निशाण
जय नावाचा इतिहास जो
सारे जेत्यांचेच लिखाण आहे
पराजितांना अधर्मी ठरवून
उंच विजेत्यांचे निशाण आहे
राजपुत्रच श्रेष्ठ धनुर्धारी
वचन गुरुंचे महान आहे
एका अंगठ्याच्या कर्जापायी
गुरुधर्म तो गहाण आहे
सूताघरी सूर्यपुत्र दानी
वंचनाच नियतीचे दान आहे
धर्माची चौकशी करतो ईश्वर
उरी भावाचाच बाण आहे
जरी सुयोधन अंधपुत्र तू
राजपदीही अपमान आहे
सत्तालोभ धर्माधर्म कधी
कमरेखालीच प्रहार आहे
कर्मयोगाची करुनि भलामण
हरला गुरुचाच प्राण आहे
सूडाग्नीत जीवन गुरुपुत्राचे
चिरंजीव विराण आहे
पराजितांना अधर्मी ठरवून
उंच विजेत्यांचे निशाण आहे.....
शब्द नाहीत प्रतिक्रिया
एक जबरदस्त काव्य ... खुप
मस्तच
बर झाल टाकलात. अशी शांत बसुन
जब्रा रे!
मस्त!
बिलकुल आवडली नाही.
हम्म!
मस्त!
जबरदस्त!!!
मला कविता वगैरे काही समजत
ही कविता वाचायचीच राहून गेली
व्हेरी नाईस
मस्तच...!!