या फुलझाडांवरील ताजी फुले निष्ठुरतेने ओरबाडून घेणारे नराधम आणि नार्‍याधमिणी, खांद्यावर मोबाईल ठेऊन तिरपी मान करत बोलत, जोरात बाईक चालवणारा दूधवाला, अगदी लहान मुलांना खुशाल मोबाईल देणारे पालक आणि त्यांची तीन-चार वर्षे वयाची चष्मिष्ट मुले .... असे व्यथित करणारे अनेक अनुभव रोज येत असतात, तेंव्हा 'आपण या जगात नाहीच आहोत' किंवा 'आपण मरण पावलेलो आहोत' असे मानून जगणे.

In reply to by चित्रगुप्त

माहितगार 10/04/2025 - 08:06
तुमच्या प्रतिसादावरून जेमिनीने बनवलेली कविता **रोजचे मरण** सकाळी फिरायला निघालो, फुलांची क्रूर तोडणी पाहिली, हौसेने लावलेली झाडे, निर्दय हातांनी ओरबाडली. खांद्यावर मोबाईल, तिरपी मान, दूधवाला बाईक चालवतो बेभान, लहानग्या हाती मोबाईल, चष्मिष्ट डोळे, निरागस ज्ञान. पालक खुश, मुलांना मोबाईल देऊन, जगण्याची दिशा झाली आहे हरवून, रोजचे हे अनुभव, रोजची ही वेदना, 'मी या जगात नाहीच' ही मनाची कल्पना. 'मृत झालो आहे मी' असा विचार, जगणे झाले आहे एक प्रकार, रोजच्या या मरणात, शोधतोय मी जीवनाचा आधार. माणुसकी हरवली, जगातली संवेदनशीलता संपली, रोज हे मरण, रोजचा हा त्रास, शोधतोय मी यातून जगण्याचा ध्यास. कविता सेक्शन मध्येही पोस्ट केली आहे

शशिकांत ओक 18/06/2024 - 21:18
नेमके काल या धाग्यातील उद्धृत याझिदी लोकांवर अन्याय होतात हे सांगायला बी बी सीवर आयसिसच्या मुख्य बगदादीची बायको बोलताना ती क्लिपमधे दिसली . 'झाले ते चांगले नव्हते.' असे मोघम एका याझिदी मुलीला समोर बसवून ही मुलाखत चालली होती. या शिवाय अनेक अन्य मुलींना गुलाम बनवून कसे वागवले ते सांगत असताना बगदादीची बायको तरी काय करणार असा सूर मुलाखतकार मांडत असेल असे वाटत राहते. गरीब फिलिस्तीनी मुस्लिमांच्या भल्यासाठी दुवे मागणारे लोक नेटवरून पैशाची मागणी करत असतात... याझिदी लोकांना कोण वाली आहे?

इसीसच्या आत्मा आढळून आल्याची अधून मधून वृत्ते असतात तरीही त्यांच्या इराक मधील याझिदी मुर्तीपूजकांवरील जुलमांचे मुख्यपर्व संपल्याला जवळपास दहा वर्षे झाली. त्यांच्यावरील छळ काळात मिपावर एक धागा लेख लिहिला होता. इसीसचा हेतु याझिदी कुराणमधील देव स्विकारत नाहीत तो पर्यंत चक्कचक्क पराजित याझिदींचा गुलाम म्हणून वापर करणे होता, याझिदी स्त्रीया आणि कुटूंबांचे पुढे काय झाले?

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट

चौकस२१२ ·

अहिरावण 10/05/2024 - 13:01
लेख वाचायला लागतो तोच संपला. काय वाचले काय समजले काही कळेना. मग विचार केला तुम्ही एवढे कष्ट घेऊन लेख लिहीला आहे आतुरतेने प्रतिसादाची वाट पहात असणार. निदान एक प्रतिसाद तरी असावा म्हणून दिला. :)

कॉमी 11/05/2024 - 18:49
प्रकाश संतांची "लंपन" अशी कोणतीही कादंबरी नाहीये. लंप्याची कादंबरी नाहीच आहे, चार कथासंग्रह आहेत. (वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर) लहान असताना फक्त वनवास वाचले होते. प्रचंड आवडलेले, आणि जनरली मस्त हलक्याफुलक्या कथांमध्ये एक दुःखद अंडरटोन तेव्हासुद्धा जाणवली होती (वनवास ह्या शिर्षकी कथेत खासकरून). नंतर पुढील पुस्तके वाचली त्यात ही दुःखाची छटा फारच गडद होते. ह्या गोष्टी स्क्रीनवर आणणे खूप कठीण काम आहे. निपुणला शुभेच्छा.

आतुरतेने वाट पाहत आहे तो चित्रपट प्रकाश नारायण संत यांचं लंपन कादंबरीवर दिग्दर्शन निपूण धर्माधिकारी "लंपन" https://www.youtube.com/watch?v=Urf8cvCo5Ws झलक बघून फक्त एक शंकेची पाल मनात चुकचुकली ती म्हणजे लंपन जिथे वाढतो ते महाराष्ट्र्र कर्नाटक सीमेचं भागातील गाव आणि तेथील भाषा या चित्रपटात कितपत तशीच उतरली आहे ?? कारण त्या कादंबरीचं गोडव्या मागचे कारण ते छोटं गाव आणि तिथली भाषा आणि व्यक्ती शाळा कादंबरी ची आठवण झाली ! किंवा दळवीनच्या ठणठणपाळ (बहुतेक हेंच नाव होते ) या त्यांच्या कोकणातील लहानपणाच्या जीवनाबद्दल च्या कादंबरीची आठवण झाली !

द लेडी ऑफ शालॉट : (भाग १) चित्र, कविता आणि 'आई'चा मराठी तर्जुमा.

चित्रगुप्त ·

चौथा कोनाडा 03/05/2024 - 17:43
व्वा, किती अप्रतिम चित्रं आहेत... मला लेडी ऑफ शॅलॉट'ची तीन ही चित्रं आवडली ! काय प्रकाश आणि काय रंगसंगती आहे ! प्रचंड ताकदीची वातावरण निर्मिती ! सुंदर धागा अन सुंदर माहिती ! ही बाई कवितेतली आहे हे वाचून विस्मय वाटला... बाकी कविता अन विशेषतः इंग्लिश हा आपला प्रांत नाही आणि कृबु भाषांतर बद्दल काय बोलावे ?

चित्रगुप्त 03/05/2024 - 18:46
जिचा सांप्रत जिकडे तिकडे खूप बोलबाला गवगवा केला जात आहे, ती कृत्रिम बुद्धिमत्ता मराठीसाठी कितपत उपयोगी आहे हे अजमावण्यासाठीच हा प्रयोग करून पाहिला आहे. हास्यास्पद आणि विनोदी प्रकार आहे. यावर विसंबून टाकलेले अलिकडले धागे बघून हा प्रयोग करण्याची कल्पना सुचली. प्रतिसादक आणि वाचकांचे आभार.

कंजूस 03/05/2024 - 19:47
लेख आवडला. चित्रे छान. कविता आणि त्याही इंग्रजी त्यांच्याच भाषेत सांगायचे तर overrated वाटतात.

चौथा कोनाडा 04/05/2024 - 17:58
सध्या वृत्तपत्रात AI ला कृत्रिम प्रज्ञा असा शब्द वापरला जातो .. पण मला कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द जास्त जवळचा वाटतो .. त्याचं

कृबु

असं लघूरुप ही वापरता येतं बरोबर ना मिपाकरांनो ?

चित्रगुप्त 05/05/2024 - 01:07
कुबुद्धी, सुबुद्धी, सूडबुद्धी, अल्पबुद्धी,बालबुद्धी ..... असे 'बुद्धी'चे अनेक प्रकार असू शकतात.. 'प्रज्ञा' या सर्वांच्या वरची पातळी आहे. 'कृत्रीम प्रज्ञा' असे काही असूच शकत नाही. दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ? हवामानाचा 'अंदाज' आणि कटरिनाचा 'अंदाज' त्यांच्यासाठी सारखेच. अशी अनेक उदाहरणे सध्या वाचायला मिळतात. यावर धागाच काढा कुणीतरी.

In reply to by चित्रगुप्त

शशिकांत ओक 05/05/2024 - 01:33
दीडदमडीच्या 'पत्रकारां'बद्दल काय बोलणार ?
आजकाल अस्मितेचे पापड फार पटकन मोडतात. निवडणुकीच्या धामधुमीत शिवराळ भाषेला धार आली आहे हे मान्य... हो पण तुम्हाला काय दुरून डोंगर साजरे...!

. चित्रकारः John William Waterhouse. (1888) Oil on canvas (72 in × 91 in) Location: Tate Britain, London गेल्या महिन्यात लंडनमधे दहा दिवस राहून तिथली कलासंग्रहालये बघितली. लहानपणापासून पुस्तकांमधे बघितलेली अनेक उत्तमोत्तम चित्रे प्रत्यक्ष बघण्यातली मजा भरपूर अनुभवता आली.

एक अचानक मिपाकट्टा : चिंचवड

चौथा कोनाडा ·

प्रचेतस 19/04/2024 - 20:53
मस्त एकदम. आधी माहीत असतं तर नक्की आलो असतो. चित्रगुप्तकाका इकडं चिंचवडात आले आणि भेट नाही झाली. सर्व वृत्तांत खुपच आवडला.

In reply to by प्रचेतस

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:29
धन्यू वल्ली. वेळेशी मारामारी करत कट्टा पार पडला... एकट्या अभ्याला रात्री फोन करू शकलो. पुढच्यावेळी नीट नियोजन करुन भेटूयात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

चौथा कोनाडा 21/04/2024 - 17:42
मिपाची हेर यंत्रणा फेल झाली.
Laughs हा ... हा ... हा लै भारी डायलॉक ! असे झकास योग येतात, अकस्मात मिपाकर येतात, अचानक कट्टे होतात, आनंदून जातात सहवासाने

कंजूस 19/04/2024 - 21:25
समविचारींचा कट्टा झकास झाला आहे. फोटोही सुंदर. सुतचित्र कल्पना आवडली. काही चित्रे अशी सुतचित्रे आहेत यावर विश्वास बसत नाही . तसेच दगडी पाटीवरची कोरीव चित्रे हीसुद्धा नामी युक्ती आहे. गुरुकुल रचना पाहून केरळातील बेकर या स्थापत्यकाराची आठवण झाली. चिंचवड परिसरातील या वास्तू लेखकाबरोबर पाहण्याचा योग आला होता त्याची उजळणी झाली. कट्टा वृतान्त आवडला.

In reply to by कंजूस

चौथा कोनाडा 24/04/2024 - 14:21
धन्यवाद, कंजूस जी. असे योग अचानक येतात. तुमच्याशी भेट हा ही सुंदर योग होता !
काही चित्रे अशी सुतचित्रे आहेत यावर विश्वास बसत नाही. तसेच दगडी पाटीवरची कोरीव चित्रे हीसुद्धा नामी युक्ती आहे.
तुमचं कौतुक प्रफुल्ल पर्यंत पोहोचवत आहे ! धन्यवाद, पुनश्च !

त्रिगुणात्मक त्रैमुर्ती प्रकट झाल्या, काहितरी गहन विचारविमर्श झाला असेल म्हणून पामरांना निमंत्रण दिले नसावे. पुन्हा असा दुग्धशर्करा योग आला तर जरूर कळवणे. हातातले काम सोडून पळत येवूच, सध्या फोटोवर समाधान मानतो.

In reply to by कर्नलतपस्वी

कंजूस 20/04/2024 - 19:46
चित्रकार, कलाकार मिपाकरांचा कट्टा होता तो. प्रचेतसलाही गाळले तर ..... कविंचा ग्रीष्मकालीन कट्टा ठेवा. राजकीय टीकाकारांचा ठेवा. अध्यात्मिक पारमार्थिक लोकांचा ठेवा. अंधारात काळे मांजर शोधणाऱ्यांचा ठेवा. उडवून द्या दणका पिंचिंतेपुणेसासवड नगरीत.

In reply to by कंजूस

चित्रगुप्त 20/04/2024 - 22:50
सुनियोजित नव्हे, तर हा अचानक घडून आलेला कट्टा होता, असे म्हणता येईल. जानेवारीतील माझ्या पुणे - प्रवासात तसे आणखीही मिनी कट्टे घडून आले, उदाहरणार्थ रामचंद्र यांचेसह तळजाई टेकडी परिसरात भटकंती, कर्नल साहेबांनी दिलेली उच्चभ्रू हाटेलीतली मेजवानी, चौथा कोनाडा आणि बबन तांबे यांचेबरोबर पाषाण तळ्याभोवती भ्रमण आणि खादाडी, प्रशांतबरोबर गप्पा-चर्चा, चित्रकार रंजना यांची चित्रे बघायला त्यांचेकडे चौको आणि प्रफुल्ल यांचेसह जाणे... वगैरे. अबा तेंव्हा आजारी असल्याने अगदी जवळ रहात असूनही भेट झाली नाही. --- कायप्पावर कट्ट्यासाठी बरेच मिपाकरांना आवाहन केले होते, पण काही ना काही करणाने इतरांना जमले नव्हते. बाकी चौकोंनी वृत्तांत मस्त लिहीला आहे.

In reply to by चित्रगुप्त

Trump 21/04/2024 - 12:06
--- कायप्पावर कट्ट्यासाठी बरेच मिपाकरांना आवाहन केले होते, पण काही ना काही करणाने इतरांना जमले नव्हते.
येथे लोकांना सांगायचे. अजुन काही लोक आले असते.

In reply to by Trump

चौथा कोनाडा 13/05/2024 - 21:57
Trump, पुढच्या वेळी प्रयत्न करूयात जमवायचा ... धन्यू ट्रम्प ! & धन्यवाद चित्रगुप्त जी !

विवेकपटाईत 21/04/2024 - 12:41
कट्टा आवडला. काही वर्षांपूर्वी दिल्लीत ही आम्हा दोघांचा कट्टा झाला होता. मंडी हाऊस जवळच्या एका कला दिर्घेत शेकडो चित्र त्यांच्या सोबत पहिली चित्रकलेचे थोडे ज्ञान ही मिळाले. या शिवाय या व्यवसाातील राजनीती ही थोडी फार समजली.

In reply to by विवेकपटाईत

चौथा कोनाडा 03/05/2024 - 17:55
सध्याच्या "शॉर्ट अ‍ॅण्ड स्वीट' च्या काळात असे झटपट क्वि़क कट्टे बरे पडतात. मोठ्या कट्ट्यांना बरेच प्लानिंग आधी पासून सुरु करावे लागते जे प्रत्येक वेळी शक्य असतेच असे नाही ! आम्हालाही चित्रगुप्त यांच्या बरोबरच्या कट्ट्यात चित्रकला, आर्ट गॅलरीज, व्यवसाय यांच्या बद्द्ल थक्क करणारी माहिती मिळाली. चित्रगुप्त या क्षेत्रात किती बहुश्रुत आहेत हे जाणवले ! धन्यवाद, विवेकपटाईतजी !

शशिकांत ओक 24/04/2024 - 15:14
भावले. सुतचित्राचे वेगळे आकर्षण वाटले. एक सांस्कृतिक सहल चित्रगुप्तांसमावेत पहायला आणि वाचायला मस्त वाटली. या निमित्ताने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या समाज कार्याची ओळख झाली. पुढ्च्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायला आवडेल.

नठ्यारा 03/05/2024 - 20:10
चौथा कोनाडा,
आम्हालाही चित्रगुप्त यांच्या बरोबरच्या कट्ट्यात चित्रकला, आर्ट गॅलरीज, व्यवसाय यांच्या बद्द्ल थक्क करणारी माहिती मिळाली. चित्रगुप्त या क्षेत्रात किती बहुश्रुत आहेत हे जाणवले !
माहितीबद्दल धन्यवाद. एक लेख येउद्या किंवा चित्रगुप्तांना त्यांच्या वह्या उघडायला सांगा. आभार! -नाठाळ नठ्या

चौथा कोनाडा 25/05/2024 - 17:42
पुनरुत्थान समता गुरुकुलम वरील दोन व्हिडिओ: १) गुरुकुलम परिसर : https://www.facebook.com/reel/292472316999354 २) गुरुकुलम मधलं नविन अ‍ॅम्फी थिएटर : https://www.facebook.com/reel/2705837469575403

चित्रगुप्त, बबन तांबे आणि मी अर्थात चौथा कोनाडा यांचा अचानक ठरलेला पाषाणचा मिनी कट्टा झकास झाला होता. कट्टा संपताना मी चित्रगुप्तांना चिंचवडच्या मोरया गोसावी समाधी मंदिर आणि सुमारे तीनशे वर्ष जुन्या अशा मंगलमूर्ती वाड्याबद्दल माहिती सांगितली. माहिती त्यांना खूपच रोचक वाटली. ते म्हणाले "योग जुळून आले तर एखादा दिवस मंगलमूर्ती वाडा पाहायला नक्की येईन" मला या शनिवारी सुट्टी होती त्यामुळे माझी शनिवारची सकाळ मोकळीच होती. आदल्या रात्री चित्रगुप्तांशी संपर्क साधला आणि उद्या जमेल का असा विचारलं…. आणि चित्रगुप्त यांनाही वेळ होता. योग जुळून आले !