मागचा सारा चुकारा मागते
दु: ख अवघा धृवतारा मागते
थेंबही नाही उभ्या रानात अन
जिंदगानी शेतसारा मागते
केवढे जहरुन हे गेले शहर
वीषही आता उतारा मागते
वेदना ओथंबुनी येतात अन
सूख मोराचा पिसारा मागते
जो कधी उधळून ती जाते स्वत:
प्रीत तो सारा पसारा मागते
डॉ. सुनील अहिरराव
वाचने
3240
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक नंबर शेवटतर भारीच
जबराट
जबरी!!!!
आह्ह्ह्ह खतरन्नाक
वाहवा!
छान!
नेहमीप्रमाणे... भारिच!
छान ! . कविता म्हणजे गाणे
सुश मय ,पराग देशमुख
नेहमीप्रमाणे उत्तम.
सर्व प्रतिक्रियांशी सहमत...
मान गये आपको !