Skip to main content

आई.. मिटलेला श्वास - ६

लेखक गणेशा यांनी गुरुवार, 11/11/2010 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ५: http://www.misalpav.com/node/15255 पार्श्वभुमी : गावाकडे शांत तळ्यावर बसल्यावर, त्याची सुक्ष्म लाट ही मनावर आघात करते आणि विचारधारेच्या प्रवाहात मन हळुच वाहु लागते तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाट मनपटलावर विरता तिमिरात सामावते अखंड विचारधारा ---------- शब्दमेघ
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1907
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ
खूप आवडलं हे वेगळं सांगायला नकोच.

In reply to by पैसा

सुंदर रे गणेशा! स्वगतः डाव्या-उजव्या सोंडाशेपट्यांवर ढीगाने प्रतिक्रिया येतात पण चांगल्या कवितेकडे दुर्लक्ष का?

सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा सुरेख!! कल्पना फार आवडली.

In reply to by प्राजु

सर्वांचे आभार .. प्राजक्ता जी आपण सुचविलेला बदल खुप आवडला .. मनापासुन कविता वाचुन सुचविलेल्या बदला बद्दल शतश आभारी पुन्हा येथे कविता देतो आहे : तळ्याकाठी निशब्द निरव सांजवेळ नक्षत्रांच्या फेर्‍यामध्ये आठवांचा खेळ सोनेरी क्षणांचा हा क्षणिक कवडसा अभिषेक सूर्यास्तास ओघळणार्‍या आसवांचा तरंगीत सुक्ष्म लाटा मनःपटलावर विरता भळभळती विचारधारा.. तिमिरात भिजती आता ---------- शब्दमेघ