Skip to main content

...नवल!

लेखक सत्यजित... यांनी रविवार, 16/07/2017 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
नजर टाळणे..पण पहाणे..नवल! तुझे लाजणे अन् बहाणे..नवल! मला जाग आली सुगंधी किती! तुझे अत्तराचे नहाणे...नवल! जुनी वाट हरवून गेली तरी तुझे रोज येणे नि जाणे..नवल! कुणी पारधी ना कधी भेटला कुणी साधले हे निशाणे..नवल! कुणी हात सोडून अर्ध्यावरी बरे घेत आहे उखाणे..नवल! —सत्यजित
लेखनविषय:

वाचने 2984
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

असे शब्द.. अर्थात ओथंबलेले! समजूनही पुन्हा वाचणे.. नवल! भाषेत अपुल्या कशी ती करामत! पुन्हा भाव "तो".. उमजणे.. नवल! गझल खूप आवडली. शेवटचा ट्विस्ट कातिल! :-)

राघव खूप भरभरुन दाद दिलीत,त्याबद्दल आभारी आहे मी आपला! मितान,सानझरी...आपलेही मनःपूर्वक धन्यवाद!