मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

आजानुकर्ण ·
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

भाईकाका, हॅपी बर्थडे टू यू...

विसोबा खेचर ·
राम राम भाईकाका, आज फार चांगला योगयोग जुळून आला आहे. आज दिवाळीचा पहिला दिवस, शिवाय ८ नोव्हेंबर, तुमचा वाढदिवस..! त्यामुळे सकाळी सकाळीच तुमच्या सुंदर स्मृतींचं अभ्यंगस्नान आम्हाला घडलं! मी सर्व मिसळपावकरांच्या तर्फे तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो.. तुमच्या लाडक्या पोष्टाचं चार रुपयांचं तिकिट डकवून ह्या पत्ररुपी शुभेच्छा पाठवत आहे, तेवढ्या गोड मानून घ्या... हॅपी बर्थडे टू यू...भाईकाका! तुमचाच, तात्या.

नवरात्रीच्या शुभेच्छा

धोंडोपंत ·
सर्व मिसळपाव वाल्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आई जगदंबेच्या कृपेने, शेअरबाजार तुफान कोसळून मार्केटची काशी होवो, अशी प्रार्थना. आपला, (तेजी-पीडित) धोंडोपंत आज तरी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आई जगदंबेने आमचं गार्‍हाणं ऐकलं म्हणायचं. सोमवार पासूनही अशीच पडझड कायम राहो..... आई जगदंबे...... या धोंड्याला पाव गं पाव !!!!!

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

चित्तरंजन भट ·
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात. तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.

अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

धोंडोपंत ·
मिसळपाव डॉट कॉम हे संकेतस्थळ सुरू करून तमाम मराठीप्रेमी जनतेची बौध्दिक आणि वैचारिक भूक भागविण्याचे महान कार्य सुरू केल्याबद्दल तात्या सरपंचांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा. या संकेतस्थळामुळे मराठी लेखनास आसुसलेल्या सृजनशील व्यक्तिंना कोणत्याही फालतू प्रशासकीय वा तथाकथित धोरणात्मक दबावास बळी न पडता मनाजोगे लेखन करता येईल आणि इतरांच्या लेखनाचा आस्वाद घेता येईल. त्याचप्रमाणे मिसळपाव सुरू होताच, हाटेलात तुडुंब गर्दी करणार्‍या सर्व जुन्या ओळखीच्या खवय्यांनाही मनापासून शुभेच्छा. आम्हीही एक मिसळपाव व चहा हादडून मस्तपैकी तंबाखूपान लावून येतो.

गणपती बाप्पा मोरया!

विसोबा खेचर ·
गणपती बाप्पा! १४ विद्या, ६४ कलांचा अभिषिक्त राजा! सर्वांना गणेशोत्स्वच्या अनेकोत्तम शुभेच्छा! हा आम्हा गरीब, कोकणातून पोटापाण्याकरता मुंबईला आलेल्या चाकरमानी मुंबईकरांचा "लालबागचा राजा!" मुंबईकरांचं आराध्य दैवत! लालबागच्या राजाचा विजय असो.. आपला, (लालबागच्या राजाचा भक्त!) तात्या.