* सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा *

सचिन उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्या व्यतिरिक्त सचिनबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असल्यास जसे काही किस्से / त्याचा स्वभाव / आठवणी असल्यास कृपया इथे शेअर कराव्यात.

सचिन उत्तम क्रिकेटपटू आहेच, पण त्या व्यतिरिक्त सचिनबद्दल आपल्याला काही अधिक माहिती असल्यास जसे काही किस्से / त्याचा स्वभाव / आठवणी असल्यास कृपया इथे शेअर कराव्यात.
सर्व मिसळपाव सभासदांना चैत्रपाडव्याच्या शुभेच्छा! आज चैत्रपाडव्याच्या निमित्ताने काही ओळी सुचल्या.
चैत्रपाडवा नववर्षाचे आला उधळित रंग
मोहरलेले तरुवर झुलती गाती गीत विहंग
सांजसकाळी मत्त कोकिळा करिती मधुकूजन
प्रितीचे बांधून पदिपैंजण मोर करी नर्तन
कविताशाखेवरी बैसला वाल्मिकी कोकिळ
रामनामजप करिता रचिले रामायण सकळ
वैराग्याचा वसंत फुलवी ज्ञानेश्वर माउली
वसंत वीरांचा सजवाया जगदंबा पावली
लोकहो,
मिसळपावच्या सर्व सभासदांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.
हे नवीन वर्ष आपणांस सुख-समाधानाचे, आनंदाचे, ऐश्वर्याचे, आरोग्याचे जावो, आणि नवीन वर्षात आपले जीवन आनंदमय, सुखमय होवो, अशी श्री व्याडेश्वरचरणी प्रार्थना.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
पंचांगाबद्दल खुलासा:-
दिनांक ०६/०४/२००८ रोजी आपले नवीन वर्ष सुरू होत आहे. या दिवशी सकाळी गुढी उभारून, नवीन पंचांगाची पूजा केली जाते.
माझ्याकडे एक सुंदर मराठी शुभेच्छापत्र आहे. काय आश्चर्य, त्यातल्या ओळी ह्या चित्राला बिनचूक बसतात. अगदी एका ओळंब्यात. ह्या योगायोगाची गंमत वाटली कारण दोन कुठल्या वेवेगळ्या जगातल्या गोष्टी. एक नेटवरची तर एक छापील कागदावरची. म्हणून हे चित्र आणि त्या ओळी इथे देत आहे.
आम्ही दूध पितो.
मांजरही दूध पिते.
पण मांजराच्या ते अंगी लागते.
उद्या गुरुवार दिनांक ३ एप्रिल पासून दर गुरुवारी अर्धा तास इप्रसारण. कॉम येथे प्राजक्ता पटवर्धन 'आवली' या तुकारामांची पत्नी आवली हिच्यावर लिहिलेल्या कादंबरीचे वाचन करणार आहेत. याविषयी अधिक माहिती https://www.manogat.com/node/12713 येथे वाचता येईल.
(तुकयाची आवली- लेखक- सौ मंजुश्री गोखले
मेहता प्रकाशन, पुणे )
त्या कार्यक्रमावर, त्या कादंबरीवर आणि आवलीविषयी मिसळपावकरांना असणार्या माहितीची देवाण घेवाण करता येथे यावी म्हणून ही चर्चा सुरु केली आहे. प्राजुला आम्हा सर्वांच्या शुभेच्छा.
मित्रानो,आज दि. २९ मार्च रोजी आपला छोटा डॉन उर्फ हरिप्रसाद याचा वाढदिवस आहे. मिपावर अनेक डॉन येऊन गेले पण छोट्याची भाईगीरी मात्र अद्याप कायम आहे. मिसळपाव परिवारातर्फे छोटा डॉन याला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
डॉनराव हॅप्पी बर्थ डे बरं का! आता पार्टी कधी देणार :)
मिसळपावच्या कट्ट्यावरती विडंबन दिले तू मला
टोपणनावे `तूटून' पडलो ओळखले का मला
चतुरंग मी, मी प्राजू ती
सुशील, लाडू, खेचर येती
नाव भिन्न परी एकच यु(क्)ती
मतामतांचा पूर तेधवा कट्ट्यावर पातला
घाला बंदी ! नको विडंबन
मद्याचे तर नकोच चिंतन
मिसळ खाऊ या कांद्यावाचून
सुमारकेशव पाठ फिरवता, झोप उडे आजला
इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..
मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..
ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..
राम राम मंडळी,
आपल्याला सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव डॉट कॉमच्या अक्षर-सामर्थ्यदात्याने, म्हणजेच गमभन ने आता कात टाकली असून त्याची पुढील आवृत्ती 'गमभन ०८.०२.२०' ही आता प्रकाशित झाली आहे आणि मिसळपावला जोडली गेली आहे!