Skip to main content

धोरण

प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 04/06/2021 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे जणू क्रिकेटचा खेळ आपली संयमी फलंदाजी तिचे धारधार तेजतर्रार मादक यॉर्कर गोलंदाजी नीट समजण्यास द्यावा लागणार वेळ सर्व मुलींना समजत होतो पाटा खेळपट्टी सुमार वाटल्या म्हणुनी चालू होती हातभट्टी त्यातल्या त्यात बरी म्हणावी , शेजारी एक होती कळलं असतं घरी तिच्या तर झाली असती माती देउनी तिजला तिलांजली मी बनलो पुन्हा सेहवाग तय्यार झालो बॅट परजुनी, ज्वानीची शोधण्या आग ओढ लागली भेटीची , झालो दुखी कष्टी एक अनामिक यॉर्कर आला आणि उडवली मधली यष्टी भानावरती येऊनि तिजला डोळेभरून पाहिले हीच ती शोएब अख्तर जिच्या शोधास मन आसुसले काय तिची ती अदा वर्णावी, बॉल टाकते गदागदा सेहवाग

कसं पटवावं पोरीला ?

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 03/06/2021 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
कसं पटवावं पोरीला ? शोधत होतो लवगुरु अथक प्रयत्नांनी एक मिळाला ज्याची लफडी होती सुरु माग काढुनी भेट घेतली पण वाटला तो थकलेला प्रेमरसात तो न्हाउनी डुंबुनी असेल कदाचित पिकलेला मी पण होतो आसुसलेलो एक पोरगी पटवण्यासाठी सांगेल ते मी करणार होतो माझ्या मधल्या काठीपोटी पदस्पर्श करून मी त्याला म्हणालो मलापण प्रेम करायचंय तुमच्यावानी रुबाबात पार पोरींना घेऊन फिरायचंय ऐकून माझा उद्देश गुरुचे , हरपले सारे भान जुन्या आठवणींनी रडू कोसळले, कंठाशी आले प्राण रडू आवरून मला म्हणाला यात अवघड नसते काही वायफळ बडबड केली म्हणजे पोरी पटतात कशाही अक्कल यांची गुडघ्यात आणि दिडबुद्ध

नवीन समाजमाध्यम वावर नियमावलीच्या अनुवादात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 27/05/2021 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
२६ मे २०२१ पासून लागू झालेल्या (मिपासारख्या समाज माध्यम संस्थळांनाही) नियमावलीतील खालील अंशाच्या मराठी अनुवादात साहाय्य हवे आहे.

कोरोनाच्या बातम्यांचा गोळीबार

लेखक chittmanthan.OOO यांनी सोमवार, 24/05/2021 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच बातम्या बघायला टीव्ही लावला तेवढ्यात ब्रेकिंग न्यूज आलीच, पिवळ्या बुरशीचा पहिला पेशंट सापडला. आता बुरशी पण मॅचिंग मधेच यायला लागल्या. काळी झाली पांढरी झाली आज पिवळी सापडली आणि एक 4 नवीन रंगात आली म्हणजे चांगला सप्तरंगी घोडा लागतोय माणसाला. ती काळी बुरशी डोळ्यावर मेंदूवर परिणाम करत्या पांढरी बाकीच 3-4 अवयव धरत्या आधीच कोरोना मूळ लोकांची गांड फाटल्या. सांगायला एक अवयव सुरक्षित नाही.निस्ता गोळीबार झालाय बघा. चॅनेल वाल्यांची तर पार स्पर्धा सुरू असत्या तू मोठा साप सोडतो का मी मोठा साप सोडतो.

कट्टे कसे असावेत .. ? एक दृष्टीकोन

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 23/05/2021 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपावर सुमारे ९ वर्षे आहे .या दरम्यान काही कट्टे झाले त्यात मी सामील होतो. मी मुळातच व्यक्तिपूजक वा मूर्तिपूजक नसल्याने मी मिपावर तसे खरडवही ,खरडफळा असे वापरून माझा दरबार तयार करण्याचा प्रयत्न केला नाही. सबब कट्टा असल्यावर " आहे कसा आननी ? " अशी मला काही उत्सुकता कुणाबद्दल नसे. तसेच माझ्या प्रोफाईल मध्ये माझे नावासकट आवडी व नावडी सुद्धा स्पष्टपणे लिहिले होते .माझ्या लेखनातून माझे व्यक्तित्व लोकांना पुसटपणे कळले असेल इतकाच तो काय स्वार्थ मी साधलेला आहे. मिपावर प्रथमपुरुषी एकवचनी काही लिहिलेले लोकांना फारसे आवडत नाही असा माझा अभ्यास आहे ! " मी बोटीवर होतो तेंव्हा !

समास

लेखक अनुस्वार यांनी सोमवार, 03/05/2021 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
समासातल्या रेषेला सुद्धा ओढ असते शाईची. तिथल्या मोकळ्या जागेला वाटतं आपल्यावरही उमटावी अक्षरांची काळी-निळी नक्षी. ती वाचतांना फिरावा कुणाचातरी हात आपल्यावरून आणि स्पर्श व्हावा थेट वाचकाच्या मनाला. अनुभवावीत ती भावनांची वादळे नि:शब्द होवून. पण समासाला कुणी सांगावं, तुझं रितेपणच कागदाच्या तुकड्याला त्या शब्दमुद्रा झेलण्यास योग्य बनवतं. ओळींत न सापडणारे अर्थ त्या समासाच्या पटलावरच लिहिले जातील. काही लिहायचे राहून गेले तर लेखकाला समासाचा किती आधार असतो. स्वतः सोबत घालवलेले एकांतातले क्षण म्हणजे आपल्या आयुष्याचा समास! जे राहून गेलं ते भरणारा मोकळा समास!

आभार

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 02/05/2021 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सतत दर ३०सेकंदाला कानावर पडणार्‍या 'ब्रेकींग न्यूज' ने सुन्न झालेल्या मनाला काहीतरी दुसरा विषय द्यावा म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन काँग्रेस समोर दिलेल्या भाषणाची प्रत काल वाचायला सुरुवात केली. ते त्यांच्या राष्ट्रीय नेत्यानी दिलेले भाषण अशीच भूमिका मनात असल्याने वाचताना थोडा सैलावून वाचत होतो. अचानक एक ओळखीची वाचावी अशी फ्रेज 'a once-in-a-generation investment' डोळ्यासमोर आली आणि मी भारतात परत आलो. आरोग्य -शिक्षण -रोजगार या क्षेत्रातल्या येऊ घातलेल्या काही बदलांबद्दल पुढे बरेच काही लिहिले होते पण मला हे नक्कीच जाणवले की हे आपल्याला काही नवे नाही.

मनोगत

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 30/04/2021 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
खिशात माझ्या घेऊनि फिरतो वादळ घोंघावते इंद्रधनू भवताली माझ्या सतरंग पसरते भावनांचा लाव्हा जिभेवर आस नाही मज कसली यमकांची मोळी बांधुनी मी विस्तवात टाकली जान्हवी जणू डोळे माझे जिथे तिथे पोहोचते अनुभवाची लाट उसळुनी मनसागरात धडकते लखलखतो तो सूर्य हाती शब्द जाळत फिरतो विसरतो मी रीत सारी आठवेल ते लिहितो कधी बरसतो मेघ सावळा थेंबे थेंबे पाणी काव्य नसे हे अव्वल मित्रा हि तर अनुभवाची कहाणी .... हि तर अनुभवांची कहाणी ................. ===================================== सिद्धेश्वर विलास पाटणकर

श्वासांचा बाजार

लेखक खिलजि यांनी बुधवार, 28/04/2021 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
श्वासांचा बाजार शिगेला पोचलाय करोनाचा विळखा सर्वाना पडलाय लालीपावडर लावून घरात जरी बसला तरी करोनारूपी राक्षस घरात जाऊन डसला वॉट्सऍपवर तर नुसता ऊत आलाय अरे , तिथे जाऊ नका रे त्याला करोना झालाय इस्पितळात तर जायची सोयच राहिली नाही रेमडीसीवीर नाही तर खाट मिळत नाही अरे कुठून आणू मी हे सर्व , जर तो इलाजच अस्तित्वात नाही चांगला ठणठणीत होता तो कुणास ठाऊक कसा गेला ? कुणी म्हणत अटॅक आला तर कुणी म्हणे त्याला करोना झाला खरं खोटं काय ते त्या वैद्याला ठाऊक पण दीडफूट फाटली सर्वांची आपलं काही झालं तर म्हणून सर्वच भावुक सरकार काय करतेय ते देव जाणे काहीतरी करतेय असे त्यांचेच म्हणणे लोकडाऊन

प्रकल्प- समान संधी

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 02/04/2021 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
एकेकाळी होतकरू विद्यार्थ्यांच्या मदतीला 'जगन्नाथ शंकर शेठ' यांच्यासारखी धनीक मंडळी मदतीला उभी असायची. आता काळ बदलला आहे. आपल्या समाजात झालेल्या शैक्षणिक क्रांतीनंतर अनेक 'मिनी जगन्नाथ शंकर शेठ' होतकरू विद्यार्थ्यांना मदत करायला सज्ज आहेत. इथे आमच्यासारखे शैक्षणिक सल्लागार त्यांना मदत करू शकतात. त्यांच्या मदतीसाठी योग्य विद्यार्थी कोण असेल याची नियमावली बनवून , त्यांना देण्यात येणार्‍या मदतीचे स्वरुप आणि प्रत्यक्ष मदत दिल्यावर त्या मदतीचा होणारा विनियोग या आवश्यक बाबींकडे लक्ष देणे हे काम आम्ही पार पाडत असतो. या कार्यक्रमाची सुरुवात २०२० साली प्रायोगिक तत्त्वावर "समान संधी" कार्यक्रमाने झाली.