मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

gazal

हसण्या उसंत नाही

कौस्तुभ भोसले ·
हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त

पाऊस सांजवेळी डोळ्यांत दाटलेला (आनंदकंद वृत्त)

कौस्तुभ भोसले ·
पाऊस सांजवेळी, डोळ्यांत दाटलेला, वाराच काळजाच्या, ओघात साठलेला. पाळीव हस्तकांनी, मागून वार केले, त्यांच्या मनातलाही, विश्वास बाटलेला. माझे खरे प्रबंधी, माझेच प्राण झाले, त्यांचाच फार वेळा, आधार वाटलेला. प्रारब्ध ग्रासलेले, कोऱ्याच सावल्यांनी, रंगांध भावनांचा, हा खेळ थाटलेला. आभाळ रुक्ष झाले, शोकात चंद्रवेली, झाडांत खोल गेला, अंधार फाटलेला. -कौस्तुभ वृत्त -आनंदकंद

आत्मनिर्भर

कुमार जावडेकर ·
मार्ग खडतर, लक्ष्य दुर्धर होत गेले आणि अंतर आत्मनिर्भर होत गेले शब्द जितके आत्मनिर्भर होत गेले... अर्थ सारे अस्थिपंजर होत गेले सुख जगू शकलेच नाही त्या ठिकाणी... दुःखसुद्धा फक्त जर्जर होत गेले बांधण्यासाठी नवे सेतू फुकटचे माणसांचे स्वस्त पत्थर होत गेले चालणे नशिबात होते का म्हणू मी... राहण्यासाठी कुठे घर होत गेले? प्रश्न पुसणे बंद केले मी कधीचे मौनही माझे निरुत्तर होत गेले - कुमार जावडेकर

Whatsapp Romantic Shayari

तृप्ति २३ ·
Whatsapp Romantic Shayari
खामोश दिल हमारा सब कुछ सह लेता है…. तेरी याद मे शायद ये दिल युही रोये जाता है…
Whatsapp Romantic Shayari https://www.truptisshayari.com/whatsapp-romantic-shayari

माकडांच्या पुढे नाचली माणसे!

गंगाधर मुटे ·
माकडांच्या पुढे नाचली माणसे! पाहता पाहता काय झाले असे? माकडांच्या पुढे नाचली माणसे! या हवेला कुणाची हवा लागली? चित्त कामामध्ये ना तिचे फारसे त्यांसही वाढ भत्ता दिला पाहिजे मेघही वागती की पगारी जसे नित्य येणे तिचे वादळासारखे मग लपावे हृदय हे कुठे नी कसे? व्यक्त जर व्हायचे, सोड चिंता भिती तू अभय बोल तू, तू हवे तू तसे                  गंगाधर मुटे 'अभय' ==०==०==०= =०==०==०==

स्वप्नांची गोष्ट (गझल)

कहर ·
कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची कोंबडा झाकुन कुणी केला गजर बंद आली नेमकी पहाटे गुलाबी बांग स्वप्नांची नशीबास पाहतो नेहमी स्वप्ने आठवता मी मग क

देव्हारा

कहर ·
तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी नाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा

तुझे नाव

कहर ·
इतके अलगद उच्चारावे नाव तुझे ओठाने एकाच शब्दामध्ये सामावून गावे अवघे गाणे काना होऊन वीज रहावी खडीच भूमीवरती मात्र्याने मग नभासमोर खोटेच द्यावे बहाणे अनुस्वाराचे टपोर मोती अंगठित सजवावे रेखीव कोरावीत तयास्तव अर्धचंद्र कोंदने पाय मोडल्या अक्षरांनी मारावी तिरकी गिरकी ऊकाराने रुणझुणावे पायात बनून पैंजणे नदी वळवावी कडेकडेने रफार वेलांटीच्या विसर्ग घेऊन पुरी सजावी उर्वरित व्यंजने हरेक वळण, गाठ नि कोन मनामध्ये ठसावा नाव उमटता सुटून जावे जिंदगीचे उखाणे -- विशाल

खरी वाटते, पूरी वाटते

कहर ·
खरी वाटते, पूरी वाटते, जवळ असून ती दूरी वाटते भितो तुला मी, नको मजवरी ऐशी रागावूस प्रिये क्षणभर समशेरीसम मजला तुझ्या हातची सूरी वाटते हरेक सुंदरी समोर असता, हीच फक्त माझ्यासाठी पण हवेत विरते, कणी न उरते, जातच ही कर्पूरी वाटते सारे लिहिले, तारे लिहिले, शेवट ना परी मनासारखा तुझे नाव टाळतो म्हणूनच गोष्ट जरा अधुरी वाटते तू असताना सुचे न काही, आठवांनी पण भरे वही काय करू मी? हाय!

फलीत

कहर ·
पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले अर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा तीच कविता भासते आहे अशी विपरीत का बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा जे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का उतरता उन्माद कळले एकटाच रणांगणी मित्र नाही आप्त नाही ही म्हणावी जीत का ओळ आहे खूप