मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आई .. मिटलेला श्वास .. ५

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
आई .. मिटलेला श्वास .. ४ http://www.misalpav.com/node/15170 पार्श्वभुमी : घरामध्ये वावरताना .. घरातील प्रत्येक गोष्टीकडे पाहताना त्या वस्तु ही आपापल्या पद्धतीने आपल्या दु:खात सामील होत आहेत असा भास कवितेतील नायकाला होतो ..

माझ्या व्यथे... (गझल)

स्वानंद मारुलकर ·

In reply to by यशोधरा

मेघवेडा 29/10/2010 - 20:19
छान आहे गझल, पण अटून गेले, ही सूट जरा जास्त झाली. असेच म्हणतो. तसेच >> चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली यातला र्‍हस्व 'सु' दाताखाली खड्यासारखा येत आहे. तो दीर्घ करा किंवा "चाहूल पावसाची मित्रा फितूर झाली" वापरा. :) बाकी गझल मस्तच!

मी हात लावल्याने कोमेजली बिचारी निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा? ओळी वाचतांना लाजाळूची पानं डोळ्यासमोर आली. अजून लिहा. -दिलीप बिरुटे

परतून सांग तुजला बोलावणार कैसा? नाहीस तू मनाला समजावणार कैसा? पुरते अटून गेले डोळ्यामधून पाणी कल्लोळ भावनांचा मी दावणार कैसा? जहरी तुझ्या स्वरांनी शिवलेस ओठ माझे संवाद अंतरीचा पण थांबणार कैसा? चाहूल पावसाची सुर्या फितूर झाली भेगाळला उन्हाळा ओलावणार कैसा? कंटाळलो कितीही बेरंग जीवनाला आयुष्य तू दिलेले अव्हेरणार कैसा? मी हात लावल्याने कोमेजली बिचारी निष्पाप त्या फुलांना रागावणार कैसा? ना सांगता कधीही येतेस तू समोरी माझ्या व्यथे तुला मी हुलकावणार कैसा? - स्वानंद

आई.. मिटलेला श्वास ... ४

गणेशा ·

प्रकाश१११ 26/11/2010 - 11:37
उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई मला खरोखर आवडली. काळजाला भिडली. दुसरे शब्दच नाहीत.

प्रकाश१११ 26/11/2010 - 11:37
उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई मला खरोखर आवडली. काळजाला भिडली. दुसरे शब्दच नाहीत.
लेखनविषय:
काव्यरस
आई.. मिटलेला श्वास ३ - http://www.misalpav.com/node/15127 पार्श्वभुमी : दारातील रांगोळी ही काही तरी स्मरणांचे टीपके बोलते आहे, आणी संध्या समयी जीवन सूर्य क्षितिजापल्याड गेलेला पाहुन स्वताचे वलयांकीत जीवन ही व्यर्थ वाटणारा हा नायक .. उंबर्‍यावर सांजसमयी मन माझे रडते आई पाणावलेली आर्त रांगोळी तुझेच स्मरणगीत गाई सूर्यबिंबावीन क्षितिजी किरणांचा मखर ओस जीवनदेव्हार्‍यात आई देवत्वाची जागाच रिक्त --------- शब्दमेघ

चिऊचं घर शेणाचं...

आपला अभिजित ·

धनंजय 29/10/2010 - 00:47
छान (मला वाटले श्री. युयुत्सु यांचा धागा वाचून हे काव्य स्फुरले की काय. चिमणीला कावळ्याकडून ठेवून घेतले जायचे आहे, कावळ्याला मात्र विवाहात गुरफटून राहायचे आहे.)

In reply to by धनंजय

चित्रा 29/10/2010 - 03:32
मला वाटले श्री. युयुत्सु यांचा धागा वाचून हे काव्य स्फुरले की काय. :)) कविता आवडली.

एक होता काऊ एक होती चिऊ काऊचं घर होतं मेणाचं चिऊचं घर होतं शेणाचं एकदा काय झालं, जोराचा वारा आला चिऊचं घर उडून गेलं चिऊ आली काऊकडे तिला वाटलं, तो आपलं ऐकून घेईल त्याचं घर एवढं मोठं, त्यात जागा देईल काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, माझं घर लहान आहे'' काऊदादा काऊदादा दार उघड" "नको, माझं घर खराब होईल'' काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, माझे कपडे खराब होतील'' काऊदादा काऊदादा दार उघड ""नको, मला जायला उशीर होईल'' ""असं काय रे करतोस? माझं घर वाहून गेलंय. सगळे छळतील. टोचतील, त्रास देतील. तू मला घरी घे; दाणे दे, पाणी दे. जरा वेळाने बरी होईन.

आई..मिटलेला श्वास - ३

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
आई..मिटलेला श्वास - २ ... http://www.misalpav.com/node/15014 पार्श्वभुमी: मळकट पायवाट .. गावाला दूर गेल्यावर ही तेथील प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आई बद्दलच्या दाटुन आलेल्या भावनांच्या या पारंब्या ते वडाचे झाड वाळके दोरा बोहताली करकच्च स्वप्नझुल्यांच्या पारंब्या ओस भावना दाटलेल्या भरगच्च आकाशात किंचाळते वीज सुनसान मी भयभीत स्मरणात तुझीया संपते खोल हुंदक्यांची रात रस्त्यात उभे वारुळ मनाचे उडलेले डाग स्वप्नपारंब्या खाली निजते माझे विचारगाव ----- शब्दमेघ

कोजागिरी पौर्णिमा

स्वप्निल मन ·

मराठमोळा 22/10/2010 - 05:15
अरे वा. लै भारी. >>आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही का बरे? प्रेमात हरलेले लोकं बासुंदी मधे साखर घालत नाहीत का?

गणेशा 26/10/2010 - 13:23
अतिशय आवडले .. एक आमच्याकडुनही : पोर्णिमेच्या चंद्रास कोठे चांदण्यांची संगत असते प्रेमाच्या उंबरठ्यावरच नाउमेद व्हायचे नसते

कितीही रात्री जागल्या तरी पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही आणि प्रेमात हरलेल्याला तर कोजागिरीची बासुंदीही गोड नाही

आई..मिटलेला श्वास - २

गणेशा ·

प्रकाश१११ 26/11/2010 - 13:37
ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत | छानच लिहिले आहे . नंतरच्या कवितेपेक्षा थोडी निराळी वाटली . आवडली !!

In reply to by प्रकाश१११

गणेशा 26/11/2010 - 14:50
हो वेगळी आहे .. प्रत्येक कडव्यातील पहिल्या ३ ओळीमध्ये ओवी प्रमाणे ८ अक्षरे आहेत मात्र शेवट अभंगाच्या लास्टच्या अपुर्ण ओळीप्रमाणे (साडेतीन ओळींचे अभंग) केला आहे

आई..मिटलेला श्वास -१ http://www.misalpav.com/node/14964 पार्श्वभुमी: कातरवेळी अंधाराकडे झुकलेले नभ आणी त्या वेळेस आठवणींच्या झोक्यावर आसवांची शब्दांध रात्र श्वासधागे कशे उसवत आहे हे वर्णन तळ्याचे नीर दर्पण | विखुरले नभांकण | वाळलेले नक्षीपर्ण | तरंगीत || ढळलेली सांजसंध्या | निजलेले सूर्यपक्षी | स्वप्नफ़ुले जागलेली | सुगंधीत || धरणीची ग्लान झोप | तार्‍यांचे सूरेल गीत | उसवले श्वासधागे | अंतरात || छतावर रातवैरी | तेवलेला ह्रदयदीप | शब्दांध झाली आसवे | आठवात || ----- शब्दमेघ

जीव गुंतला .. ( चाल खेळ मांडला)

गणेशा ·
लेखनविषय:
काव्यरस
खालील कविता ही पाचोळ्या प्रती मेघाची ओढ दाखवते आहे. मेघ- पाउस .मेघ - वसुंधरा ह्यांचे नाते सर्वांना माहीत आहेच. पण या नविन नात्याची अनोखी ओढ प्रिय पाचोळ्या तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी हरवल देह भान मावळल्या नभी झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा वनवा ह्यो उरी पेटला...

आई..मिटलेला श्वास - १

गणेशा ·

गणेशा 16/10/2010 - 20:47
४ ओळी नंतर जागा सोडली गेली नाही शमस्व -- नक्षीमय सांजनभी सोनेरी तोरण ढगांचे प्रकाश किरणे शोधती गहीरे सावळ मायेचे कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी ----- शब्दमेघ

In reply to by प्राजु

कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी -दिलीप बिरुटे

पार्श्वभुमी : आई नसताना , उदास खिन्न पणे कवितेचा नायक संध्याकाळी क्षितिजाच्या दिशेने पहात असतो आणि मनातील कल्लोळ मनाशीच गिरक्या घेत असतो . नक्षीमय सांजनभी सोनेरी तोरण ढगांचे प्रकाश किरणे शोधती गहीरे सावळ मायेचे कल्लोळ माजला येथे भावनांच्या डोंगरापाशी निस्तेज जाहला जीव तेजगोलाच्या अस्तापाशी ----- शब्दमेघ

युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी

पाषाणभेद ·

तर्री 16/10/2010 - 23:01
पाशाणभेद, ह्या विषयावर ह्याप्रकारचे काव्य मराठी मध्ये मी तरी वाचलेले नाही . आजोबा आजी चे युगुल गीत ! सही . आवडले.

तर्री 16/10/2010 - 23:01
पाशाणभेद, ह्या विषयावर ह्याप्रकारचे काव्य मराठी मध्ये मी तरी वाचलेले नाही . आजोबा आजी चे युगुल गीत ! सही . आवडले.
लेखनविषय:
काव्यरस
युगलगीतः तू माझी हो काठी, मी तुझी काठी
आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी, मी तुझी काठी एकमेकां आधार होवू सरत्या आयुष्यासाठी ||धृ|| आजोबा: हलते हे जड डोके, डुगडुगते मान कवळी कुठे चालली, नाही कसले भान आजी: केसांच्या बटा झाल्या, त्यांची नाही वेणी स्वार्थी जगात फिकीर करावी कुणी? चिंता नको, आता जगायचे एकमेकांसाठी आजोबा, आजी (दोघे): तू माझी होशील काठी मी तुझी काठी ||१|| आजोबा: किती खस्ता खाल्या अन किती कष्ट केले उमेदीच्या वेळी कामाला झोकून दिले आजी: जु