पाल बोले सरडीला , जळले गं अंग,
अंग अंग होळी झाले , शेपटीचा भंग.
ओट्यावरी होते , दूध आणि पाव,
माशी खेळे लोण्यासंगे , नाचे डासराव,
झुरळाच्या मिश्यावरी , तुपाचे तवंग.
तापुनिया दूध , साय वर येई,
गिळण्या या चंद्रबिंबा , पाल झेप घेई,
जन्म तुझा पालीचा गं , नव्हे बजरंग.
सोडुनिया शेपटाला , पाल मुक्त होई,
नासकवणीसाठी , घरभर घाई ,
जळे काया कुठे , कोणी खाण्यामध्ये दंग.