मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बालगीत

कोल्हे वाण्याला कोकणी सल्ला

धनंजय ·
कोल्हापूरचा कोल्हे वाणी पोलादपूरला सोले आणी! सल्ला सच्चा सोळा आणे सोलापूरला पोलाद नेणे

लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र

धनंजय ·
लहान मुलांना पोटशूळ झाल्यास म्हणायचा मंत्र अ अ अनशापोटी आ आ आवळा खाल्ला इ ई इथे बसलाय्? उ ऊ उड्या मारतोय्? ए ए एकदा सांगून ऐ ऐ ऐकत नाही! ओ ओ ओरडतोय् औ औ औषध द्याला - अं आं आंबटशोक अ: आहा आंगलट आला! छूऽऽ मंतर... बाऊ दूऽऽर गेला!

(नाठाळ मुलांसाठी) बालकविता

धनंजय ·
अरे अरे शेंबड्या गंपा तुझ्याकडे रुमाल नाही? तो कशासाठी बाप्पा - शर्टाला जर आहे बाही. गाल फुगवून बसली आहे कोपर्‍यामध्ये रुसूबाई रडून कहर केल्यापेक्षा परवडले हे रुसू बाई लवकर लवकर उठायाचे शाळेत जायचे झटपट आटपून कशाला या उठाठेवी - मास्तर रोजच काढणार झोडपून

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.