मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..
सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो
मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो
वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर
नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो
वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो
शांततेवरची जरा रेषा हलत नाही
मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो
चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
4213
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
छान.
सुन्दर रचना !
क्या बात है सर.. अहाहा...
आवडलेली आहे!
___/\__
In reply to ___/\__ by चांदणे संदीप
नक्कीच संदीप, तुमचा मोबाईल
खूप छान!
क्या बात है !
___/\__
व्वा...गझल आवडली!
वा!
छान
लिहीत राहा !
वाटते आता भिती या चांदताऱ्यांची मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतोहे खास ! आणि हे तर,शांततेवरची जरा रेषा हलत नाही मंद थोडासा तुझा आभास किणकिणतोत्याहून खास !बाय द वे,
In reply to बाय द वे, by संजय क्षीरसागर
thanks :)
धन्यवाद
मस्तच!!!