मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौनाचं वादळ

जयवी ·

प्रकाश१११ 02/12/2010 - 20:11
उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज छान कविता आवडली मनापासून !!

धनंजय 02/12/2010 - 23:41
कल्पक, परिणामकारक. मात्र : **"पापण्यांची होते झालर ओली" सारख्या समर्थ रूपकानंतर "रडवेली होते देहाची बोली" सारखी बेजान खोगीरभरती करायला नको होती. यापेक्षा परिणामकारक ओळ जमू शकली असती, अशी कवयित्रीबद्दल खात्री आहे.**

In reply to by मिसळभोक्ता

पंगा 03/12/2010 - 10:10
'रेलगाडी, रेलगाडी, झुकझुक झुकझुक, झुकझुक झुकझुक, पीछेवाले ठेसन बोले "रुकरुक रुकरुक! रुकरुक रुकरुक!"' या 'कविते'त नेमके काय वाईट आहे? (शोधायचाच झाला, तर गहन अर्थही सापडेल त्यात! 'आयुष्य पुढे चालतच राहते, आणि कोणीही कितीही म्हटले, तरी फिरून मागे वळता येत नाही', वगैरे वगैरे.)
त्यापेक्षा कॉम्प्लेक्स हवी कविता. नाही का ?
फारा वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक जाहिरात येत असे. एक साधी, एकहाती काढायला सोपी (आणि एकहातीच काढलेली) अशी एका व्यक्तीची रेखाकृती. आणि मग पंचलाईन. "या माणसाची थोरवी त्याच्या साधेपणात होती." असो.

जयवी 03/12/2010 - 14:32
धन्यवाद मित्रांनो :) मला स्वतःला कॉम्प्लेक्स कविता नाही आवडत. कविता साधी, समजायला सोपी असायला हवी असं माझं मत आहे.

तिमा 03/12/2010 - 18:47
कविता आवडली. आणि काही संबंध नाही तरी नवीन कार्यक्रमाचे नांव आठवले 'खुपते तिथे गुप्ते'

बद्दु 05/12/2010 - 17:11
कविता मनापासुन आवडली. आणि हो..कविता साध्या सोप्या शब्दातच असावी म्हणजे रसग्रहण सोपे जाते. नाहीतर शब्दांचे अवडंबर माजविणे काय कठीण आहे? याउलट आपले म्हणणे साध्या सोप्या शब्दात व्यक्त करणे आणि ते पद्य स्वरुपात मांडणे यातच कसोटी आहे..

लेखनविषय:
काव्यरस
काहीतरी खुपतंय, सलतंय आत कुठंतरी खोलवर दुखतंय आज उगाच गहिवर, आवंढा घशात कोंडलेला श्वास, सैरभैर मनात मन कसं पिसं झालंय आज कुठतरी खोलवर दुखतंय आज पापण्यांची होते झालर ओली रडवेली होते देहाची बोली कबुली कशाची द्यावी आज कुठतरी खोलवर दुखतंय आज सयींचं व्याकुळ, आठव मोहळ उरात कल्लोळ, मौनाचं वादळ कोरडा श्रावण, भिजवे आज कुठतरी खोलवर दुखतंय आज जयश्री अंबासकर

कत्तलखाना !!

प्रकाश१११ ·

गणेशा 02/12/2010 - 13:09
२-३ दा वाचली कविता .. विदारक चित्र खुप समर्थ पणे मांडलेले आहे. शेवटचे २ कडवी तर मन अगदी सुन्न करतात ... वांझोटी शेती, गळायातील मृत्यघंटा, प्राणी हे आपले लेकरुच हेशब्दप्रयोग एकदम योग्य वापरले आहेत ... ---------- आपल्याच लेकरांची ' मरण वरात' जेंव्हा शेतकरी पाहतो .. तेंव्हा त्याच्या मनाची अवस्था खुप केविलवाणी असते ... गाडित कोंबलेली ..कधी काळी जीव लावलेली ती जणावरे आक्रोश करतात आणि शेतकर्याची स्तीथी खुप जबरदस्त पणे मांडलेली आहे ... अप्रतिम कविता .. बस्स बाकी काहि बोलुच शकत नाहि ...

मदनबाण 02/12/2010 - 16:00
विदारक कविता... वाचणे कठीण गेले अर्थात सत्य कटुच असते !!! :(

स्वानन्द 08/12/2010 - 19:08
तुमच्या कवितेचा विषय खूप चांगला आहे. मांडलाही आहे चांगला. पण ती छंदोबद्ध असेल तर जास्त परीणामकारक होईल असे वाटते. अन्यथा ते एक मुक्तक वाटते ( क्रियापद उचलून मध्ये घातलेले ). कृपया राग मानू नका. मला आपलं असं वाटलं म्हणून लिहीलं.

टारझन 08/12/2010 - 19:23
कंठ दाटुन आला , गहिवरुन आले , करुणासागरात बुडाला , आणि डोळे पाणावले. अवांतर : मुख्यपाणावर ५-६ कविता गाळणार्‍यांच्या यादीत आमच्या पाभेंनंतर तुम्हीच ! -(शोकाकुल) हंबीरराव गहिवरणे

!जनावरांचे कळप चालत असतात कत्तलखान्याकडे हाडांचे जणू सापळे सरकत असतात ह्या कत्तलखान्याकडे लवथवते विक्राळपण ह्यांच्या डोळ्यातून पाझरत असते तरी सरकत असतात गुरांचे कळप मुकाटपणे नजरेत नसते कसली ओढ घरादाराची तरी ओढली जातात अनामिक ओढीने ह्या जनावरांचे कळप डोळे कोठे लागलेले असतात शून्यात कोठेतरी त्याना येत असतो पाठीवर बसलेल्या काठीचा आवाज नि बेचैन होऊन सरकत असतात झुंडीने अनामिक दिशेला एखादे जनावर मुतते फदाफदा नि हगते जीव घाबरा झाल्यासारखा एखादा कावळा बसतो त्यांच्या शिंगावर शहाजोगपणे मजेने स्वताची हाउस घेत असतो पुरवून जनावरांना नाही वाटत सुख, नाही फुलत रोमांच त्यांच्या कातडीवर कसे हो

नवा दे घाव वेदनांना...........

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
किनारे लोटुनी सारे प्रावाही शांत वाहताना किती गर्दी तुझी आहे? इथे एकांत असताना मुका होईन मी जेव्हा तुझ्या दे त्रास ओठांना चुका मोजू नको माझ्या सजा दे खास ओठांना किती ओशाळले सारे पुरावे न्याय होताना तुझा आभास वावरवा अशी दे स्मृति आठवांना शब्द माझे मागती ती तुझी दे चाल गीतान्ना चन्द्र तू चांदणे मी लाजवू या चांदण्याना झोप माझी वाट पाही अशी दे जाग स्वप्नांना जाणीवा गोठल्या माझ्या नवा दे घाव वेदनांना माझी कविता ..मयुरेश साने..24-July-10

आई...मिटलेला श्वास - ११

गणेशा ·

प्रकाश१११ 01/12/2010 - 16:20
अंधारयुगी हरविलेले अंधुक संकेतचिन्हे घंटेच्या निनादात विखुरलेले शब्दथवे भग्न शिवालय अंधार्‍या कपारी सांध्यसंध्या उभी एकटीच दूरवरी हे सगळेच आवडले ...!!! मस्त लिहित राहा .जुने आठवताना नवीन समोर येईल. जरूर.!!

आई...मिटलेला श्वास -१० अंधारयुगी हरविलेले अंधुक संकेतचिन्हे घंटेच्या निनादात विखुरलेले शब्दथवे भग्न शिवालय अंधार्‍या कपारी सांध्यसंध्या उभी एकटीच दूरवरी मनभृंग पोखरे विचारांच्या भिंती छ्प्पर हरविलेले घरटे विराण रडती अंतरीचे दाटता धुके भासांची स्मरणे मागे दग्ध भाव निर्मिते मायेचे सोवळे धागे -------- शब्दमेघ

बाबा !!

प्रकाश१११ ·

गणेशा 01/12/2010 - 15:17
नि तुमचा फोटो जेह्वा आतल्या डोळ्याने बघतो तेह्वा जीव गलबलून येतो आणि ते दिवस हरवल्याच्या जाणीवेने मन पार विस्कटून जाते ....!!! निशब्द झालो मित्रा .. लिहित रहा .....

गवि 01/12/2010 - 15:30
तेराव्या वर्षी अगदी असेच बाबा गेले. वाचताना श्वास अडला. जाऊ दे..जास्त लिहित नाही. सुंदर आहे मित्रा.. रोज आठवण, अश्रू वगैरे काही काही नसतं हे खरं पण एकदम मधेच आठवलं, जाणवलं की एकदम मधली सगळी वर्षं सपकन नाहीशी होऊन मनावर वार होतो. गुदमरवणारं फीलिंग असतं.

खूप पावसाळे डोक्यावरून गेले मोजू नये ईतकी वर्ष उलटली परंतु तुम्ही माझ्या आठवणीत सतत असता बाबा !! हे शपत कुणाला सांगायला हवे का ?? तुम्ही अचानक निघून गेलात असे कुठे तुमचे वय झाले होते बाबा !! आह्मी तर लहान होतो नि आईचे तर किती छान दिवस होते हौस-मजेचे आणि तुम्ही एकदम निघून गेलात अचानक !! किती पोरके पोरके नि उध्वस्त होऊन गेलो आम्ही सर्व दुखाचा पहाड कोसळला आई नको त्या वयात म्हातारी झाली पण बाबा !! काळ कुणासाठी थांबतो ?? माझी बायको मुले फक्त तुमचा शोकेसमध्ये ठेवलेला फोटो बघतात !! त्यांना काय वाटते ?

शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...

मयुरेश साने ·
लेखनविषय:
काव्यरस
फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही ! अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही तोडून तसबीरिला - ती एकसंध राही ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही मागुन ही सुखाला - आले न हाती काही दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई? कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10

कशी बदलून जाते ही सुंदर सकाळ !!

प्रकाश१११ ·

गणेशा 29/11/2010 - 15:21
जबरदस्त कविता पुन्हा एकदा .. निसर्गवर्णन खुप छान करता तुम्ही .. लिहित रहा .. वाचत आहे ..कशी गाभुळलेली वाटत असते ही सुंदर सकाळ झाडापानातून कशी फुलून येत असते ही सकाळ कोवळ्या कणसासारखे पिवळे पिवळे उन कशी गोंजारत असते मनाला ही सकाळ .... हे सर्वात जास्त आवडले

कशी मस्त सकाळ उगवत असते हलक्याफुलक्या पिसासारखी .....!! अंगावर कसा गोड काटा फुलवीत बसते ही थंडीची सकाळ बिस्स्मिल्लाखांच्या सनई सारखी कशी वेलांटत येतेय ही सकाळ ....

प्रतिभावंत !!

प्रकाश१११ ·
लेखनविषय:
काव्यरस
तो एक प्रतिभावंत कवी होता त्याच्या मनाच्या तळाशी झुळझुळनार्या प्रतिभेचा एक झरा होता कुणास ठाऊक कोणी काय केले ? कसे केले ? कशासाठी केले?? त्याच्या प्रतिभेचा झरा कसा गेला आटून ? अचानक !.नकळत!!

आई... मिटलेला श्वास.. १०

गणेशा ·

गणेशा 25/11/2010 - 19:32
नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ---- शब्दमेघ

भाग ९ :- http://www.misalpav.com/node/15559 नयनांच्या ओंजळीत ओला सागर गहिरा स्पंदनांच्या ठोक्यावर आसवांच्या अधिर धारा आठवांच्या वाटेवर दु:ख पारावर घट्ट सुनसान विराण शांततेत सुन्न भयरात काळीकुट्ट आशेने नभाकडे पाहता चेहरा दिसतो आई सुर ही येता एकू वारा गातो अंगाई ---- शब्दमेघ

अधुरी प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी ·

प्रकाश१११ 25/11/2010 - 15:47
अधुरी प्रेम कहाणी का पुन्हा पुन्हा मी शोधते त्या भुत काळातल्या वाटा. का दु:ख्ख करुन घेते. जेंव्हा पायी रुततो काटा मित्रा हे मात्र छान . आवडले .मनापासूनन लिहिलेस रे !!

अधुरी प्रेम कहाणी का पुन्हा पुन्हा मी शोधते त्या भुत काळातल्या वाटा. का दु:ख्ख करुन घेते. जेंव्हा पायी रुततो काटा बसता अशा कातर वेळी कानी कोण गुणगुणे गाणी? झोंबताना ह्या कोवळ्या तनुस कोण करते भलतीच मागणी? ज्याने ह्रुदयास पीडा दिली तोच कसा ह्रदयी बसला? कोवळ्या मम तनुस छेडुन यौवन कसे जागवून गेला. कसा मी विसरु त्याला तो रोम रोमात भिनला सारखा तो आठवतो का? जो जखमा देवुन गेला तुझी लागलेली हि आस हा भास कि आभास आहे तु आता माझा नाहि हे मज का उमगत नाहि? केंव्हा सरेल ति माझी काळरात्र घनघोर अंधारी? कधि उजाडणार मम जिवनी ति पहाट सोनेरी? काय सांगु काय बोलु मन माझे था~यावर नाहि दाटुन येते निर नयनि लिहित