मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

म्हातारपणीची प्रार्थना

अरुंधती ·

प्रियाली 21/11/2010 - 22:19
मस्त कविता आहे. उतरवून घेत आहे. जालावर अतिशय उपयोगी दिसते. एकेका कडव्याबरोबर एकेक व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

In reply to by प्रियाली

नंदन 24/11/2010 - 07:49
कविता आणि अनुवाद, दोन्ही आवडले. येथे दिल्याबद्दल अनेक धन्यवाद. >>> जालावर अतिशय उपयोगी दिसते. एकेका कडव्याबरोबर एकेक व्यक्ती डोळ्यासमोर उभ्या राहिल्या. --- और ये लगा सिक्सर :)

अरुंधती 23/11/2010 - 17:41
प्रकाशजी, गणेशा, प्राजु, सुनील.... प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार! :-)

वाहीदा 23/11/2010 - 18:25
अरुंधती, एक शंका, मला विचारी बनव रे देवा, चोंबडा बनवू नकोस. परोपकारी बनव, हुकूमशहा बनवू नकोस. परोपकारी च्या विरोधार्थी शब्द हुकूमशहा अन विचारी च्या विरोधार्थी शब्द चोंबडा आहे का ?? :-? परोपकारी X हुकूमशहा विचारी X चोंबडा मला वाटते, परोपकारी X स्वार्थी विचारी X अविचारी असे असावे (correct me, if I am wrong..) ~ वाहीदा

In reply to by अरुंधती

वाहीदा 25/11/2010 - 20:25
मी फक्त तू केलेलाच अनुवाद वाचला . आता समजले तू हे शब्द का वापरलेस ते . Make me thoughtful but not nosy; helpful but not bossy. With my vast store of wisdom and experience it does seem a pity not to use it all. छान आहे तू केलेला अनुवाद !

ए.चंद्रशेखर 24/11/2010 - 06:45
फारच छान! मूळ कविता व तुम्ही केलेला त्याचा अनुवाद दोन्ही अतिशय आवडले.

योगप्रभू 24/11/2010 - 15:22
अरुंधती, तुमचे कौतुक. अंतर्मुख होऊन विचार करता जाणवते, की अरे! ही तर तरुणपणातच करायची प्रार्थना आहे. नव्या मैत्रीची आस, वादविवादाची खुमखुमी, शहाणपण मिळण्याची आकांक्षा हे सगळे तरुण वयातच हवे असते. वृद्धावस्थेला पोचेपर्यंत अनुभवाने शहाणपण आलेले असते. व्याधींची साथ असते आणि एकच मित्र उरलेला असतो... मृत्यू.. त्यातूनच मग इतर काही ऐहिक मागण्यापेक्षा आत्म्याला मोक्षाची तळमळ लागते. त्याच्यालेखी पुढे दिलेली आळवणी हीच 'माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे' होऊन बसते. कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालपणी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धपणी देवा आता, दिसे पैलतीर जन्म मरण नको आता, नको येरझार नको ऐहिकाचा नाथा, व्यर्थ बडीवार चराचरा पार न्या हो, जाहला उशीर पांडुरंग पांडुरंग, मन करा थोर

अरुंधती 25/11/2010 - 19:59
चंद्रशेखर, जागू, योगप्रभू... प्रतिसादाबद्दल धन्स! :-) योगप्रभू, तुमचं म्हणणं खरं आहे..... मनाचे श्लोक खरे तर तरुणपणात आचरणात आणायचे असतात. पण सामान्यतः लोक निवृत्तीनंतर त्यांच्याकडे वळताना दिसतात. आपल्याकडे जे ह्या प्रार्थनेत सांगितलं आहे तेच वेगळ्या भाषेत व शब्दांमध्ये संतकवींनी सांगितलं आहे. शैली फक्त निराळी आहे इतकेच! :-)

बहुगुणी 26/11/2010 - 07:21
सतराव्या शतकातील एका नन ने या ओळी लिहिल्या असाव्यात असा उल्लेख इथे आणि इथे आढळला. त्याच दुव्यांवर या लिखाणातील त्यापुढील आणखी काही ओळीही सापडल्या, त्यांचं स्वैर रुपांतर अरुंधती यांचाच साचा वापरून करायचा प्रयत्न खाली केला आहे: इतरांच्या दुखण्याच्या गोष्टी मी आनंदाने उपभोगाव्या असा वर तर मी मागणार नाही पण त्यांची दुखणी ऐकायचं सामर्थ्य तेवढं मात्र नक्की दे रे देवा मला आधिक स्मरणशक्ती दे असाही वर मी मागणार नाही पण जेंव्हा माझी स्मरणशक्ती दुसर्‍यांच्या स्मरणांना सामोरी जाईल तेंव्हा मात्र मला नम्रता दे, आणि थोडासा कमी फाजील आत्मविश्वास दे मला श्रेष्ठ धडा शिकव की माझंही कधी कधी चुकतं माझ्यात थोडी गोडी शिल्लक ठेव संत नाही व्हायचं मला, कारण त्यांच्यातील काहींबरोबर जगणं कठीण असतं हे मी जाणते पण कडवट वृद्धा ही तर दानवांची सर्वोत्तम निर्मिती (हेही मी जाणते) अनपेक्षित ठिकाणी असलेले सदगुण दिसावेत आणि अनपेक्षित लोकांकडे असलेले आगळे सामर्थ्य ओळखावे एवढी कुवत मला दे आणि हे मला दिसलंय हे त्यांना मी सांगावं असा मनाचा मोठेपणा मला दे

अरुंधती 26/11/2010 - 22:18
बहुगुणी, तुम्ही तर त्या प्रार्थनेचा स्रोत शोधून काढलात की! हा अनुवादही छान जमलाय. धन्यवाद! :-)

लेखनविषय:
परवा ईमेलामधून इंग्रजी भाषेतील एक फार मार्मिक प्रार्थना वाचायला मिळाली. ''प्रेयर फॉर दि एजिंग''. खरे तर ती बर्‍यापैकी गंभीरपणे लिहिली गेली आहे. त्या प्रार्थनेत काही नर्म विनोदी छटा तर थोडासा उपरोधही जाणवला. कदाचित इतरांना जाणवणार नाही. असो.... ज्याचे त्याचे आकलन!! प्रार्थना असल्यामुळे ती ना धड काव्यप्रकारात मोडत आहे, ना गद्यात. पण तिचा आशय लक्षवेधक आहे. म्हातारपणीच्या किंवा वय वाढत जाईल तशा आढळत जाणार्‍या या स्वभावखुणा आणि त्यांची ह्या प्रार्थनेतून उमटलेली जाणीव मला आवडली. मूळ लेखक/ कवी माहीत नसल्यामुळे त्याचे/ तिचे नाव येथे देता येत नाहीए.

भस्म्या

अरुण मनोहर ·

प्रकाश१११ 17/11/2010 - 10:57
भस्म्या-- भस्म्या झालाय या समद्यांना भस्म्या झालाय या ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या..... एकदम मस्त .!! आवडली.!छान कल्पना सुचली.नि छान कविता

पैसा 17/11/2010 - 21:44
रोज एक या वेगाने जे घोटाळे उघडकीला येतायत, ते पाहता, हे आपलं राष्ट्रीय गीत म्हणायला हरकत नाही!

काव्यरस
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे. >>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील.

नाग !!

प्रकाश१११ ·

गणेशा 17/11/2010 - 15:55
साध्या श्या एका प्रश्नावरुन नाग की साप कधी पाहिलाय का ? येव्हदी मोठी कविता होउ शकते हे माहीत नव्हते ... तुमच्या कविता वर वर खुप साध्या सोप्या वाटल्या तरी त्यातील वर्णन खुप खोल असते .. लिहित रहा .. वाचत आहे

नाग जेव्हा सरपटत जातो तेव्हा खरेच नाही कळत मला की तो नाग आहे की साप आहे ? तुम्हाला कळतो का तो काय आहे ते ? साप की नाग ? कधी बघितलाय का त्याला सरपटताना ..? नि अचानक फणा काढताना ? ***** सळसळ सळकताना विजेच्या वेगाने नि फणा काढून जाभाड पसरताना ? अगदी वीतभर फणा नि पसरलेला आक्राळविक्राळ जबडा एखादे पाखरू ,उंदीर कसा भयभीत नि मत्रमुग्ध होऊन जातो त्याच्या नजरेच्या टप्प्यात नि जागच्या जागी कसे खिळून जातो त्याच्या जबड्यात कसा शिरतो अलगद आपले प्राण त्याच्या हवाली करत ? ****** मी पाहिलेय भर दुपारी बारा वाजता एका सरड्याला हताशपणे ...!! आपले प्राण त्याच्या हवाली करताना ….!!! मी बघितलाय ह्या त

आई !!!

प्रकाश१११ ·

In reply to by प्राजु

चित्रा 17/11/2010 - 01:51
आपला कविता मिपावर प्रकाशित करण्याचा वेग कौतुकास्पद आहे. कल्पनाही चांगल्या आहेत, पण त्या विकसित करताना कवितांवर जरा अधिक विचार करून विस्कळीतपणा काढून टाकून मग ती संस्करण केलेली कविता इथे द्यावी असे सुचवते.

गणेशा 17/11/2010 - 13:39
ढगभरल्या आसमंतात दाटलेली आठवण तुझी ओल्या नयनात उभी आसवांची कोरीव लेणी ..... ..... (तुमचे शतशः आभार , खुप दिवसानी माझ्या आई.. या सिरिज मध्ये लिहिले नव्हते ही माझी २४ वी कविता ठरेल त्यावरील आणि त्याची प्रेरणा तुमच्या कवितेमुळे फक्त ... आभार मनापासुन (येथे फक्त १च कडवे देतो कवित नंतर देतो).. तुमचा ढगभरल्या दिवसात आलेली आठवन हे खुप जबरदस्त आहे ... त्या 'ढगभरल्या' शब्दाची चोरी करुन हे कडवे लिहिले आहे शमस्व .. )

किती काळ गेला तुला जाऊन तुझी आठवण येत नाही असे होत नाही. पण तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी येते असे पण आता होत नाही !!

हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
हलक्या फुलक्या पिसासारखे फुलपाखरू पंखावर मस्त रंगीत ठिपका गिरकी घेत झुलत असते फुलांच्या गंध भारल्या स्वप्नात फुले खुणावतात फुलपाखराना खुळावतात त्याला आपल्या मत्त गंधाने फुलपाखरू धुंद ! मंत्रमुग्ध !! खेचले जातात आपोआप नकळत स्पर्श करते फुलांना फुलपाखरू एक शहारा फुलाच्या रोमारोमात अग आईग केवढा काटा फुलला माझ्या गर्भ कोशात सरसरून !! पाकळी पाकळी मत्त असते रेशीम रेशीम मस्त मुलायम पाकळीच्या स्पर्श सुखाने फुलपाखरू जाते मत्त होऊन आस कळीला जन्म घालण्यास फुले जातात वेडात हरवून नि ध्यान लागते फुलपाखराला दोघेही जातात स्वप्नात हरवून ...!!!!

आई.. मिटलेला श्वास - ७

गणेशा ·

प्रकाश१११ 16/11/2010 - 14:22
बांधावर पडलेल घर रानफ़ुलांचा एकेरी सूर भळभळणारा आठवांचा पाट डोळ्यामध्ये भयसंध्या दाट मला आई विषयी कविता आवडली. अगदी मनापासून !!अभिनंदन मित्रा !!

भाग ६ :- http://www.misalpav.com/node/15395 पार्श्वभुमी : शेतवस्ती वरती राहणारा कवितेचा नायक. शेतातील फ़ुले , बांधावरील माळवादाचे घर, वाहणारा पाट , चंद्र यांची अवस्था ही आता त्यास त्याच्या मोडलेल्या मना प्रमाणे वाटते.. सुर हरवलेले जग त्याच्या मनाच्या बांधावरुन.. बांधावर पडलेल घर रानफ़ुलांचा एकेरी सूर भळभळणारा आठवांचा पाट डोळ्यामध्ये भयसंध्या दाट चंद्राची ढगात हूल सुनसान विचारांची भूल निशब्द एक काहूर मन व्याकुळ सैरभैर श्वास हवेत निस्तब्ध कळेना माझे प्रारब्ध स्मरणात तुझीया सुकलेले दोन नेत्र ------- शब्दमेघ

((निशाण))

नगरीनिरंजन ·
लेखनविषय:
काव्यरस
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे? पराजित सारे मरून गेले जेत्यांचा भाटगण गात आहे मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे? पौरुषहीन जो संन्यस्त झाला कामलालसा घेते प्राण आहे पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे? धर्म रक्षणासाठी कवचाचे अधर्म्यांकडूनच दान आहे 'पांडव' तो जरी इंद्रपुत्र गादीवर हक्क सांगत आहे पान्हा तोडून टाकले जिने पाचांचे जीवदान मागत आहे रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे? जी राज्य स्वतःचे मिळाले असता फजिती करून हसत आहे नरो वा कुंजरो वा 'धर्मराजाचा' प्रताप आहे नि:शस्त्र वृद्ध घेरून वधला सूड पुत्राचा पाप आहे? नसे धर्मवान सर्वदा क

निशाण

नगरीनिरंजन ·

शिल्पा ब 12/11/2010 - 23:04
मला कविता वगैरे काही समजत नाही...पण हि कविता आवडली, समजली. छान आहे. मी साधारणपणे असे धागे उघडतच नाही..पण अवलियाने काहीतरी विडंबन केलंय म्हणून मूळ काय ते वाचले आणि आवडले.

ही कविता वाचायचीच राहून गेली होती. अतिशय आवडली. इतिहास जेतेच लिहितात हे आत्तापर्यंतचं विदारक सत्य माहित असूनही आपण डोळ्यांवर कातडं ओढतो. आणि मग त्या जेत्यांनीच लिहिलेल्याची हाजीहाजी करून त्याल सत्याचं स्वरूप देतो. युद्धांच्या उद्रेकात काही दगड शिल्लक रहातात, काही ठिकऱ्या होऊन नष्ट होतात. मग उरलेल्या दगडांना आपण आपल्या कल्पनाविलासाने कोरून त्यांतून देखणे हिरो आणि सुंदर हिरॉइनी तयार करतो, - त्यांच्या कथा एकमेकांना सांगतो. देवांच्या मूर्ती घडवतो आणि त्यांची पूजा करतो. हे सत्य किती बेगडी आहे याची कल्पना असूनही ती नाकारतो आणि मूर्ती स्वीकारतो. मला राहून राहून प्रश्न पडतो. पांडवांचा तारणहार म्हणून कृष्ण देव झाला. पांडव हरले असते तर न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या कौरवांना मदत करणारा शकुनिदेव झाला असता का?

जय नावाचा इतिहास जो सारे जेत्यांचेच लिखाण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी वचन गुरुंचे महान आहे एका अंगठ्याच्या कर्जापायी गुरुधर्म तो गहाण आहे सूताघरी सूर्यपुत्र दानी वंचनाच नियतीचे दान आहे धर्माची चौकशी करतो ईश्वर उरी भावाचाच बाण आहे जरी सुयोधन अंधपुत्र तू राजपदीही अपमान आहे सत्तालोभ धर्माधर्म कधी कमरेखालीच प्रहार आहे कर्मयोगाची करुनि भलामण हरला गुरुचाच प्राण आहे सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे चिरंजीव विराण आहे पराजितांना अधर्मी ठरवून उंच विजेत्यांचे निशाण आहे.....

आई.. मिटलेला श्वास - ६

गणेशा ·

पैसा 11/11/2010 - 19:08
तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ
खूप आवडलं हे वेगळं सांगायला नकोच.

In reply to by पैसा

नगरीनिरंजन 12/11/2010 - 09:24
सुंदर रे गणेशा! स्वगतः डाव्या-उजव्या सोंडाशेपट्यांवर ढीगाने प्रतिक्रिया येतात पण चांगल्या कवितेकडे दुर्लक्ष का?

In reply to by प्राजु

गणेशा 17/11/2010 - 13:32
सर्वांचे आभार .. प्राजक्ता जी आपण सुचविलेला बदल खुप आवडला .. मनापासुन कविता वाचुन सुचविलेल्या बदला बद्दल शतश आभारी पुन्हा येथे कविता देतो आहे : तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाटा मनःपटलावर विरता भळभळती विचारधारा.. तिमिरात भिजती आता ---------- शब्दमेघ

भाग ५: http://www.misalpav.com/node/15255 पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाट मनपटलावर विरता तिमिरात सामावते अखंड विचारधारा ---------- शब्दमेघ

(पुन्हा दिवाळी)

मेघवेडा ·

पैसा 05/11/2010 - 19:25
दाटीतून त्या मार्ग काढता, नाडी यांची लागे भाळी
जीव गेला..
मी नवरा अन ह्यांना माझी करी बायको पुढल्या वेळी
अरे ती बिचारी पुढच्या जन्मात 'आयटी नवरा' झाली आणि 'या नवर्‍याला' आयटी बायको मिळाली तर...

असुर 05/11/2010 - 19:53
मेव्याच्या 'प्रस्तुत' विडंबनाला मानाचे पहिले पाचही प्रतिसाद 'पाशवी' असल्याचे पाहून ड्वॉले पाणावले! :-) मेव्या, खल्लास रे! म्हणजे, विडंबन खल्लास रे! --असुर

डिस्क्लेमर : प्राजुतैच्या दिवाळीच्या सुंदर कवितेची अशी चिरफाड केल्याबद्दल तिची जाहीर माफी मागतो. प्रस्तुत कवितेत नवर्‍याचे कपडे धुवून धुवून वैतागलेली बायको आपली व्यथा मांडते आहे. समस्त स्त्रीमुक्तीवाद्यांनी कृपया ह. घ्यावे!