"सर तेजू"
सब ठीक है बा?
"हो. तुम्हाला वेळ आहे ना?"
कुछ तो कांड जरुर है, थांब एका ठिकाणी बसुन घेतो.
"दादा आला होता. २५ हजाराचा कॅमेरा देउन गेला. मी पारंपारिक पद्धतीने पाया पडले. खुपच इमोशनल झाला.अगदी कनफेशनल मोड मध्ये. कारण नसताना रायवलरीत वर्षे फुकट गेली, वगैरे वगैरे.
एवढा मोठा बदल? काय जादू केलीस?
"त्याला आई ने ठरवलेल्या मुलीशी लग्न करायचे नव्हते आणि आईच्या विरोधात जायची हिंमत नव्हती. कधी नव्हे तो माझ्याशी बोलला. मी समोरून नकार येइल अशी व्यवस्था केली.
खलनायकी?