Skip to main content

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

लेखक drsunilahirrao यांनी बुधवार, 08/03/2017 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो डॉ. सुनील अहिरराव
काव्यरस

वाचने 4236
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

क्या बात है सर.. अहाहा...
वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो
केवळ अप्रतिम...

वाह! अप्रतिम! डॉक्टरसाहेब एकदा थोडासा वेळ मिळेल का तुमचा? निवांतपणे... तुमच्या गजला आणि कविता प्रत्यक्ष तुमच्या कडून ऐकण्याची इछा आहे! ___/\___ Sandy

व्वा व्वा, क्या बात है ! चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो

___/\__ आत्मबंध, अनंतयात्री, गवि, शब्दबम्बाळ, चांदणे संदीप, अनुप ढेरे फुत्कार

आवडली कविता. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो हे खास ! आणि हे तर, शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो त्याहून खास !

तुमच्या लयकारीची एक खासियत आहे. तोल जाईल असं वाटतं आणि.... तेवढ्यात कविता स्वतःला सावरते !