मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घे भरारी..मन म्हणाले...

सत्यजित... ·
लेखनविषय:
घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो... सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो! जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती... वाटले की..वाट चुकले कोकरु झालो! राजरस्त्याची तमा ना आडवाटेची... मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो! गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले... धन्य झाला जन्म की मी वासरु झालो! बासरीचा सूर होणे मज कुठे जमले? राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो! हुंदके दाबून सारे स्वागता गेलो... अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो! घेतली हाती कलम बहुधा बरे झाले... मी मुक्या संवेदनांची आबरु झालो! —सत्यजित

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

drsunilahirrao ·

गवि 09/03/2017 - 13:10
क्या बात है सर.. अहाहा...
वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो
केवळ अप्रतिम...

वाह! अप्रतिम! डॉक्टरसाहेब एकदा थोडासा वेळ मिळेल का तुमचा? निवांतपणे... तुमच्या गजला आणि कविता प्रत्यक्ष तुमच्या कडून ऐकण्याची इछा आहे! ___/\___ Sandy

drsunilahirrao 11/03/2017 - 08:20
___/\__ आत्मबंध, अनंतयात्री, गवि, शब्दबम्बाळ, चांदणे संदीप, अनुप ढेरे फुत्कार

वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो हे खास ! आणि हे तर, शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो त्याहून खास !

drsunilahirrao 14/03/2017 - 18:54
धन्यवाद सत्यजित, पैसा, प्रा. डॉ. दिलीप बिरुटे सर, संजय क्षीरसागर

काव्यरस
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो डॉ. सुनील अहिरराव

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao ·

गवि 08/02/2017 - 12:21
खुला अता दरवाजा होणे नाही ... मला तुझा अंदाजा होणे नाही
इथे जरा ओढाताण झालीय का? तुम्ही स्वतःच आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत.
मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही
या दोन ओळींतला एकूण भाव खूप आवडला. यासदृश मूडवाल्या नासिर काजमीच्या दोन ओळी आठवतात: न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो

In reply to by गवि

drsunilahirrao 09/02/2017 - 10:10
मला तसे जाणवले नाही, पण असू शकते.गझलेतून व्यक्त होताना बऱ्याच मर्यादा येतात. विशेषत: मला तुझा अंदाजा होणे नाही,यात. नासिरचा शेर ग्रेट ! खूप खूप धन्यवाद सरजी !

In reply to by योगेश लक्ष्मण बोरोले

पैसा 12/02/2017 - 11:54
अगदी! म्हणजे कवितेतली भावना आणि वृत्तात जरा पक्की असती तर अजून छान वाटली असती अशीही चुटपुट!

सत्यजित... 06/05/2017 - 07:40
>>>तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही>>>बहोत बढिया! >>>मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही)>>>गजब शेर!क्या बात!!

रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव

दु:ख अवघा धृवतारा मागते

drsunilahirrao ·
काव्यरस
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव

कधीतरी.....

पराग देशमुख ·
उकलत मनाची पाकळी सांज हळवी होते; कधीतरी..... भिजवून पापणी ओली रात्र हळवी होते; कधीतरी..... चुकवून पाहारे सारे नजरा-नजर होते; कधीतरी..... मोडून मनाची दारे, तिची आठवण उच ...! येते; ऊ...च...!!ऊ...च...!!! (इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?) कधीतरी..... -मुकुंद

चांदण्याला चांदणे समजू नये

drsunilahirrao ·

:) मस्त गजल डॉ.साहेब. बऱ्याच दिवसांनी.... तुमचे नाव पाहिले आणि काहीतरी छानस वाचायला मिळणार अशा कल्पनेनेच दिल खुश हो गया था! बहोत खूब लिखा है सर...! माशाअल्लाह... एकेक शेर तबितयतसे रचलाय हो! कातिल! चाबूक! Sandy

In reply to by अत्रुप्त आत्मा

सतिश गावडे 27/10/2016 - 22:45
अगदी. सैल बांधणी असणार्‍या कविता वेगळ्या असतात. तिथे सगळे घाईत असल्याने सैल बांधणी उपयोगी पडते.

बोका-ए-आझम 28/10/2016 - 00:31
हे
हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये
अाणि हे
पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये
फारच सुंदर!

नाखु 31/10/2016 - 12:20
वाटले कविराज संदीपाबाबत काही कवीता आहे का, पण हे वेगळेच चांदणे निघाले. उन्हाचांदण्यातला नाखु

सत्यजित... 12/05/2017 - 15:22
वाह् गझल इतकी सुटसुटीत लिहिता यावी हेच मुळी कौतुकास्पद वाटते! गझल सुरेखच! त्यातही,तारांगणे व पाहणे,हे शेर लाजवाब!

एकमेकांना उणे समजू नये (नी स्वतःला शाहणे समजू नये) चांदणे परसामधे पडते म्हणुन आपली तारांगणे समजू नये माणसेही राहती रानीवनी नेहमी बुजगावणे समजू नये हे असे परक्यापरी येऊ नये नी स्वत: ला पाहुणे समजू नये ही कशाची भूल या रातीवरी चांदण्याला चांदणे समजू नये पाहते ती नेहमी माझ्याकडे पण असे की, पाहणे समजू नये डॉ. सुनील अहिरराव

माहेर

प्रास ·

सूड 24/10/2016 - 21:17
मी घाट उतरुन खाली जाणार असेन तेव्हा "माहेरी चाललात का" विचारणार्‍या व्यक्तीने माहेरावर कविता लिहावी म्हणजे नवल आहे. जमलीये बर्‍यापैकी.

सूड 24/10/2016 - 21:17
मी घाट उतरुन खाली जाणार असेन तेव्हा "माहेरी चाललात का" विचारणार्‍या व्यक्तीने माहेरावर कविता लिहावी म्हणजे नवल आहे. जमलीये बर्‍यापैकी.
लेखनविषय:
काव्यरस
असे माहेराचे घर नसे कसली कसर नुरे कसलाही भार डोक्यावर माहेराचे गणगोत भला नात्यांचा हा पोत प्रेम बहर भरात ओतप्रोत माहेराचे हे सदन माझे स्वीकारे वंदन असे माझाही राखून एक-कोन अरे माझिया माहेरा राहो कितीही मी दूरा फिटे दुःखाचाही भारा मोदसारा

गझल - अनुवाद करण्यास मदती हवी.

निनाव ·

ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी । की भक्त नास्तिक न होऊन जावो ॥ जीवनभर जो पूजा शिकत आला । तो न नरकास पात्र होऊन जावो ॥ कौशल्य फक्त सत्य सांगणे ज्याचे । तो न कधी खोटारडा होऊन जावो ॥ कांगडी काळजास ऊब इतकी देवो । अंतरही बेचिराख न होऊन जावो ॥ मराठी अनुवादः नरेंद्र गोळे २०१६०९१४

In reply to by नरेंद्र गोळे

साहना 16/09/2016 - 04:20
> ईश्वरा, अप्रतिष्ठा करू नको इतकी । नको ह्या शब्दामुळे हि गझल बनत नाही. हा एक शब्द बदलला तर परफेक्ट गझल होईल.

मित्रहो, मी नुकतंच गझल लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न केले., पण हवे तसे जमून येत नाहीये, तुम्ही प्रयत्न कराल काय ?

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी

निनाव ·

निनाव 13/09/2016 - 11:54
प्रिय कवि वर्ग हो, मी थोडे बदल केले आहे.. हे देखिल वाचावे नि सान्गा कि कुठले वर्जन जास्त बरे वाटते वाचायला. - आ. विनम्र, निनाव व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का? अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का? आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे विसरलोच तुला जर कधी, मी असा उरेन का? आस मी जगण्याची हि, न सोडली जरी जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का? आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे आठवलोच मी नाही तुज, मी असा उरेन का? बहर मज स्वप्नांना, सांग कधी येईल का? मन बंद पापण्यांना माझ्या, चिंब भिजवेल का? आठवून पाहावे स्वप्न तुझे, तू येण्याचे भंगूनि स्वप्न गोड़ हे, मी असा उरेन का?

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी - निनाव (१२.०९.२०१६) व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी

जाणिवांच्या जखमा

महेश रा. कोळी ·

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अत्यंत आनंद झाला. आपण दखल घेतली हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्की लिहित राहीन. खरच मूठभर मास चढलं. मनापासून धन्यवाद!

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अत्यंत आनंद झाला. आपण दखल घेतली हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. नक्की लिहित राहीन. खरच मूठभर मास चढलं. मनापासून धन्यवाद!
काव्यरस
हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये. हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये. काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या? काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये. ....म्हैश्या