रंक कधीही राजा होणे नाही
(त्याचा गाजावाजा होणे नाही)
तू राणी आहेस चार भिंतीतच
खुला अता दरवाजा होणे नाही
तू तेथे मीही येथे आहे पण
मला तुझा अंदाजा होणे नाही
मी सारे विसरुन चाललो आहे
घाव नव्याने ताजा होणे नाही
मी नेकी दर्यात टाकली आहे
(शांत अता या गाजा होणे नाही)
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
2294
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
खुला अता दरवाजा होणे नाही
मला तसे जाणवले नाही, पण असू
In reply to खुला अता दरवाजा होणे नाही by गवि
गाजा होणे नाही ....
अगदी!
In reply to गाजा होणे नाही .... by योगेश लक्ष्मण बोरोले
व्वाह!
सुरेख!