मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कला

अखेर जमलं !

नूतन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी. शीर्षक वाचून तुम्हाला काय वाटतंय ते आलंय माझ्या लक्षात. पण तसं काही नाही बरं का! आज मी तुम्हाला माझ्या नादिष्टपणाची एक‌‌ गोष्ट सांगणार आहे. तर झालं असं की, अलीकडेच‌ माझा‌ वाढदिवस झाला. आता या‌ वयात कसलं आलंय " सेलीब्रेशन" वगैरे! ना खाण्याचा पराक्रम ना पायात फिरण्याचा जोर. तेव्हा वाढदिवस आणि नित्यक्रम ‌यात फारसा काही फरक पडत नाही. नाही म्हणायला मित्रमंडळी,नातेवाईकांचे फोन येतात. झालंच तर व्हाटस् ॲप ग्रुपवर ,वाढदिवसाच्या ढीगभर हार्दिक शुभेच्छा, आज काय स्पेशल? आणि तत्सम संदेशांचा धबधबा वाहतो.

संगीत देवबाभळी : एक हृदयस्पर्शी नाटक

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार

काल संभाजीनगरातील संत एकनाथ रंगमंदिरात 'संगीत देवबाभळी' नाटकाचा प्रयोग होता. नाट्यगृह संपूर्ण भरलेलं. अनेकांना वेळेवर तिकीट मिळेल या अपेक्षेनेआलेल्या अनेक रसिकांचा हिरमोड झालेला दिसला. गर्दी तुडुंब. २०१८ पासून यानाटकाचे प्रयोग होत आहेत. जवळ जवळ सहाशेच्या आसपासचा हा प्रयोग होता. एकाच दिवशी दोन प्रयोग आमच्या शहरात होते.

सलाम वेंकी...उत्तम हिंदी चित्रपट

नपा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
डिसेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेला हा - काजोल, विशाल जेठवा यांच्यासह आमिर खान ची छोटी भूमिका असलेला चित्रपट अलीकडेच 'चॅनेल सर्फिंग' करताना दिसला. एवढ्या सशक्त अभिनेत्यांचा हा कोणता सिनेमा आपण पाहीला नाही, या विचाराने सर्फिंग थांबले. जसजसं कथानक पुढे सरकायला लागलं, तसतसं न पाहिलेल्या भागाचा अंदाज येऊ लागला आणि चित्रपटात गुंतत गेलो - याचे श्रेय नक्कीच दिग्दर्शक रेवती (दक्षिणात्य अभिनेत्री), पटकथा लेखक समीर अरोरा व कौसर मुनीर या त्रयीना जातं. हा चित्रपट श्रीकांत मूर्थी यांच्या The Last Hurrah या पुस्तकांवर आधारित आहे.

गर्दी, चेंगराचेंगरी: कारणे, आकडेवारी आणि शास्त्रीय उपाय

माहितगार ·
लेखनप्रकार
प्रेर्ना चर्चा विजयोत्सवाला गालबोट - प्रा. डॉ. दिलीप बिरुटे आरसीबीचा हा विजय साजरा करण्यासाठी बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर कर्नाटक सरकारने संघाच्या सत्काराचा कार्यक्रमदेखील आयोजित केला होता. पण या कार्यक्रमाला चेंगराचेंगरीचं गालबोट लागले. अकरा जणांना आपल्या जीवाला नाहक मुकावं लागलं दुर्दैवी घटना. आपल्याकडे गर्दी आणि गर्दीचं नियोजन ही मोठी समस्या आहे. नियोजन नसल्यामुळे लोक वाटेल तसे जमेल तिथे गर्दी करतात. लोक ऐकत नाही आणि नियोजन कोलमडतं.

मनी छंद गुलकंद

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
‘गुलकंद’ हा मराठी चित्रपट नुकताच १ मेला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात ढवळे आणि माने या दोन्ही कुटुंबांच्या धमाल प्रेमकहाण्या रंगवण्यात आल्या आहेत. गोष्ट अशी आहे की, ढवळे घराण्यात सई ताम्हणकर (नीता) आणि समीर चौघुले (मकरंद) हे दांपत्य सुखात राहत असून त्यांची मुलगी मीनाक्षी (जुई भागवत) आहे. माने घराण्यात प्रसाद ओक (गिरीश) आणि ईशा डे (रागिणी) हे दुसरे जोडपं असून त्यांचा मुलगा ओंकार (तेजस राऊत) आहे. मीनाक्षी आणि ओंकार यांच्या प्रेमातून दोन्ही घरांची लग्न तयारी सजते; पण लग्नाच्या पहिल्या सोहळ्यात एक धक्का बसतो – प्रसाद आणि सई हे भूतकाळातले प्रेमी होते!

खेळ मांडीयेला-भातुकली खेळ

Bhakti ·
अ लेकीला म्हटलं "आज आपल्याला भातुकलीचा खेळ पाहायला जायचं आहे." ती म्हणाली "भातुकलीचा खेळ म्हणजे काय?" मनात‌ल्या मनात म्हणाले की "एका भातुकलीच्या खेळाची किंमत तुम क्या जानो, जेनझी(generation z)" तिला म्हणाले "अंग किचन सेट पाहायला जायचय" " ओके , बार्बीपण असेल का तिथे ?" "चल तुला ठकीच आणते" ती आपली शांतप

प्रतिपश्चंद्र

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.

Lessons in Chemistry!

लई भारी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बऱ्याच दिवसांनी एक चांगली heartwarming सिरीज बघितली. ८ भागांच्या ह्या सिरीज मध्ये ६० च्या दशकातील अमेरिकेतील काळ उत्तम उभा केला आहे. Brie Larson(Captain Marvel फेम) ने Elizabeth Zott हे केमिस्ट्री मध्ये करियर करू इच्छिणाऱ्या पण विविध कारणांमुळे डावलले गेलेल्या आणि नंतर एक यशस्वी पण वेगळा कुकिंग शो चालवणाऱ्या कणखर स्त्रीचे पात्र साकारले आहे. सुरुवातीला तिच्या पात्रात एक टिपिकल आढ्यता जाणवते. थोडा एकसुरीपणा सुद्धा वाटू शकतो. पण हळू हळू कथेसोबत तिचा अभिनय पण उलगडू लागतो.एका चांगल्या कादंबरी चे रूपांतर असल्यामुळे कथा छान आहेच, पण सगळ्यात जास्त मला काही संवाद आणि पंच लाईन्स खूप आवडल्या.

कराडची मुलगी

चौथा कोनाडा ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नावात काय आहे ? असं कुणीतरी म्हटलंय ! आपण नवीन व्यक्तीला भेटलो किंवा नवीन व्यक्ती आपल्याला भेटली की आपोपाप पहिला प्रश्न हाच विचारला जातो " नाव काय तुझं ? आणि याचं उत्तर देताना चेहऱ्यावरच प्रश्नचिन्ह उभं राहत असेल तर ? कराडची मुलगी शिक्षणाच्या निमित्तानं मोठ्या शहरात आलीय आणि नोकरी साठी धडपड करत एका कंपनीत पोहोचतेय ... आणि " नाव काय तुझं ? असा प्रश्न आला की उत्तर काय द्यायचं देताना मनात हजार कल्लोळ उठतायत.... काय असेल कारण ? हे समजून घ्यायचं असेल तर नुकतीच प्रदर्शित झालेली "नाव काय तुझं ? " ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी !

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.