टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य
काही म्हणा पण ऐट तिची भाळण्यायोग्य..
चाटते ती ज्या अदेने मान वेळावून
शेपटी चवरीच भासे ढाळण्यायोग्य.
बिल्ली असे भारी बिलंदर, अर्धोन्मिलित नयनी
टाकते तिरपे कटाक्ष जाळण्यायोग्य.
रे किती पिल्ले निघाली एकापुढे एक
या विणीला अंत नाही, भंजाळण्यायोग्य.
विषय 'मनी'चा म्हणून विणली माळ शेरांची
जाणतो मी, मुळीच नाही माळण्यायोग्य.
प्रेरणा- अर्थात श्री गुरुजी आणि नवीन सदस्य.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3644
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
(No subject)
:)
"अगं अगं म्हशी" ऐवजी "अगं अगं
"अगं अगं म्हशी" ऐवजी "अगं अगं मनी" हाय म्हणा की? ;)
हा हा हा! चला म्हणजे काहीतरी
हा हा हा! चला म्हणजे काहीतरी उपयोगात आलो.( माझी आई म्हणते काही कामाचा नाही.)
कविता एकदम भंजाळण्यायोग्य
कविता एकदम भंजाळण्यायोग्य =))
हसण्यायोग्य कविता!
हसण्यायोग्य कविता! :-D
विकेट घेण्यायोग्य
त्यांची विकेट घेतली की तुम्ही :-D
वाह!
वाह!
तत्कालिक विषय घेऊन, त्यावर असे दर्जेदार लिहणे साधी गोष्ट नाही!
सर्व शेर आवडले, खरं तर वाघ असते तरी आवडले असतेच म्हणा ;)
मस्त! चांगली जमली आहे.
मस्त! चांगली जमली आहे.
ह्या निमित्ताने
"दमामि" परत सक्रिय झाले...
धन्यवाद हो सगळ्यांना!/\
धन्यवाद हो सगळ्यांना!/\
(No subject)
=))