✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

घे भरारी..मन म्हणाले...

स — सत्यजित..., Sun, 03/12/2017 - 07:38
घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो... सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो! जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती... वाटले की..वाट चुकले कोकरु झालो! राजरस्त्याची तमा ना आडवाटेची... मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो! गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले... धन्य झाला जन्म की मी वासरु झालो! बासरीचा सूर होणे मज कुठे जमले? राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो! हुंदके दाबून सारे स्वागता गेलो... अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो! घेतली हाती कलम बहुधा बरे झाले... मी मुक्या संवेदनांची आबरु झालो! —सत्यजित

प्रतिक्रिया द्या
2195 वाचन

💬 प्रतिसाद (6)

लेकरु आणि घुंगरु आवडले.

यशोधरा
Sun, 03/12/2017 - 08:13 नवीन
लेकरु आणि घुंगरु आवडले.
  • Log in or register to post comments

आणखी एक सुंदर रचना !

संदीप-लेले
Sun, 03/12/2017 - 18:58 नवीन
आणखी एक सुंदर रचना !
  • Log in or register to post comments

आभार!

सत्यजित...
Wed, 03/15/2017 - 01:17 नवीन
यशोधराजी,फुत्कार धन्यवाद!
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर.

पुंबा
Wed, 03/15/2017 - 20:50 नवीन
अतिशय सुंदर. आजकाल फार उत्तमोत्तम कविता येताहेत मिपावर.
  • Log in or register to post comments

छान रचना !

गौरी कुलकर्णी २३
Mon, 03/20/2017 - 12:33 नवीन
आवडली !
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

सत्यजित...
Tue, 03/21/2017 - 22:48 नवीन
सौरा,गौरीजी मनःपूर्वक धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा