Skip to main content

भस्म्या

भस्म्या

Published on बुधवार, 17/11/2010
मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे. >>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील. हा भस्म्या रोग आता समाजाच्या मुळात शिरला आहे. भस्म्या-- भस्म्या झालाय या समद्यांना भस्म्या झालाय या ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या..... ह्या कुरणात माजले म्हशे, बघ चरत्यात गळगळघशे तवाच कागदाला देतात ढुशे अन मारतात मंजुरी ठशे, दरपत्रक ठरलयं या, वरचे हिस्से ठरलेयं या ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या..... भेटे कालेजात सिटं, जरी ब्येकार मारकं-शिट दक्षिणा चढवून भ्येट, जागा खादीची घे थेट जुत्यान बडवू या, यांना जुत्यान बडवू या....... ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या..... टोपी फ़िर्वाया घडीघडी, खोकी घ्येतात सारी घोडी सोलती जन्तेची साल।डी, भरती आपुलीच तुंब।डी शहिदांना इसरुनिया, नेता आदर्श दावी या....... ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या..... शेकडो आधी जे घेतले, ते लाखावरी चढले कोटीकोटीं चरुनी झाले, तरी पुन्हा हपापलेले घराघरात घुसलेय या, हे घरात घुसलेय या ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या.....
काव्यरस
लेखनविषय:

याद्या 1628
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

भस्म्या-- भस्म्या झालाय या समद्यांना भस्म्या झालाय या ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या..... एकदम मस्त .!! आवडली.!छान कल्पना सुचली.नि छान कविता

रोज एक या वेगाने जे घोटाळे उघडकीला येतायत, ते पाहता, हे आपलं राष्ट्रीय गीत म्हणायला हरकत नाही!