Skip to main content

((निशाण))

लेखक नगरीनिरंजन यांनी शुक्रवार, 12/11/2010 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
जय नावाचा इतिहास जो घडले तसेच सांगत आहे? पराजित सारे मरून गेले जेत्यांचा भाटगण गात आहे मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी वचन गीतेत महान आहे? पौरुषहीन जो संन्यस्त झाला कामलालसा घेते प्राण आहे पांडवास हरवण्या दान करुनी सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे? धर्म रक्षणासाठी कवचाचे अधर्म्यांकडूनच दान आहे 'पांडव' तो जरी इंद्रपुत्र गादीवर हक्क सांगत आहे पान्हा तोडून टाकले जिने पाचांचे जीवदान मागत आहे रजस्वलेची फेडुनी वस्त्रे अंकी बसण्या बोलवत आहे? जी राज्य स्वतःचे मिळाले असता फजिती करून हसत आहे नरो वा कुंजरो वा 'धर्मराजाचा' प्रताप आहे नि:शस्त्र वृद्ध घेरून वधला सूड पुत्राचा पाप आहे? नसे धर्मवान सर्वदा कोणी लोभ कोणाला चुकला आहे? 'जया'ची बाजी ज्याने मारली तो ईश्वरपदाला पोचला आहे. 'जया'ची बाजी ज्याने मारली तो ईश्वरपदाला पोचला आहे....
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1944
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आज खरच फार चांगला दिवस आहे. :)

एकदम सवाल-जवाबच रंगले की! य्ये ब्बात! मजा आहे. :)

एक नंबर! निशाणांची मालिकाच लागली आहे इथे! नाना, ननि* - अजून येऊ द्या!! ननि = नगरीनिरंजन --असुर