मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
रंक कधीही राजा होणे नाही (त्याचा गाजावाजा होणे नाही) तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही तू तेथे मीही येथे आहे पण मला तुझा अंदाजा होणे नाही मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही) डॉ. सुनील अहिरराव

वाचने 2285 वाचनखूण प्रतिक्रिया 6

गवि 08/02/2017 - 12:21
खुला अता दरवाजा होणे नाही ... मला तुझा अंदाजा होणे नाही
इथे जरा ओढाताण झालीय का? तुम्ही स्वतःच आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत.
मी सारे विसरुन चाललो आहे घाव नव्याने ताजा होणे नाही
या दोन ओळींतला एकूण भाव खूप आवडला. यासदृश मूडवाल्या नासिर काजमीच्या दोन ओळी आठवतात: न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो

In reply to by गवि

drsunilahirrao 09/02/2017 - 10:10
मला तसे जाणवले नाही, पण असू शकते.गझलेतून व्यक्त होताना बऱ्याच मर्यादा येतात. विशेषत: मला तुझा अंदाजा होणे नाही,यात. नासिरचा शेर ग्रेट ! खूप खूप धन्यवाद सरजी !

In reply to by योगेश लक्ष्मण बोरोले

पैसा 12/02/2017 - 11:54
अगदी! म्हणजे कवितेतली भावना आणि वृत्तात जरा पक्की असती तर अजून छान वाटली असती अशीही चुटपुट!

सत्यजित... 06/05/2017 - 07:40
>>>तू राणी आहेस चार भिंतीतच खुला अता दरवाजा होणे नाही>>>बहोत बढिया! >>>मी नेकी दर्यात टाकली आहे (शांत अता या गाजा होणे नाही)>>>गजब शेर!क्या बात!!