मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आज या कातरवेळी तिची आठवण का होतेय?

स्वप्निल मन ·

अथांग 16/10/2010 - 04:03
मनातील खळबळ समजतेय, आणि 'सुन्दर पहाट' किंवा 'आयुष्याची वाट' असे सुरेख शब्दप्रयोगही आहेत,पण थोडी विस्कळीत वाटली कविता. मुक्तछंदात वाचायचा पण प्रयत्न केला, परंतु तेवढी भिडली नाही. तो दिनकर तिकडे जसजसा बुडत चालला आहे अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे च्या ऐवजी - तो दिनकर तिकडे (जसजसा) लुप्त होतोय, माझा आठवणींचा डोह घुसळत जातोय ! पलिकडे एक सुन्दर पहाट फुलतेय, इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवतेय ! असं काहीसं लिहीलं तर गेयता येईल, असे मला वाटते.

काव्यरस
तो दिनकर तिकडे जसजसा बुडत चालला आहे अन् माझा आठवणींचा डोह घुसळला जात आहे पलीकडे एक सुंदर पहाट फुलणार आहे इकडे माझ्या आयुष्याची वाट हरवली आहे इतके दिवस या आठवणी दडपून टाकल्या होत्या मग आजच का या पुन्हा आठवू पाहात आहेत? उद्या काहीतरी घडणार आहे का? माझ्या प्रिय व्यक्तीला काही होणार तर नसेल ना? देवा, तिला नेहमी आनंदात ठेव काढत नसेल माझी आठवण तरी सुखात ठेव माझ्या आठवांच्या लहरी तिच्यापर्यंत पोहोचू नको देऊस मन माझे रडले तरी तिला ऐकू नको येऊ देऊस विसरून गेली मला तरी सुद्धा चालेल पण भेट जर कधी झाली तर ओळख मात्र दाखव -स्वप्निल

एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर

गणेशा ·

सुधीर काळे 16/10/2010 - 08:50
गणेशा-जी, आतापर्यंत तुमच्या पाकक्रियेवरील लेखांची शीर्षकेच पहात आलो होतो, पण तुमच्यात एक कवीही दडला आहे हे आताच कळले! (जेमतेम चहा करण्यापलीकडे कांहींही न येणारा मी पाककलेच्या वाटेला कधीच जात नाहीं!) मूळ आंग्ल कवितेच्या माझ्या ओबड-धोबड गद्य भाषांतराच्या जागी तुम्ही अतीशय सुंदर कविता केलेली आहे. मनापासून धन्यवाद. 'प्रेरणे'बद्दलचे श्रेय मला न विसरता दिल्याचे कौतुक वाटले. सुधीर

नितिन थत्ते 16/10/2010 - 08:50
आजच्या वर्तमानपत्रांमधील बातमी
पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारतासाठी वाढत्या चिंतेचे विषय आहेत, असे प्रतिपादन लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांनी आज येथे एका परिसंवादात केले. पाकिस्तानी हद्दीतील भारतविरोधी दहशतवादी तळ आणि चीनची वाढती लष्करी ताकद, या गोष्टी आपल्यासाठी चिंतेच्या आहेत, असे सिंग म्हणाले. ‘इंडियन आर्मी- इमर्जिग रोल्स अँड टास्क्स’ या विषयावर आपले विचार मांडताना सिंग म्हणाले की, पाकिस्तानची स्थिती फार वेगळी आहे. तेथे अंतर्गत अस्थिरता असते आणि अतिरेक्यांना पाठबळ देणारा मोठा वर्ग सरकार व प्रशासनातही असतो. त्यामुळे पाकिस्तानचा धोका अधिकच गुंतागुंतीचा आहे. मात्र सरकार कोणतेही येवो आणि अंतर्गत स्थिती कशीही असो भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांचे तळ कायम राहतात, ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, असेही सिंग म्हणाले. चीनबाबत ते म्हणाले, चीन आर्थिकदृष्टय़ा प्रगतीपथावर आहेच त्याच जोडीने तो लष्करीदृष्टय़ाही समर्थ होत आहे. ही गोष्ट बारकाईने लक्ष ठेवण्यासारखी आहे. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे तरी अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. आज देश पारंपरिक लढाईच्या दृष्टीनेही शस्त्रसज्ज राहिला पाहिजेच पण आण्विक धोका लक्षात घेऊनदेखील आपण सज्जता बाळगली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
(काळेकाकांचे आणि) मिसळपावच्या सदस्यांचे समाधान व्हावे यासाठीच केवळ लष्करप्रमुखांनी काही माहिती उघड केली आहे. त्यात म्हटल्याप्रमाणे १. चीन आणि पाकिस्तान काय करीत आहेत याची माहिती आपल्याला आहे. आपण गाफील आहोत हे मत चुकीचे आहे. कारण ही माहिती बहुधा लष्करप्रमुखांना काळेकाकांचे लेख आणि पत्रे वाचून मिळाली नसावी. २. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे. ३. अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. म्हणजे आपण पुरेशी कारवाई करीत नाही हे मत चुकीचे आहे. अवांतर : तो धागा इंचाइंचाने वर येऊ नये म्हणून या धाग्यावर उत्तर दिले आहे.

In reply to by नितिन थत्ते

गांधीवादी 16/10/2010 - 09:31
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=108218:2010-10-15-17-46-30&catid=27:2009-07-09-02-01-31&Itemid=4 वरील बातमी वाचली, त्यातून मला एकच निष्पन्न झाले कि, पाकिस्तान आणि चीन हे दोन्ही देश भारतासाठी वाढत्या चिंतेचे विषय आहेत, त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. आणि आपण (म्हणजे कोणी, लष्कर कि जनता ? माझ्या मते दोघांनी.) सज्जता बाळगली पाहिजे. म्हणून वेळोवेळी ह्या विषयी उहापोह व्हायलाच हवा.

In reply to by नितिन थत्ते

चीन युद्धाच्या वेळेला सुधा सतर्क आहोत वगैरे वगैरे म्हटले गेल्याचे कळते. पण तेव्हा तर चांगलीच पाचर बसली होती. असो. "वुई आर सॉरी फोर द पीपल ओफ सिक्कीम" असे उद्गारही सतर्क राज्यकर्त्यांकडून निघाल्याचे कळते. प्रश्न खरंतर सतर्क असण्या नसण्याचा नाहीये. प्रश्न त्या सतर्कतेवर काहीही क्रिया न करण्याचा आहे. असो. >>२. चीन वा पाकिस्तानशी थेट युद्ध या घडीला वा नजिकच्या भविष्यातही अशक्य आहे. बाकी चीन पाकिस्तानशी थेट युद्ध करण्याची वेळ आली तर भारतीय लष्कराचे ३-१३ वाजण्याची शक्यता जास्त आहे. कमीतकमी पूर्व नौसेना प्रमुखांच्या विधानांवरून तसेच वाटते. आणि स्वातंत्र्यानंतर ५० वर्षात त्या दृष्टीने फार काही प्रगती झाली आहे असे वाटत नाही. >> ३. अतिरेक्यांच्या साह्याने चालणारे ‘छुपे युद्ध’ मात्र वेळोवेळी सुरूच असते आणि त्याला आपण समर्थपणे तोंड देत आहोत. म्हणजे आपण पुरेशी कारवाई करीत नाही हे मत चुकीचे आहे. सहमत आहे. २६/११ च्या हल्ल्याच्या वेळेला आपण पुरेशी कारवाई केली होती म्हणे.

गांधीवादी 16/10/2010 - 09:53
अजून एक बातमी वाचली काश्‍मीर भारतात विलीन नाही, हे खरेच - कृष्णा नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीर हे राज्य भारतामध्ये विलीन झालेले नाही, तर ते भारताला येऊन मिळालेले आहे, असे तेथील मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी केलेले विधान योग्यच आहे, त्यात काही गैर नाही, असे परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी आज म्हटले. उमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्‍मीरच्या विधानसभेत बोलताना, आपले राज्य भारतात अद्याप विलीन झालेले नाही, ते केवळ भारताशी संलग्न आहे, असे म्हटले. स्वातंत्र्योत्तर काळात जुनागढ व हैदराबाद ही संस्थाने भारतात विलीन झाली, त्याप्रकारे जम्मू-काश्‍मीर विलीन झालेले नाही, त्यामुळे जम्मू-काश्‍मीरची तुलना या दोन संस्थानांशी करू नये, असेही उमर म्हणाले होते. कृष्णा यांनीही जम्मू-काश्‍मीर हा भारताचाच अविभाज्य भाग आहे, असे म्हटले होते. जर काश्मीर खर्च भारतात विलीन झालेले नसेल तर ते भारताचा अविभाज्य भाग कसे होऊ शकते ? तो हिस्सा का भारताच्या नकाशात दाखवायचा ? आम्ही लाऊन घेऊ सवय जसा असेल तसा नकाशा बघण्याची. आणि का त्या काश्मीर पायी इतका आटापिटा करायचा आणि इतके मनुष्यबळ आणि पैसा वाया घालवायचा ? उगाचच वर्षानुवर्षे त्यापायी डोकेफोड का करायची ?

गांधीवादी 17/10/2010 - 13:54
हि आहे भारतीय सरकारची सतर्कता. US says 'threat info' shared with India before 26/11 attacks Separately, an Indian source, who was involved in the investigations of the Mumbai terrorist attacks, told PTI on the condition of anonymity, that India did receive the information, which was general and it was not specific in nature. आता specific in nature म्हणजे काय ह्यांना कोण कोण कुठून, कुठे कसे, किती वाजता, काय काय घेऊन येणार अशी माहिती अपेक्षित होती कि काय देव जाने. specific in nature माहिती म्हणजे नक्की काय हवे असते ? जो पर्यंत अशी specific in nature माहिती मिळत नाही तो पर्यंत कारवाई होत नाही का ?

In reply to by गांधीवादी

नितिन थत्ते 17/10/2010 - 14:27
नक्की काय इन्फो दिली होती हे आपल्याला माहिती आहे का? की भारतीय अधिकारी म्हणतात ते चुकीचेच असणार असे समजून/दाखवण्यासाठी जीभ उचलून टाळ्याला लावली आहे?

In reply to by नितिन थत्ते

गांधीवादी 17/10/2010 - 15:00
>>नक्की काय इन्फो दिली होती हे आपल्याला माहिती आहे का? नाही हो माहित नाही. पण specific in nature नव्हती हे नक्की. माहिती specific in nature द्यायला हवी होती, तशी न दिल्याबद्दल अमेरिकेचा निषेध करतो. बाकी भारतीय अधिकारी आपले काम एकदम चोख बजावितात हे मान्य. गुप्तहेरांनी काय एक specific in nature माहिती द्यायची मग ते एकदम चोख कारवाही करतात. हे मान्य करतो.

लेखनविषय:
काव्यरस
प्रेरणा : सुधीर काळेंचा हा थ्रेड - http://www.misalpav.com/node/14446 माये का करु अजुनही सेवा तुझी ? हा खेळ चाले जीवनी, पाहितेस का कधी ? लहानपणी स्वप्नाळलेले मन माझे वेडे असे रक्षणात सीमांच्या अखंड सताड उभे आता करुनी मुर्खात गणना माझी त्यागलेली ती कोमलता, पाहितेस का कधी ? पुरुषात रुपांतर करुनी झाले सुखवस्तु कातडीस पिळवटुन झाले सग्या - सोयर्‍यांपासुन दूर वंचीत कायम हरवलेले रोमांचीत जीवन, पाहतेस का कधी ? धुक्यात विरघळूनी ..उन्हात होरपळूनी रक्त सांडलेले तुझ्या पदरी ...

(गावात प्लेग)

अर्धवट ·

In reply to by मेघवेडा

गणेशा 14/10/2010 - 19:57
रिप्लाय केला तरी रिप्लाय प्रकाशीत होत नव्हता. २ दा पुन्हा कील केले तरी तीच बोंब शेवटी सोडुन दिले तर सगळ्या क्लिक ला रिप्लाय पडले होते इकडे . बरे झाले रिप्लाय प्रकाशीत होइ पर्यंत क्लिक केले नाही. नाहीतर हिंदी मालीकांचे असंख्य भाग आले असते येथे असे वाटले असते

चेतन 14/10/2010 - 14:27
विडंबन ठीक (पहिल्या कडव्यात अडखळायला होतयं असं वाटलं)

धमाल मुलगा 14/10/2010 - 20:07
उत्तम आहे.. तुम्ही उत घाला म्हणजे आम्हाला मात घालायला वाव मिळेल. -धमाल रँड.

सार्‍या उदास वाटा, कापीत चाललो मी होउन मूषक काळा, शापीत चाललो मी नाले गटारे अनेक, सुगंधी या पथाने, ओल्या ओघळांत काही, हुंगीत चाललो मी वस्ती उठून गेली, ओसाड ती कवाडे, तो घास नासलेला, शोधीत चाललो मी, काखेत एक गाठ, आक्रोश आणि टाहो, मृत्यो तुझ्या तमाच्या धुंदीत चाललो मी. पसरला प्लेगपाश, दूषीत आसमंत, प्रतिशोध मानवाचा भेदीत चाललो मी. ( खूप दिवसांनी एकाच कवितेवर विडंबने पडताना पाहिली आणी रहावलं नाही.. खुप दिवस काहीच लिहायला वेळ मिळाला नाही म्हणुन जरा हात आणी कळफलक साफ करून घेतोय.. )

एका डॉक्टरच्या कविता-१: ड्यूटी

डॉ अशोक कुलकर्णी ·

आणि शब्दातुन व्यथा कळते आहे. मला बर्‍याचदा हा प्रश्न पडायचा की डॉक्टरांच्या समोर इतके इतके प्रसंग येत असतात्...ते कसे नेहमी त्याच वातावर्‍अणात राहु शकतात? कधीही त्यांना frustration येत नसेल?.... इ.इ. माझी एक अतिशय आवडती serial होती/....gray's anatomy...त्यामध्ये हे सारं डॉक्टरांच भावविश्व अतिशय सुंदरपणे portrait केलं होतं... लिहित रहा अजुनि....वाट पाहते आहे.

सर्व रसिक वाचक मित्रांचे मना पासून धन्यवाद ! मनापासून लिहिलेल्या आणि प्रत्यक्ष अनुभवावर आधारलेल्या कवितेला मनापासून दिलेल्या प्रतिसादा बद्दल मनापासून आभार ...!

3

(शापीत मेघ ) ...

गणेशा ·

पैसा 13/10/2010 - 22:12
आपल्याच कवितेच विडंबन! पण जमलंय. फक्त एकच वाटलं, शेवटचे २ शेर विडंबन नाहीत. ती एका स्वतंत्र गजलची सुरुवात आहे.

In reply to by पैसा

गणेशा 13/10/2010 - 22:19
पैसा ताई गझल नाहीये वरील .. कारण अक्षरवृत्त . गणवृत्त (लघु -गुरु) सम्थींग काही पाळले नाहीयेत. पण तरीही स्वतंत्र गझलची सुरुवात हे चुकीचे वाटते आहे. --------- कविता आणि गझल मधील मुळ फरक हा आहे की गझल मध्ये प्रत्येक २ ओळींचा शेर हा स्वतंत्र कविता असतो .. आणि कविता मध्ये प्रत्येक कडवे हे कवितेचा मुळ गाबह विस्तारीत नेत असते. असो आणि मतला आणि शेर वेगळा असतो . म्हण्जे मतला मध्ये दोन्ही ओळीत रदिफ , काफिला असते उदा. -- शापीत चाललो मी -- कापीत चाललो मी पण शेरा मधेय फक्त दूसर्या ओळीत रदिफ , काफिला असते. -------- असो गझल चा अभ्यास केला आहे. पण ती लिहायला लागणारी प्रतिभा आपल्याकदे नाही .. त्यामुळे कवातरी त्या फॉरमॅट मध्ये लिहुन तलप भागवतो ..

आदिती आणि अडगळ यांच्या प्रेरणेने. सारे बोबाट शब्द, फेकीत चाललो मी सोडुन सार्या वाटा, का पीत चाललो मी ? रिचवुनी अनेक प्याले, रातीचे ओसाड नाले अडखळीत का असेना, धुंदित चाललो मी रात्रीत विरले दु:ख, सरलेली सारी स्वप्न झुगारुन लक्ख नभास , ऐटीत चाललो मी झाले आप्त ही परके, रक्तबंध विस्कटलेले नजरेच्या तप्त ज्वाला, सोशीत चाललो मी डागाळलेला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी

(शापीत मेघ)

अडगळ ·

श्रावण मोडक 13/10/2010 - 20:08
छान विडंबन. हैदोस शब्दाला टाकलेलं अवतरण पाहून काय झालं ते इथं सांगत नाही.

In reply to by श्रावण मोडक

अडगळ 13/10/2010 - 23:51
या शब्दाला पण अवतरणात टाकावं का असा विचार चमकून गेला. मेडिकल स्टोअरवाला (अडगळ)

पैसा 13/10/2010 - 20:39
एका उपेक्षित पाकिटमाराच्या भावना काय नेमक्या व्यक्त केल्यात! कोणाच्या खिशावर हात साफ केला आणि क्रेडिट कार्डाऐवजी नोटा मिळाल्या असं वाटलं.

आमचीही प्रेरणा http://www.misalpav.com/node/14884 पाकिट , पर्स , चेना ढापीत चाललो मी, लवते न तोच पाते, कापीत चाललो मी, वाणी विमा विजेची , सारी बिले मिळाली, हिरवा वसंत कोठे? शोधीत चाललो मी. पाकीट का म्हणावे , "हैदोस" भावनांचा, पत्रे पुराणी पिवळी , वाचीत चाललो मी, बघतो अनंत कप्पे , ना नोट , नाही नाणे, घाला चुलीत ह्याला, काशीत चाललो मी, पेठांत या पुण्याच्या ना राहिली खुमारी, औंधात हात मारु, घोकीत चाललो मी.

पण बोलणार नाही...

नगरीनिरंजन ·

स्पंदना 13/10/2010 - 12:00
कस वाटतय सांगु? शरदीनी तैंची सावली पडल्या सारख, ते सुरुवातीच नमन काढलत तर अगदी तै! [विषयानुरुप सुन्दर काव्य, सारर्‍या कथेच प्रतिबिम्ब !!]

द.मा.मिरासदारांची एक 'कोणे एके काळी' नावाची कथा आहे. त्यात एका राजाचे मन जिच्यावर बसले आहे अशा एका सुंदर आणि चतुर स्त्रीचे हृदय जिंकण्यासाठी त्या राजाचा विदूषक त्याची मदत करतो असे कथानक आहे. श्रीमंत नगरशेठची मुलगी असलेली ती ललना राजाच्या बुद्धीची पारख करण्यासाठी जी सांकेतिक कोडी घालते आणि त्यांचा अर्थ लावून तो विदूषक तिच्याच भाषेत तिला कसे संदेश पाठवतो याचं बहारदार वर्णन कथेत आहे.

(कापित केक)

३_१४ विक्षिप्त अदिती ·

In reply to by ब्रिटिश टिंग्या

टिंग्याच्या मित्राची आठवण झाली. बरे आहे विडंबन (हे आपल उगाच हिणकसपणा दाखवायला)

वेगळ्या विषयावरचं विडंबन छान जमलेलं आहे. 'मिपावरच्या समस्त काका लोकांना अर्पण' असं कुठे पांढऱ्यात लिहिलं आहे का ते तपासून पाहिलं... राजेश

मेघवेडा 13/10/2010 - 14:18
ढिश्क्लेमर टाकलास म्हणून वाचलीस. :D इडंबन ठीकठाक. मूळ काव्यच ठीकठाक असल्याने असंच म्हणावं लागत आहे. नाहीतर "चान चान" नक्की म्हटलं असतं! ;)

In reply to by गणेशा

डोक्याला त्रास दिल्या बद्दल शमस्व
अहो कशाला उगाच ? ते वाक्य म्हणजे आपल्याला डोके आहे हे दाखवण्याचा क्षिण प्रयत्न आहे हे लक्षात घ्या ;)

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 13/10/2010 - 17:32
छे छे पराषेठ! डोके नावाचे कुणी सदगृहस्थ असतील त्याना ही कविता वाचून त्रास झाला असे काहीसे म्हणावयाचे असेल, पण विडंबन लिहिण्याच्या गडबडीत त्या वाक्याचेसुद्धा विडंबन झाले असावे. अदितीतै, विडंबन मस्तच हो. आणि मेव्यावर विडंबन करुन परत डिसक्लेमर टाकण्यात काय हशील आहे ते समजले नाही! --असुर

In reply to by असुर

असुर शेठ तुम्ही आपल्या पार्टितले का पल्याडच्या ? नाव असुर म्हणजे लगेच पाशवी लोकांची बाजु घ्यायची का? ये उम्मीद न थी आपसे.

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 13/10/2010 - 18:42
पराशेट, ते वाक्य जरा क्रिप्टीक होतं हो. वारंवार वाचून पाहिल्यास विविध अर्थांचा उलगडा होऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणे म्हनजे हे हे हे हे... आपणास कुठली उपमा द्यायची म्या पामराने! आता सगळ्याच गोष्टी उलगडून सांगितल्या तर मला पाशवी मार पडेल हेवेसांनल! ;-) आणि असुर (क्याप्टन, सिंहलद्वार रेजिमेंट, सोन्याची लंका! रिपोर्टींग टू दशाननरावजीचंद्रसाहेब) असलो तरी मी 'पाशवी' मुळीच नाही हे मी नम्रपणे नमुद करू इच्छितो. त्यामुळे आपसुकच इकडच्या गोटात आहे हेही आलेच. बात राहीली उम्मीदची, तर तुमच्या उम्मीदला धक्का लागणार नाही अशी आश्वासनात्मक हमी द्यायचीदेखील माझी तयारी आहे! :-) --असुर

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 13/10/2010 - 19:04
'लोखंडे' तालीम, 'चिंचेची' तालीम प्रमाणे 'मिपाची' तालीम पण आहे की काय पुणे-३० मध्ये? की ठाण्यात? :D --असुर (पैलवान)

In reply to by परिकथेतील राजकुमार

असुर 13/10/2010 - 19:45
>>> ठाण्यात एक वेड्यांची तालिम आहे येवढेच आपल्याला माहिती ही तालीम ठाण्यात असण्यामागे सरकारचा काही स्पेसिफिक डाव आहे याबद्दल मला अजिबात शंका नाही! आपले मत जाणून घेण्यास उत्सुक! ;-) --असुर

रेवती 13/10/2010 - 19:19
अदिती तुला कधी काय सुचेल सांगता येत नाही.;) डोळ्यासमोर समस्त वृद्ध मंडळी आली.......ज्यांना आपला वाढदिवस साजरा कण्याची हौस असते.;) हैद्राबादला एकदा मला शेजारणीच्या ३१ व्या वाढदिवसाचे आमंत्रण आले होते. मोठा विनोद होता माझ्यासाठी!;) पंचविसेक माणसे बोलावली होती त्यांनी!

In reply to by रेवती

तुला कधी काय सुचेल सांगता येत नाही.
हे आपलं उगाच! आधी नावाचं विडंबन जमतं का पाहिलं, मग पुढची फीलर्स!
हैद्राबादला एकदा मला शेजारणीच्या ३१ व्या वाढदिवसाचे आमंत्रण आले होते. मोठा विनोद होता माझ्यासाठी!
अलिकडेच इथे होस्टेलमधे बरेच वाढदिवस झाले. नेहेमीच वाढदिवसाच्या आदल्या रात्री १२ वाजता केक वगैरे कापण्याचे प्रकार होतात. त्यांत एकजण ३७ वर्षांचा झाला, डोक्यावरचं छप्पर बर्‍यापैकी उडलेलं, पोटाचा आकार गणपतीशी स्पर्धा करणारा ... तरीही तेवढ्याच उत्साहात केक, मेणबत्त्या, गाणी, फोटो सगळे प्रकार झाले! ३१व्या वाढदिवसाचं नकोय आश्चर्य वाटायला! :-)

पैसा 13/10/2010 - 20:52
फक्त काही लोकाना ते करुणरसात असल्याचा भास होण्याची शक्यता आहे. ("मेघाचं" नाव घेतल्यामुळे तू आपल्या हाताने आपल्या पायावर धोंडा मारला नाहीस याची खात्री करून घे. नायतर पुढल्या विडंबनाला मदत मिळणार नाही, कोणाकडून ते वेगळं सांगायला नकोच!)

शहराजाद 14/10/2010 - 14:04
मस्त विडंबन. बर्‍याच दिवसानी लिहीलंस. अजून येऊदे. आमचं वाढदिवसाला केक कापणे वगैरे कधीच बंद झालं आहे.सध्या दुसर्‍याच्या वाढदिवसाचा केक खातानाही विचार करावा लागतो.:)

एका शापित मेघा*ने फारच डोक्याला त्रास दिला ;-) सार्‍या रिकाम शुभेच्छा घेऊन राहिलो मी कापीत केक मात्र वाढीत चाललो मी गेले सफेद केसही, ओसाड होई टाळके झाले बधीर नयन 'उप-नयन' वापरतो मी उत्साह झडून गेला, नाही कशात लक्ष शर्करा होई कडवट शोधीत चाललो मी झाले श्रवण परके, उदास विराण गाणे यंत्र असे तारक वापरीत ऐकतो मी विस्मरण सतत सोबत, विसरलो वय वाढ संगे सोबती अन् केक कापीत चाललो मी *यात मेव्याचा काहीही संबंध नाही.

शापीत मेघ

गणेशा ·

नगरीनिरंजन 12/10/2010 - 19:09
>>सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, >>होऊन मेघ काळा शापीत चाललो मी छान ओळी. थोडं शुद्धलेखनाकडे लक्ष दिलंत तर दाताखाली खडा आल्यासारखं होणार नाही.

तर्री 13/10/2010 - 01:46
का महीती नाही पण "तपत्या झळा ऊन्हाच्या " चालीमध्ये वाचताना अडखळलो , परत मुक्त छंदासारखी वाचली तर आवडली. शेवटाचे कडव्यात "पंच" निसटता आलाय.आशय विशेष आवडला.

गणेशा 13/10/2010 - 16:20
या कवितेचा पहिला मतला सोडला तर काहीही व्रुत्ता मध्ये नाही आहे. त्यामुळे ही गेय कविता होउ शकत नाहीये. तुमच्या सर्वांच्या प्रोत्साहन पर रिप्लायाबद्दल आभार शुद्धलेखनाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करतो नक्की.

सार्या उदास वाटा कापीत चाललो मी, होऊन मेघ काळा शापीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओल्या अधीर धारा कुरवाळीत चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले आप्त ही परके, उदास विराण घरटे दाहक अंतरातला दूरावा तोडीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात वाहवत चाललो मी ------ गणेशा

गंधवार्ता

गंगाधर मुटे ·

अथांग 11/10/2010 - 23:40
शब्दांची कित्ती रुपे.. टिपतात भावनांचे विविध क्षण, कधी खेळते हसु ओठांवर, अन कधी आगतिक विषण्ण मन ! -अथांग.

अथांग 11/10/2010 - 23:40
शब्दांची कित्ती रुपे.. टिपतात भावनांचे विविध क्षण, कधी खेळते हसु ओठांवर, अन कधी आगतिक विषण्ण मन ! -अथांग.
लेखनविषय:
काव्यरस
गंधवार्ता दोर गळ्यात लटकवून बाप झुलतोय झाडावर माय निपचित पडलीय हृदय फाटता धरतीवर बाळ खिदळतंय मनीसंगे मिशा तिच्या धरता-धरता नाही जराही त्याला कसलीsssचं गंधवार्ता . . . . . गंगाधर मुटे ...................................