मिसळपाव- एक कुरण..
इथे वरचेवर लिहिणारे, वावरणारे सभासद, लेखक यांच्यासाठी ही कविता. कोणतेही कवितेचे बंधन न पाळता लिहिलेली. जितकी नावे आठवली इथे सापडली आणि कवितेत गुंफण्यास सोपी वाटली त्या सभासदांचि नावे घेतली आहेत.. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही. ही निव्वळ कविता आहे.. आणि सगळ्यांनी हलकी घ्यावी हि विनंती..
मिसळपाव नावाच्या कुरणामध्ये लहानमोठी मेंढरं जमवतो,
तात्या मेंढपाळ स्वतःला मात्र विसोबा खेचर म्हणवतो..
ओंकार,निलकांत असती या कुरणाचे राखणकर्ता,
दाढा कोरत बसतो प्रसाद, बिपिन म्हणे मी कार्यकर्ता..
ऐतिहासिक झाली प्रियाली, सहज्-सर्किट इथे रमती,
जर्मनीच्या गमती जमती, सुगरण होई दोन्ही स्वाती..
सुर्याला ठेऊन सर्वसाक्षी, कोलबेरही फोटो काढतो,
बेसना सारखी लाडवी गझल सुमार म्हणत केशव फाडतो..
स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,
मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..
सागर, चतुरंग, धनंजय काळा, व्यक्त होऊ पाहणार अव्यक्त,
चारोळ्या गुंफत यांच्या समवेत सुनितही होई मुक्त..
भडकम्कर तो नदिपरी संथ, 'राज' साठी इनोबा तडफडे
आनंदाचे यात्री अन् घन, 'सकाळा'त अभिजीतच्या आनंदीआनंद गडे..
काम नको टाईमपास करा, सदान्कदा सांगे वरदा..
प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
चित्रमुद्रिता राजमुद्रा, सृष्टीचे लावण्या घाली पसारा,
वाटाफोडित जातो सुधिर, शेखर म्हणे मेतकुटभात बरा..
आठवणींत भिजतो सतिश, गोडबोलत अशोक लिहितो,
मनिष, धृव, मानस अधे मधे, झकासही कोल्हापूरला नेतो...
धोंडोपंतांचे ग्रहतारे, गुंडोपंतांना नौशिया भरे,
राजे निघाले सफरीवरी, प्रमोदांना मात्र देव स्मरे..
पुष्कर, किशोरी नित्याचेच, लंबूटांग, गंधार नेवेही या
सुनिल, हर्षल, मदनबाण, माहिती प्रसारण माझी दुनिया..
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.
- (कुरणातली शेळी)प्राजु
वा!
लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.
(आस्वादक)बेसनलाडू
In reply to वा! by बेसनलाडू
हेच
लयबद्ध झालीये कविता. वर्णन आवडले.
(लाडवी गझला फाडणारा)सुमारकेशव
वाहवा!!
सही जमली आहे..
पुण्याचे पेशवे
वा ....
एकदम सहीच ...
विद्याधर
धन्यवाद..
बेसन लाडू, धनंजय, विद्याधर आपले मनापासून आभार.
- सर्वव्यापी)प्राजु
क्लास! :)
प्राजू, तुझी कविता खरंच सर्वव्यापी आहे! मस्त वाटली वाचायला...!:)
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावरती.... वेलू नेती.
क्या बात है...!
इथे फक्त 'गगनावरती.... वेलू नेती' च्या ऐवजी 'गगनावेरी.... वेलू नेती' असे पाहिजे असे वाटते. ज्ञानोबामाउलीनेही 'तयाचा वेलू गेला गगनावेरी' असेच म्हटले आहे..
असो...
आपला,
(मेंढपाळ) तात्या.
धन्यवाद
धन्यवाद तात्या..
- (सर्वव्यापी)प्राजु
हे हे
सही आहे.. मजा आली वाचताना
-ऋषिकेश
अरे वा..
एखाद॑ औषध वगैरे आहे का त्यासाठी? घ्याब॑ म्हणतो...५-७ लिटर :))
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
एकमेका घेऊन सोबती, गगनावेरी.... वेलू नेती.
हे एकदम मस्त.
स्कॉच सारखा पिवळा डांबिस एखादी चरोळी तोंडात टाकतो,
मुलगा तो धमाल म्हणत ऋषिकेशही एक गझल हाणतो..
च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?
(कुरणातली शेळी)प्राजु
ह.ह .पु.वा.
-कुरणातल॑ नाठाळ कोकरू
ध मा ल.
In reply to अरे वा.. by धमाल मुलगा
'ऑड मॅन आउट' ?
च्यामारी, ऋषिकेशला कशाला बिचार्याला आमच्या प॑क्तीत बसवल॑ बुवा?
असं का रे धमाल? मला का बॉ 'ऑड मॅन आउट' काढतोयस? ;) मला धमाल आली त्या पंक्तीत बसायला :प
-(ऑड मॅन)ऋषिकेश
मस्तच प्राजु!
किती मिसळून गेली आहेस ग मिसळपावमध्ये ! इतकी की स्वता:ला सुध्दा विसरलीस?
आज तू मला अशी वाटलीस-
मिसळलीस तू अलगद, मन विचारी रंग तुझा कोणता?
तू म्हणालीस पाण्यासारखा,
लाल मिसळता प्रेमा, हिरवा मिसळता हरीता,
पिवळा मिसळता तेजा, निळा मिसळता सरीता.
राजमुद्रा :)
छान...
प्राजु, मस्तच जमली आहे कविता...
कुरण दिसे हे लोभसवाणे, रथी महारथी इथे चरती
हे मात्र एकदम चपखल बसले आहे.
बिपिन कार्यकर्ते.
प्राजु
प्राजु,
मिसळ कविता झकास!
स्वाती
एक अवांतर विचार..
ह्या सुंदर कवितेकरता प्राजूचे तर कौतुक निश्चितच आहे, परंतु त्याही पलिकडे जाऊन खालील एक विचार सहजच आत्ता मनात डोकावला.
अवघ्या चारसहा महिन्यांच्या कालावधीतच मिपावर वावरणार्या इतक्या सार्या मंडळींच्या लेखनानुसार, वावर-विशेषानुसार एक सुंदर कविता लिहिली जावी, ही माझ्यामते मिपाकरता नक्कीच भूषणावह गोष्ट आहे!
मिपाकरांचा मिपावरील अगदी घरच्यासारखा वावर, कुठेतरी माणसांबद्दलची आपुलकी आणि ओढ, थोडीशी पारिवारीक, कौटुंबिक भावना इत्यादी गोष्टी असल्याशिवाय अशी कविता जन्म घेत नाही असं मला वाटतं!
असो...!
आपला,
(समाधानी परंतु अंतर्मूख!) तात्या.
झकास!!!!
अरे वा प्राजु एकदम मस्त कविता,या कुरनाचे रुप सुदधा एकदम पालतुन गेले आहे
वा सगळ्च छान वाटते आहे!!मस्त....
(कुरनात चरायला येनार मेंढृरु)किशोरी
अरे वा !
माझी दुनिया (http://majhimarathi.wordpress.com)
वाह!
शब्दच सुचत नाहीत...
प्राजू ,लय भारी
(येडं कोकरु)
||इनोबा म्हणे||
हेहेहे....
शेळीताई,
कुरण आवडले......
छोटी टिंगी ;)
अवांतर : दोन ओळींमध्ये इतकी जागा रिकामी कशी ? लाईन स्पेसिंगचा प्रॉब्लेम आहे का?
In reply to हेहेहे.... by ब्रिटिश टिंग्या
अरे धनंजय
अरे धनंजय काळा.. शिफ्ट पकडून एन्टर मार.. म्हणजे लाईन स्पेसिंग कमी होईल.
- (सर्वव्यापी)प्राजु
वा प्राजु,
फारच छान रचना. संवेदनशील आहेस. अशीच रहा.
चतुरंग
कविता आवडली
प्राजु कविता छान झालीये. आवडली बघ !
नीलकांत
शेळीताईच्या .....
कुरणात उतरली चारोळ्यांची परी.
खास मिपाकरांसाठी. झकास. मी तर अवघ्या महिन्यादोनमहिन्यापूर्वी आलो. आपल्या सहज आपुलकीने केव्हा मिपा कर झालो कळलेहि नाही.
असाच सर्वांचा लोभ असूद्या.
धन्यवाद..
आपण सर्वांनी ही येडी कविता.. गोड मानून घेतलीत यातच सगळं मला मिळालं..
राजमुद्राताई,
तू माझ्यावर लिहिलेल्या रंगित ओळी खूप आवडल्या. मनापासून धन्यवाद.
बिरूटे सरांच्या "तात्या मनोगतावर .." या लेखातूनच खरंतर मला स्फुर्ती मिळाली असं मी म्हंटल तर वावगं ठरू नये. मी सरांची आभारी आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
मस्त
सृष्टीचे लावण्या घाली पसारा,
प्राजुताई, *** मिपाकरांचा एकूण स्वभाव पाहता तुमची ओळ म्हणजे फारच
सौजन्याचे लक्षण आहे म्हणायचे. तुमच्याऐवजी दुसरा कोणी मिपाकर असता
तर नक्की उकिरडा किंवा तत्सम शब्द वाचायला मिळाला असता या विषयी
शंका नाही.
*** मूळ वाक्य पु.लंच्या असा मी असामी मधील. ऐका इथे :
http://ideasnext.com/marathimusic/Kathakathan/index.htm
In reply to सृष्टीचे लावण्या घाली पसारा, by सृष्टीलावण्या
अहो यात
अहो यात काही वेगळा अर्थ नाहिये. तुम्ही 'पसारा" या विषयावर इथे चर्चा घडवून आणली होती ना म्हणून तो संदर्भ तुमच्या नावासोबत घेतला. तसेच शेखर चा संबंध "मेतकुट भात" या चर्चेशी निगडीत आहे. वरदाच संबंध " ओफिस मध्ये काम नसताना तुम्ही काय करता? " या तिच्या लेखनाशी, सुधिर कांदळकरांचा 'वाट फुटेल तिकडे" शी, प्रभाकर पेठकरांचा त्यांच्या ओमान मधल्या रेस्टॉरंटशी.. बस्स!
- (सर्वव्यापी)प्राजु
In reply to अहो यात by प्राजु
हुं....
मला अधून मधून असामी असा मी चे डायलॉग विनाकारण फेकायची
सवयच आहे... असो.
तुमचे नाव प्राजु न असता प्रांजळा असायला हवे होते असे मला वाटते...
सत्य सृष्टी...
अभिनंदन प्राजु.
प्रभाकराच्या हाटिलात मात्र फुकट खाण्याची स्वप्ने सदा..
स्वप्ने कशा करीता? 'सत्यात' सर्वांनाच निमंत्रण आहे. चला, जमवा कट्टा. जेवण स्पॉन्सर करु.
धन्यवाद.
धन्यवाद..
प्रभाकरजी.. धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
In reply to धन्यवाद.. by प्राजु
अरेरे..!
प्रभाकरजी..
अरेरे! अगदी उत्तरप्रदेशी, बिहारी करून टाकलेत. छे..! आता मनसे पासून सांभाळले पाहिजे.
हजेरी
सुरेख!
छानच लिहिली आहेस, प्राजु, तू ही कविता!
आगे बढते रहो...
तात्यांनू, कुरणांत ही बरीच शेरडं, मेंढरं, कोकरं जमायला लागली की हो!
बरं झालं, च्यायला, सागुतीची घरच्याघरीच सोय झाली, आता सकाळी-सकाळी उठून अब्दुलखाटकाकडे जायला नको.:))))
एकदम झक्कास्स्स्स्स्स्स्स्स्स्स
खरे तर एका कवितेत सर्वांची ओळख झाली आहे.
नविन सदस्यांना ही कविता वाचली तरी एक एक सभासदांच्या कला (कळा)
काय आहेत ते कळेल.....:)
फारच छान.
दिवाळी अंकात फराळाची कविता कशी येते तसे वाटले.
मेंढरांमध
मेंढरांमधे आमचा समावेश न करुन आमच्यावर अन्याय झाला असे आम्ही मानतो व जाहिर निषेध व्यक्त करतो:)
नाना
In reply to मेंढरांमध by अवलिया
'चेंगट'पणा करून मागे राहिल्याचा परिणाम!
आता 'ना ना' न करता सामील व्हा :)!!
चतुरंग
खरंच
खरंच की..
माफ करा हा नाना...
- (सर्वव्यापी)प्राजु
आनंददायक क्षण
कविता वाचून एकदम घरगुती, उबदार , छान वाटते. इंदिराबाईंच्या एका कवितेची अर्धी ओळ आठवते :
"असेच काही द्यावे.... घ्यावे....
म्हणून दिधला एक मरवा..."
प्रतिसाद ...प्रसाद (अव्यक्त)
कुरण?
याला काय गंम्त म्हणायची वाटत. इथे काय मेंढर रचायला येतात असे वाटावे इतके हिरवे कायि दिसले नाहि.
In reply to कुरण? by रंजन
डोळ्यांवरचा गॉगल काढा:))
ह.घ्या:))
चतुरंग
In reply to कुरण? by रंजन
गंमत!!
च्यायला अप
छान आहे कविता
धन्यवाद.
आजचे नवीन खेळाडू
In reply to आजचे नवीन खेळाडू by मस्तानी
धन्यवाद मस्तानी... हा धागा वर
अप्रतिम ...
पण ते सुधीर कांदळकर आहेत हे कळल्यावर 'हुश्श' झाले!
अदृष्य मेंढरू
तिळगुळघ्याआणिगोडगोडबोला