आधी ढोल ताशा पथके की वेठबिगारी ? या लेखाला प्रतिक्रिया लिहीली होती, पण खालील दुवे आधिक लोकांनी पहावेत असे वाटले, म्हणून सांगलीच्या लेझीम परंपरेचे दुवे छोटा लेख म्हणून देत आहे.
बाकी लयदार, कर्णमधुर तरीही कमालीचा कस लागणार्या लेझीमशी ढोल ताशाच्या कर्कश्य गोंगाटाबरोबर तुलनासुध्दा करवत नाही. ज्यांनी लेझीम खेळलंय, अनुभवलंय, त्या माझ्यासारख्यांना ढोल ताशा अगदी सहन होत नाही. अवघ्या पाच मिनिटांचा लेझीमचा डाव असा घाम काढतो की कितीही दमसासाचा गडी असला, तरी विश्रांती घेतल्याशिवाय पुढे खेळूच शकत नाही. पुण्यात मिरवणुकांना जाणं कधीचंच बंद केलंय. ढौल ताशा पण चांगला वाजू शकतो पण ताशा हा किर्रर्रर्र असा अत्यंत वेगात वाजवणे यालाच चांगलं वादन समजतात. त्यातून अत्यंत संथ गतीने ढाम ढाम दणके देत हादरवणारी लांबच लांब ओऴ. म्हणायला काही वर्षांपूर्वी नेनेघाट मंडळाचा ताशा जरा बरा व नजाकतदार वाटला होता. पण लझमाची मजा ढोलताशाला नाही ती नाहीच.
आमच्या सांगलीने तर लेझीमचे जागतिक रेकॉर्ड केले आहे. वादन ही बडवायची गोष्ट नसून नाजूक कलाकारीची आणि विलक्षण चापल्याची, माधुर्याची गोष्ट का आहे, याचे उत्तर तुंम्हाला इथे नक्की मिळेल: https://www.youtube.com/watch?v=Nxef1K3U4Gc
सांगलीच्या विसावा आणि विजयंत या दोन मंडळांनी लेझीमाचा परंपरा व सौंदर्य जपून ठेवले आहे. वानगीदाखल त्यांचा चौक https://www.youtube.com/watch?v=D0qBLiky2Ls&t=219s व सराव https://www.youtube.com/watch?v=t8em3ilgfuQ पहा.
दोन वर्षांपूर्वी बेळगावला विसर्जन मिरवणूक पहायचा योग आला. त्य़ांची दिंडीपण खूप आवडली. पहा: https://www.youtube.com/watch?v=3HuwlI1iLQA
बाकी हे पुण्या मुंबईत का नाही? य़ाचं कारण आहे व्यापारीकरण आणि काहीतरी अवाढव्य (वादन, संख्या, आवाज) खर्चीक म्हणजे चांगलं अशी चुकीची समजूत! ढोल पथके तासन तास रटाळ वादन करू शकतात कारण त्यात कस लागत नाही. चार वाजवतात, दोन ढेपाळतात, तरी आवाज मोठा येतोय ना? मग झालं.
प्रतिक्रिया
व्वा ... मस्त माहिती !
खरंच किती छान वाटतं कर्णमधूर
अगदी बरोबर!
गावोगावी परंपरा वेगवेगळ्या.
लेझीम मंडळे, टिपरी नाच,
छान.
छान माहिती . या लेखामुळे
आवडले.