नूपुरताई,
नमस्कार.
तुम्ही मला ओळखत नसला तरी मी तुम्हाला ओळखतो. मराठी असलात, तरी तुम्ही इंग्रजी वळणाच्या कुटुंबात वाढलेल्या आहात. त्यामुळे माझं हे पत्र -छोटं असलं तरी- वाचताना जरा त्रासच होईल. बरं, इतर कुणाकडून वाचून घेता येण्यासारखंही नाही. कारण तुम्ही जिथं आहात तिथून दूरदूरपर्यंत कुणी मराठी बोलणारा-वाचणारा सापडताना कठीण आहे.
पण वाचनाची सवय नसल्यानं होणारा त्रास तुम्हाला फारसा जाणवायचा नाही. कारण ज्या क्रूर अग्निदिव्यातून तुम्ही जाताय, त्यापुढे हे सर्व क्षुल्लक आहे.
तुम्हाला गेल्या सात-आठ वर्षांपासून ओळखत असलो, तरी पत्र लिहावं असं मात्र आजच वाटलं.