आमचीही प्रेरणा http://www.misalpav.com/node/14884
पाकिट , पर्स , चेना ढापीत चाललो मी,
लवते न तोच पाते, कापीत चाललो मी,
वाणी विमा विजेची , सारी बिले मिळाली,
हिरवा वसंत कोठे? शोधीत चाललो मी.
पाकीट का म्हणावे , "हैदोस" भावनांचा,
पत्रे पुराणी पिवळी , वाचीत चाललो मी,
बघतो अनंत कप्पे , ना नोट , नाही नाणे,
घाला चुलीत ह्याला, काशीत चाललो मी,
पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी,
औंधात हात मारु, घोकीत चाललो मी.
....वाचत आहे!
In reply to ....वाचत आहे! by जाई अस्सल कोल्हापुरी
...रडत आहे!!
सुन्दर कविता !!! आवडली.
म्हणजे कवितेतुन...
@ अथांग आभारी आहे. तुमची