Skip to main content

सद्भावना

नवराष्ट्र "पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे " चे राष्ट्रगीत

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 17/10/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
पीपल्स रीपब्लीक ऑफ पुणे या राष्ट्राचे राष्ट्र गीत कोणते असावे असे तुम्हाला वाटते? आमची कुठेही शाखा नाही. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेच शाखा नाही. !! धृ !! जे का हिंडले बिंडले पत्ता शोधण्यात गुंगले ते उलटे जावोनी गंडले या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही सुजला सुफला मुळा मुठा अन दुथडी भरी नागझरी. सर्वांचे चितळे पोटभरी सदाशिव नारायण साहित्य मांसाहारी उण्या दुण्या चे काम नसे हे पुण्या गुण्याचे नाव असे हे. या इथे अन फक्त इथेच आहे सर्व काही आमची कुठेही शाखा नाही. जय हे जय हे जय जय हे....... जय.पुणे......

मला न आवडलेली पुस्तके: आत्मचरित्रे/चरित्रे

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 http://www.misalpav.com/node/29133 ------------------------------------------------------------------------------- या आधीच्या ३ धाग्यांप्रमाणेच या धाग्यात लिहूया मला न आवडलेल्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल. चरित्रे/आत्मचरित्रे न आवडण्याची कारणे काही अशी सांगता येतील की त्या पुस्तकात सत्याचा विपर्यास झालेला कधी कधी दिसतो. तर कधी आत्मप्रौढीचा वास येतो.

मला आवडलेली पुस्तके: आत्मचरित्र/चरित्र

लेखक पुस्तकमित्र यांनी बुधवार, 15/10/2014 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28198 http://www.misalpav.com/node/28241 ________________________________________________________ नमस्कार मंडळी. काही अपरिहार्य अडचणींमुळे हा पुढचा भाग टाकायला उशीर झाला आहे, त्यासाठी क्षमस्व. याआधीच्या भागात आपण आपल्याला आवडलेल्या कादंबर्‍यांबद्दल लिहिले होते. या वेळी आपल्या आवडत्या आत्मचरित्रे/चरित्रे याबद्दल थोडक्यात लिहूया! आधीच्या यशस्वी भागांप्रमाणेच तुमच्या उत्स्फूर्त सहभागाची अपेक्षा आहे! चला तर लिहूया आपल्या आवडत्या आत्मचरित्र किंवा चरित्रांबद्दल!

मतदान करा...

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी सोमवार, 13/10/2014 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
.

मतदान करणे प्रत्येक सुजाण नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे.

.

निवडणुकीत मतदान करू की नको असा विचार मनात आल्यास खालच्या चित्रातील संदेश डोळ्यापुढे आणा...

(कोणताही राजकारणी जन्मतः वाईट नसतो. मतदान न करणारे नागरीक वाईट राजकारणी घडवतात.)

निरवतापाची जत्रा

लेखक निराकार गाढव यांनी रविवार, 12/10/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
अताशा निरवतापाच्या जत्रंला पूर्वीसारखी मजा नाय रावली. तुमी इचाराल ह्यो निरवताप कोणचा गाव... तर आपल्या सार्वेजेनिक पारापासून तसा अगदी हाकंच्या अंतरावर हाय. येक पाच कोस आलिकडं म्हनाना. तर निरवतापात खूप जत्रा लागतात. खंडोबाची जत्रा, नीळावण्ती देवीची जत्रा, अंबाबायचा गोंदोळ, ग्यानबाची पाल्की, नरसोबाची गाडी,...  निसता उच्छाद असतुया. पोरं आयबापाची नजर चुकावून सांजंला साळा सुटली की उणाडक्या करत जत्रंत शिरायची. मलाबी त्ये बरुबर घ्यायची. गरदीमद्दे लै धम्माल आसायची. देवीच्या म्होरं पोरं लेझीम खेळायची. मंग मोट्टे मानसं पोरांस्नी कायतरी खायाला द्यायच्ये आन एक दोन रुपं बी हाती टिकवायच्ये.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

लाल बहादुर शास्त्री जयंती......

लेखक _मनश्री_ यांनी गुरुवार, 02/10/2014 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
laal bahadur shastri आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची १०९ वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ३: ऋतु (Seasons)

लेखक संपादक मंडळ यांनी बुधवार, 24/09/2014 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 --------------------------- छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या २ स्पर्धांनंतर तिसरी स्पर्धा जाहीर करताना अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेचा विषय राहील ऋतु (Seasons) स्पर्धेचे नियम दुसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील. म्हणजे प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून ७ दिवस.

रायडींग ऑन अ सनबीम

लेखक श्रीरंग_जोशी यांनी बुधवार, 24/09/2014 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
डिसक्लेमर – हे लेखन इथे प्रकाशित करण्याचा उद्देश म्हणजे रायडींग ऑन अ सनबीम या डॉक्युमेंट्री फिल्मबाबत अधिकाधिक लोकांपर्यंत माहिती पोचवणे हा आहे. यामध्ये मिसळपाव.कॉमची भूमिका केवळ एक माध्यम एवढीच मर्यादित आहे. Riding on a sunbeam मौक्तिक कुलकर्णी - एक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर व न्युरोसायंटिस्ट पण पट्टीचा भटक्या.

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 22/09/2014 17:52 या दिवशी प्रकाशित केले.

जिव्हा शुद्धी एक राष्ट्रीय अभियान

पचा पच थुंकणे व तसेच येता जाता कशा न कशा कारणांनी शिव्या देणे हा आपला राष्ट्रीय टाईम पास आहे. माता व बहिणींवर अशा मेहरबानीयां फार होतात. `च्या यला` हे पालुपद जास्त अन् ग्राम्य शिवी कमी अशी आजची अवस्था आहे. बामणांच्या चिकन मटन खाण्यामुळे मागणी वाढून भाव चढले असे चेष्टेने म्हणतात. खरे खोटे माहिती नाही. पण शिव्यांच्या मक्तेदारीत गैरब्राह्मण समाजाच्या मुक्त संचारात ब्राह्मणी जिव्हा तितक्याच जिव्हाळ्याने चालताना ऐकून, 'लगे रहो' असा पवित्र संदेश द्यावासा वाटतो...! भाषा शुद्धीच्या चर्चा कानावर येतात. पण शिव्यांना 'चले जाव' करायला आपली जीभ का कचरावी?