आपल्या आयुष्यात अशा किती घटना किती प्रसंग येतात जेव्हा आपण वहावत वाईट मार्गाला लागू शकतो. तसे झाले असते तर आज आपली अवस्था काय असती; आहे यापेक्षा चांगली असती कि वाईट असती?
माझ्या घरापासून शाळा ४-५ किलोमीटर अंतरावर होती. शाळेतली शेवटची ३ वर्षे म्हणजे ८ वी, ९ वी आणि १० वी मी सायकलने ये जा केली. रोज जाता येता बरेच मित्र सोबत असायचे आणि गप्पा मारत जायला यायला मजा यायची. विषय पण १४-१५ वर्षाच्या मुलांच्या नेहमीच्या विषयांसारखेच असायचे; म्हणजे अभ्यास, शाळा, सर, मॅडम, सायन्स ईतर शाखांपेक्षा किती भारी आहे, कॉम्पुटर गेम्स, मुली वगैरे.