Skip to main content

दु:ख अवघा धृवतारा मागते

लेखक drsunilahirrao यांनी सोमवार, 06/02/2017 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
मागचा सारा चुकारा मागते दु: ख अवघा धृवतारा मागते थेंबही नाही उभ्या रानात अन जिंदगानी शेतसारा मागते केवढे जहरुन हे गेले शहर वीषही आता उतारा मागते वेदना ओथंबुनी येतात अन सूख मोराचा पिसारा मागते जो कधी उधळून ती जाते स्वत: प्रीत तो सारा पसारा मागते डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

वाचने 3249
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया