आई.. मिटलेला श्वास - ६
भाग ५: http://www.misalpav.com/node/15255
पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते
तळ्याकाठी निशब्द
निरव सांजवेळ
नक्षत्रांच्या फेर्यामध्ये
आठवांचा खेळ
सोनेरी क्षणांचा हा
क्षणिक कवडसा
अभिषेक सूर्यास्तास
ओघळणार्या आसवांचा
तरंगीत सुक्ष्म लाट
मनपटलावर विरता
तिमिरात सामावते
अखंड विचारधारा
---------- शब्दमेघ
.......
+१
खरेच छान शब्दचित्र !! कवितेला
सोनेरी क्षणांचा हा क्षणिक
सर्वांचे आभार .. प्राजक्ता जी