मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहेर

प्रास · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
असे माहेराचे घर नसे कसली कसर नुरे कसलाही भार डोक्यावर माहेराचे गणगोत भला नात्यांचा हा पोत प्रेम बहर भरात ओतप्रोत माहेराचे हे सदन माझे स्वीकारे वंदन असे माझाही राखून एक-कोन अरे माझिया माहेरा राहो कितीही मी दूरा फिटे दुःखाचाही भारा मोदसारा

वाचने 3415 वाचनखूण प्रतिक्रिया 12

चांदणे संदीप 23/10/2016 - 14:48
छान लिहिलीये कविता! आवडली! Sandy
मी घाट उतरुन खाली जाणार असेन तेव्हा "माहेरी चाललात का" विचारणार्‍या व्यक्तीने माहेरावर कविता लिहावी म्हणजे नवल आहे. जमलीये बर्‍यापैकी.

गौरी कुलकर्णी २३ 27/10/2016 - 23:49
छान..." माहेर " तीन अक्षरी शब्द पण ज्यात तीनही लोकांत सामावणार नाही, इतके प्रेम असते !