बर्याच दिवसांपासून मित्र-मैत्रिणींकडून, नातेवाईकांकडून या कादंबरीबद्दल वाचून पहा अशी शिफ़ारस केली जात होती...( त्यावर निघालेले नाटक.."ग म भ न", नुकताच रिलीज झालेला सिनेमा, तोही हिंदी, " हमने जीना सीख लिया"..., बर्याच लोकांच्या नुकत्याच वाचलेल्या चांगल्या पुस्तकांत त्याचा समावेश..त्यामुळे उत्सुकता अधिकच वाढलेली होती)...शेवटी वाचनाचा मुहूर्त लागला या आठवड्यात...इथे यावर चर्चा झडलेली आहे की नाही ते मला माहित नाहीये, पण वाचून मस्त वाटलं, आणि ते इथे सांगावंसं वाटलं....
.....कादंबरीचा नायक एक नववीत गेलेला मुलगा आहे, नववीचे वर्ष नुकतेच सुरू झालेले आहे, (हा आणीबाणीचा १९७६ चा काळ आणि बहुधा हे डोंब