मागे दिड-दोन वर्षांपूर्वी जेव्हा मला अंधारछाया आणि शिरवळकरांची बरीच जुनी पुस्तके मिळाली होती तेव्हाची ही गोष्ट आहे.
त्यावेळेस मला अनपेक्षितरित्या हा खजिना मिळाला होता, आणि माझ्या संग्रहात आणि माहितीत नवीन भर पडली होती. त्यावेळेस मला असे वाटत होते, की शिरवळकर कुटुंबीय आणि ठराविक ४-५ लोक सोडले तर माझ्याइतकी माहिती कोणाही जवळ नाहीये.
मी त्यांच्या ’थर्राट’ ह्या रहस्यकथेच्या १९८८ सालच्या आवृत्तीच्या शोधात काही दिवस अनेक ग्रंथालये आणि जुनी रद्दीची दुकाने पालथी घालत होतो.