Skip to main content

धोरण

एक भयानक (गंमतीशीर नसलेला) अनुभव

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 31/07/2023 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांवरुन आपल्याला आलेले अनुभव दुसर्‍यांच्याही उपयोगी पडु शकतात हे लक्षात आले म्हणुन हा अजुन एक अनुभव वाचकांपुढे मांडतोय. पहील्यापासुन वाटेल तेव्हा ,वाटेल तिथे दर्‍या खोर्‍यात, रानावनात भटकण्याची सवय्/आवड आणि देवळात्,गुहात्,नदीकाठी, खिंडीमध्ये अशा अतरंगी ठिकाणी मुक्कामाची सवय असल्याने (अर्थात ट्रेकिंग ग्रुपबरोबर) मला कधी अंधाराची, एकटेपणाची,किर्रर्र जंगलाची,उंचीची,खोल पाण्याची वगैरे भीती वाटली नाही.त्यामुळे अपघात,लुटालूट ,चोरीमारी वगैरे गोष्टी नेहमी दुसऱयांसोबत होतात असा माझा गोड गैरसमज होता.

एक गंमतीशीर भयानक अनुभव

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी गुरुवार, 27/07/2023 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! शीर्षक वाचुन गोंधळला असाल ना? मी ही तसाच गोंधळलो होतो म्हणुन आलेला अनुभव जसाच्या तसा मांडतोय. b बँगलोरहुन परत येण्यासाठी काल सकाळचे ५.३० चे विमानाचे तिकीट काढले होते. मी आणि बायको , शिवाय बरोबर थोडेफार सामान. तसे सुटसुटीतच होते म्हणा. आदल्या दिवशी मित्राकडे जेवायला गेलो असताना गप्पांमध्ये त्याने आग्रहाने सांगितले की एक तास आधी नक्की चेक इन कराच.

(मातीचे पाय - मोकलाया वर्जन)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 08/07/2023 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेर्ना - मातीचे पाय पयन स्प्र्शुन अले ते हत मलले होते लक्क उमग्ले तेवहा ते पय मतिचे होते मि केवल पहत होतो पयन्च्य खल्चि धुल ति ललतस लववि हे एकच मथि खुल मि इथ्वर पहुन अलो पौल्खुना विर्नर्या अधि कुन्वत, मगुन कप्ति विकत हस्नर्या अत पुन्ह चलवे पुधे, कि परत फिर्वे? सोस न-लयक पयन्चे पुसुन अव्घे तकवे? प्रेमल श्ब्दन्चि ओल मनत र्झिपत नहि व्हवे नत्मस्त्क पयहि दिसत नहि ते सरेच निगुन गेले जे पय दरवे सुच्ले मतिचे पत मत्कट मगे मज्यसह उर्ले टंकनीक चमनगोटा दाढिमिशि श्निवार ०८/०७/२०२३
काव्यरस

(गोट्या)

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी शुक्रवार, 23/06/2023 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा वाट्या सगळंच कसं मिळमिळीत, उदास आणि बुळबुळीत सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही छाप चाललेले असताना कधीमधी आठवतात आयुष्याच्या वळणांवर भेटणार्‍या गोट्या दोन मिटींगांच्या मध्येच स्मोकिंग झोन् पकडुन निवांत सुट्टा मारताना लहानपणी शाळा बुडवुन, मैदानात मित्रांना जमवुन हिरीरीने जिंकुन आणि अधाशीपणे खिशात भरुन घरी नेलेल्या आईचे धपाटे ,बाबांची नजर आणि भावाची चापलुसी चुकवत प्लास्टिकच्या डालडाच्या डब्यात, कपाटात दडवुन ठेवलेल्या मग पुढे कधीतरी शाळा सुटली पाटी फुटली होती नव्हती ईज्जत लुटली सोडवताना ईंजिनीयरिंगच्या केट्या
काव्यरस

मिपा संस्थापक, श्री तात्या अभ्यंकर, यांना श्रध्दांजली - पुण्यतिथी ४

लेखक Trump यांनी गुरुवार, 25/05/2023 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या १५ मे २०१९ रोजी वारले. साधारणतः २००७ मध्ये मिपाची स्थापना केली. आपल्या सारख्या अनोळखी लोकांना मन मोकळे करण्याचा आणि उत्तमोत्तम लेखनाचा आस्वाद घेण्याचा मार्गे उपलब्ध करुन दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांच्या विषयी इतरांनी भरभरुन लिहिले आहे.

९९ वर्ष्यानंतर

लेखक आंद्रे वडापाव यांनी बुधवार, 17/05/2023 10:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु' दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु. हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते. 'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार) 'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे.

दोन शशक--मधुसापळा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 10/05/2023 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
अहो लक्ष कुठेय तुमचे? मी म्हणतेय मुलाकडे सिऍटलला जाऊया. पण तुमचे आपले काम आणि काम .सारखे मोबाईलमध्ये डोके खुपसलेले. जणू सगळ्या देशाच्या सुरक्षेची जबाबदारी तुमच्यावरच. नाही जमणार ग.या महिन्यात दिल्लीला क्वाडची मीटिंग आहे. त्यानंतर युरोपला जायचे आहे. सध्या तर बोलूच नकोस सिऍटलचे. आता हे युरोपचे कुठून काढलेत? तुम्ही तर याआधी कामासाठी कधीच गेला नाहीत युरोपात? आणि आजकाल तुम्ही फारसे बोलतही नाही घरामध्ये. एनी प्रॉब्लेम? आता कसे सांगू हिला? सिमरन मागच्यावेळी बँकॉक मध्ये भेटलेली तेव्हा काय मजा केलेली आम्ही. फोनमधले फोटो पहिले की त्या आठवणी पुन्हा उफाळून येतात. आताही ब्रसेल्सला बोलावतेय.

नर्मदे हर- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 08/05/2023 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा बंद असताना धागा उडल्यामुळे पुन्हा प्रकाशित करत आहे. ====================================================== नमस्कार मंडळी नर्मदा परिक्रमा या विषयावर भरपूर लेख,पुस्तके वगैरे उपलब्ध आहेत. मला वाटते "नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये )" हे पुस्तक त्यातल्या त्यात जुने असावे. कारण श्री.जगन्नाथ कुंटेंच्या नर्मदे हर पुस्तकातही त्यांनी गुण्यांचे पुस्तक वाचून परिक्रमा केल्याचे लिहिले आहे.

चित्रपट परीचय-- फ्री गाय-

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी सोमवार, 20/02/2023 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार् मंडळी!! सध्या मिपावर साय फाय ची चलती दिसते. तद्वत काल स्टार मुव्हीज वर एक मस्त चित्रपट बघितला आणि वाटले की मिपाकरांना त्याची ओळख करुन द्यावी. तर हा चित्रपट म्हणजे "फ्री गाय" चित्रपटाची गोष्ट साधारण्पणे अशी---- फ्री सिटी हा एक ऑनलाइन व्हिडिओ गेम आहे जो सुनामी गेम्स नावाच्या कंपनीने विकसित केला आहे. पण त्याचा सोर्स कोड वॉल्टर "कीज" मॅकी आणि मिली रस्क यांनी विकसित केलेल्या लाइफ सेल्फ नावाच्या अप्रकाशित गेममधून चोरला गेला आहे. सुनामीचा मुख्य डेव्हलपर अँटवान होवाचेलिकने फ्री सिटी तयार करण्यासाठी तो कोड वापरला आहे.

शशक--दरोडा

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 08/02/2023 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे २ वाजलेत. गपागप डोळे मिटतायत. कडक एक्स्प्रेसो प्यायला हवी. समोरच्या काळ्या स्क्रीनवर वायरशार्कचे लॉग्स धडाधड सरकत चालले आहेत. दुनियाभरचे पब्लिक आय पी स्कॅन करतोय. बरेच दिवस झाले कुठे काही क्रॅक मिळत नाहीये. लोक हुशार झालेत की माझी टूल्स बोथट झालेत? अरेच्या!! एका सर्व्हरचे होम पेज उघडते आहे. पण एच टी टी पी, आर डी पी, एफ टी पी काहीच चालत नाहीये. आले लक्षात. व्ही पी एन क्लायंटवरून सोर्स आय पी बदलून बघतो. दोन तास खटपट केल्यावर क्रॅक सापडत गेला. आता फक्त थोडेच क्षण आणि कदाचित त्यानंतर.... दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरमध्ये हेड लाईन--कॉसमॉस बँकेचा सर्व्हर हॅक होऊन ९४ कोटी लुटले.