काहीतरी खुपतंय, सलतंय आत
कुठंतरी खोलवर दुखतंय आज
उगाच गहिवर, आवंढा घशात
कोंडलेला श्वास, सैरभैर मनात
मन कसं पिसं झालंय आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
पापण्यांची होते झालर ओली
रडवेली होते देहाची बोली
कबुली कशाची द्यावी आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ
उरात कल्लोळ, मौनाचं वादळ
कोरडा श्रावण, भिजवे आज
कुठतरी खोलवर दुखतंय आज
जयश्री अंबासकर
उगाच गहिवर, आवंढा
छान ! पापण्यांची होते झालर
खरच मौनाची सुद्धा एक भाषा असते ..
कविता आवडली...
काय बाय सांगु..कस्स ग
कल्पक, परिणामकारक
In reply to कल्पक, परिणामकारक by धनंजय
मात्रेसह सहमत
सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात
क्लास! मस्त लिहिलंय!
मस्त!
सा सा रे रे रेरे सा सा
In reply to सा सा रे रे रेरे सा सा by मिसळभोक्ता
काय म्हणून?
"उगाच गहिवर, आवंढा
सुरेख !
धन्यवाद मित्रांनो मला
खुपते
अप्रतिम कविता,, खूप
कविता आवडली...